मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| अंधप्रकाश दृष्टांत प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - अंधप्रकाश दृष्टांत श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत सद्गुरु सोडून असत्य देवतांमागें-अंधप्रकाश दृष्टांत Translation - भाषांतर मही एवढा कागद थोर । लेखणीस अठरा भार तरुवर । मेस केल्या सप्त सागर । पूर्ण नव्हेच नाम ॥९९॥ईश्र्वर पुरता पुरतेपणें । याला काय आपली जाणीव दावणें । समाप्त नव्हती मति पुराणें । दरुशनें वादा पातलीं ॥१००॥दीप लावितां घराभितरीं । पळतां नाहीं देखिली अंधारी । तैसे आत्मज्ञान प्रभा थोरी । सद्गुरुकृपा जालिया ॥१०१॥दीप लाविला वनांतरीं । मद्भुवनाची न फिटे अंधारी । तैसे पंडित शास्त्रगण विचारी । स्वयें प्रकाश नेणती ॥१०२॥सूर्य प्रकाशल्या उपरि । मद्भवुनीं विराली अंधारी । तैसी गुरुकृपा जाल्यावरी । तत्त्वें तदाकार होय ॥१०३॥जैसा रवीच्या प्रकाशें रवि दिसे । तैसा ईश्र्वरकृपेनें ईश्र्वर भासे । जाणते जाणीव कथितां जाले पिसे । परी साक्षात्कार नाहीं ॥१०४॥रवि नेत्राची एक कळा जाण । यालागी रविप्रकाश दिसे संपूर्ण । अंधारीं कां न देखती लोचन । पाहातां चांचरी जाती ॥१०५॥प्रकाशानें प्रकाश देखिला । रविबिंब काय हो गर्भांधाला । तदन्याय जनाला जाला । ईश्र्वरकृपेंविण ॥१०६॥असतां रवि राशीचा प्रकाश । आभार नाहीं त्या गर्भांधास । समया लावूनि बैसविला सदरेस । परि त्यास खरें वाटे ना ॥१०७॥शुच अशुच नाहीं अंधास । काळें गोरें सोवळें नेणें राजहंस । सांगितल्याचा न धरी विश्र्वास । आंधळा म्हणोनियां ॥१०८॥तैसें जनाचें ठायीं आंधळेपण । असत्य मानिती साधूचें वचन । परी न धरिती कांहीं सद्गुण । अवगुण आचरती ॥१०९॥जे दो चौ डोळ्यांचे देखणार । ते म्हणती अंधास कोपला ईश्र्वर । अंधास वाटे श्रीमुखीं अंधःकार । द्वैतीं द्वैत हेळा ॥११०॥उजेड अंधार वाटे अंधास । तैसा साधु-उजेडाचा अंधार जनास । सांगितल्याचा न धरी विश्र्वास । अंधार दैवतें पुजिती ॥१११॥मल्हारीपासून अनुसंधान । सांगतां राहिलें होतें वचन । तें सांगो आरंभिलें देवता लक्षण । संत श्रोत्यांप्रती ॥११२॥कामव्यसनी मल्हारी वेडा । धुंडित होता धनगराच्या पेडा । तो पुजिल्या केंवी फिटे खोडा । लक्ष चौर्यांशीचा ॥११३॥जो नवसें दिवटी हळद मागे । देऊळें करा म्हणोनि भक्तांस लागे । चित्रलेपास नेसविली लुगडी झगे । आपण लेवों नेणें ॥११४॥चितार्याकून करूनियां आपणांस । तो केंवी तारील पुजारियास । भंडार नांव ठेवूनि हळदीस । वेडेचार केले ॥११५॥निरशुन्यास भंडार बोलिजे वचनीं । जेथूनि साकरल्या खाणीवाणी । साकार सांठवे त्यांत जाउनी । बीजामाजीं वट जैसा ॥११६॥निरशुन्यास बोलिजे भंडार । येर भंडार म्हणतां दिसे अनाचार । लटका बागुल म्हणुनी झकविलें पोर । तदन्याय जनें केलें ॥११७॥सकळ धडिता मोडिता वाणी । ईश्र्वरावांचुनि नाहीं मेदिनी । लक्ष चौर्यांशीचा त्रिभुवनीं । व्यापार करीं ॥११८॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP