राग - मांड
( चाल : श्रीज्ञानेश्वरा काय तुझा महिमा )

रामनाम मुखीं सदा श्री राम राम ॥
द्वैतभाव करी दुरी श्री राम - नाम ॥धृ॥
अंतरीं वसे नित्य जो आत्माराम ॥
तोचि त्रिभुवनीं गाजे दाशरथी राम ॥१॥
नाम गाऊ प्रेमें कमल - नयन राम ॥
रघुकुल - भूषण राम सीतापती राम ॥२॥
जानकी - जीवन राम मेघश्याम राम ॥
पतीत - पावन राम श्रीराजाराम ॥३॥
दासीचें कुलदैवत श्री - राम राम ॥
राजीवलेचन राम मंगलमय राम ॥४॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP