मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा| स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा याज्ञवल्क्याने वर्णिलेले वधूगुण गृह्यसूत्रोक्त कुलपरीक्षा धर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी स्त्रीचे स्त्रीत्व कुलपरीक्षेत पाहण्याच्या गोष्टी वधूची वर्ज्य कुले कुले वर्ज्य करण्याची कारणे वधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे ग्रंथान्तरोक्त बाह्यलक्षणे सूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे वधूची अंतर्लक्षणे; स्वभावपरीक्षा साहाय्य व महत्त्व आश्वलायनोक्त मृत्तिकापिंडपरीक्षा स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ स्त्रीचे रमणीयत्व सापिंड्यनिषेध माता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य निषिध संबंध सापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था सपिंडगणनेची कमीत कमी संख्या वधू वरापेक्षा लहान असावी वधूची निरोगिता स्पर्शसंचारी रोग स्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता स्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस गोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : astrologyjyotishमराठीवधूवर स्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’ Translation - भाषांतर अर्थ व पुनर्भू स्त्रिया : विवाह्य कन्येसंबंधाने कलम ५ येथे ज्या गोष्टी पाहावयाच्या म्हणून सांगितले आहे, त्यातील ( इ ) पेटाकलमात ती अनन्यपूर्विका असावी असे सांगितले आहे. ‘ अनन्यपूर्विका ’ म्हणजे अन्यपूर्विका नव्हे ती, अर्थात ती होणार्या विवाहापूर्वी दुसर्या कोणाही पुरुषास प्राप्त झाली नसली पाहिजे, असा या संज्ञेचा अर्थ निबंधकारांनी वर्णिला आहे. पुरुषास स्त्री सामान्यत: दोन प्रकारांनी मिळते. हे दोन प्रकार दान व उपभोग हे होत. निबंधकारांच्या मते या दोन प्रकारांत सात प्रकारच्या पुरर्भू स्त्रियांचा समावेश होतो. ‘ पुनर्भू ’ म्हणजे शब्दश: पुन: होणारी, अर्थात पुनर्विवाह करणारी स्त्री होय, व तिचे प्रकार पुढे दर्शविल्याप्रमाणे समजावे :( १ ) “ मनोदत्ता ” म्हणजे कन्यादान करण्याचा ज्यास अधिकार आहे, अशा पुरुषाने जीस अमुक पुरुषास देण्याचे मनाने ठरविले ती.( २ ) “ वाचादत्ता ’’ म्हणजे जी कन्या अमुक पुरुषास द्यावयाचे मी ठरविले आहे असे त्या पुरुषापाशी अगर त्याचा पिता इत्यादिकांपाशी कन्यादान करणार्या पुरुषाने वचन दिल्याप्रमाणे बोलून दाखविले आहे ती. ( ३ ) “ अग्निं परिगता ” म्हणजे विवाहविधीत अग्नीभोवती जिची प्रदक्षिणा झाली आहे ती.( ४ ) “ सप्तमं पदं नीता ” म्हणजे सात पावले चालत नेलेली. ( विवाहाच्या विधीत वधूचा हात धरून तिला तांदुळांच्या निरनिराळ्या राशींवरून एकेक पाऊल चालत नेतो हे प्रसिद्धच आहे. )( ५ ) “ भुक्ता ” म्हणजए स्त्रीपुरुषांचे नाते पूर्णपणे जोडले जाऊन जिला पतिसमागम घडला आहे ती.( ६ ) “ गृहीतगर्मा ” म्हणजे जिच्या पोटी गर्भ राहिला ती.( ७ ) “ प्रसूता ” म्हणजे बाळंतीण झालेली.या सात प्रकारांपैकी पहिल्या तीन प्रकारच्या स्त्रियांस ‘ पुनर्भू ’ ही संज्ञा शास्त्रत: लागत असली तरी ‘ पतित्वं सप्तमे पदे ’ या स्मृतिवचनास अनुसरून विवाहविधीतील सातवे पाऊल वधू चालून गेली म्हणजेच वरास पतीचा अधिकार पूर्णपणे येतो. अर्थात हे पाऊल वधू टालीतोपावेतो त्यास ‘ तिचा पती ’ ही संज्ञा पूर्णप्णे लागत नाही. यावरून पहिल्या तीन प्रकारच्या पुनर्भूंस तिच्या पतीच्या पातित्यादी दोषांबद्दलचा बळकट पुरावा झाल्यास निराळ्या पुरुषाशी विवाह करण्यास अडचण नाही असे संपूर्ण निबंधकारांचे स्पष्ट मत आहे.वरपक्ष व वधूपक्ष या उभयतांचे ऐकमत्य होऊन विवाह होण्याचे निश्चित होऊन गेल्यावर, अथवा केव्हा केव्हा साक्षात विवाहविधी चालू झाल्यावरही, वरासंबंधाने अगर वधूसंबंधाने विपरीत दोषकल्पना निघून, म्हणजे पूर्वी न समजलेल्या वर्ण, जाती, कुल, पातित्य, दैहिक अगर मानसिक विशेष व्यंगे, अथवा लोकव्यवहारास अनुसरून विशेष अडचणीच्या गोष्टी नवीन कळून येऊन, जुळून आलेले लग्न मोडते, अगर ते अर्धवटच टाकून न व्हावे, व विवाहकृत्याच्या पूर्णतेची कोठे तरी मर्यादा मानिली जावी, या हेतूने शास्त्रकारांनी अशा प्रकारे निर्णय केला आहे. हा निर्णय सर्वतोपरी योग्य आहे हे निराळे सांगणे नलगेच. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP