मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग चवदावा| धातु पाषाणाच्या प्रतिमा प्रसंग चवदावा प्रशस्ति अहंकारानें आत्मज्ञात्याची नागवण ज्ञात्याचा समभाव निवाडा देवता निखंदन मल्हारीच्या मुरळ्या वाघे व भार देवतांस सामर्थ्य नाहीं धातु पाषाणाच्या प्रतिमा शेख महंमद शब्दांवर टीका अंधप्रकाश दृष्टांत शिंदळा भजक देवदेवतांपेक्षा सद्गुरु सेवणें श्रेष्ठ प्रसंग समाप्ति प्रसंग चवदावा - धातु पाषाणाच्या प्रतिमा श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत धातु पाषाणाच्या प्रतिमा Translation - भाषांतर द्रव्य मिळाल्या उन्मत्त होती । सोन्यारूप्याच्या देवता घडवती । दुष्काळ पडल्या मोडून खाती । निश्र्चय नसतां मनी ॥७७॥भक्त पीडोनि देवता लागलया । मोडतेवेळी कां सत्त्वें सांडवल्या । सोनारें हातवडेवरी कुटिल्या । त्यांसी त्या न लागती ॥७८॥जे पाथरवाटे देवते घडलीं । उरावर पाय देऊनि झोडलीं । ते कैसी पूज्य मान्य जालीं । भ्रमिष्ठालागीं ॥७९॥भक्त दुरून कष्टला आला । प्रतिमा शिणला न म्हणे त्याला । पायां पडतां कपाळा चरण आदळला । तरी रक्त सांडे ॥८०॥वोळखा पाथ्रवट सोनार वोतारे । ते देवतांचे पितर खरे । आळविल्या बोलतील खरे । समाधान करुनी ॥८१॥पाथरवट वोतारी सोनार । त्यांनीं प्रतिमांस आणिला आकार । त्यांसीच भाव धरितां साचार । आशिर्वाद बोलती ॥८२॥दधिधृताचें प्रतिमेला मार्जन । त्यावेगळे तपन तर्पण । परी आशिर्वाद नेदी पाषाण । अचेतन म्हणोनियां ॥८३॥पुण्य करुनी पाप आचरण । यालागीं जालें असे ते पाषाण । ते पूजिल्या तैसेंच होईजे जाण । कल्पना धरूनियां ॥८४॥गीता भागवत वचनीं । सांगितलें अर्जुना उद्धवालागुनी । पाषाण पूजितां पाषाण होती मेदिनीं । कृष्ण म्हणे कर्मफळ ॥८५॥ऐका ज्याची जैसी आवडी । त्याला तैसीच लावी गोडी । हें निबंधीं बोले परवडी । कृष्ण पांडवाप्रती ॥८६॥ज्यांचें जैसें आचरण भ्रमण । ते तैसे होती हे साक्ष भारतपुराण । श्रीमुखें वदती आपण । गीता भागवत वचनीं ॥८७॥जे साधुत्वीं गुरुत्वीं माळिका । ते सत्य श्रीमुखीचीं टीका । श्रोतेराज भावें ऐका । परस्परें प्रचीति ॥८८॥ऐसीं हे निबंधसाक्ष वचनें चर्चा साधूच्या मोझ्यानें । शेख महंमद शूरत्वपणें । अव्यक्ते व्यक्तवी ते ॥८९॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP