राग - मिश्रराग
( चाल : भूपती खरे ते वैभव )
* महाबळेश्वर येथील वनसृष्टि पाहून सुचलेले विचार *
दिनांक २२-४-१९६१

ही रानजुईची सुगंधी पुष्पमाला ॥
अती प्रेमादरे अर्पिते तुज नंदलाला ॥धृ॥
या पर्वतराजीचा रंग दिसतो निळा ॥
पाहुनी वाटले जैसी कृष्ण कांती ही शामला ॥१॥
या घनदाट वृक्ष वेलीना पाहुनी ॥
वाटला जणुं, हरी कुंतल भार शोभुनी ॥२॥
या मृत्तिकेचा पाहुनी रंग लाल ॥
वाटले हरीची पाऊले कोमल ॥३॥
सूर्य अस्ताची नभी शोभा दिसे आगळा ॥
सोनेरी प्रभा जणु हरीचा पितांबर पिवळा ॥४॥
या विहंगमाचे मधुर कुंजन गान ॥
भासली हरीची सुस्वर मुरलीतान ॥५॥
ऐशा रुपाने नटला सर्वत्र श्रीहरी जगती ॥
जिकडे पाहावे तिकडे दासीला दिसे कृष्ण मूर्ती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP