मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग तेरावा| जाणिवेचा अहंकार प्रसंग तेरावा प्रशस्ति उदक संकल्प कोंकणांतील दैवतें हरिकंदार काळकाई सटवाई आदि देवता सारीं अविद्येचीं लक्षणें गारचकमक-दृष्टांत व्रतें तपें साधनें श्र्वानाचा दृष्टांत मार्गभ्रष्टतेस अविद्याच कारण जाणिवेचा अहंकार खरें जाणतेंपण एकविध भाव प्रसंग समाप्ति प्रसंग तेरावा - जाणिवेचा अहंकार श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत जाणिवेचा अहंकार Translation - भाषांतर साही दरुशनें धांवती साही वांटा । संवादा न मिळती फुटला फांटा । तैशाच चहूं वेदांच्या खटपटा । भरउभरी करिती ॥६२॥तैसेच अठरा पुराणांचे पाल्हाळ । शास्त्रें वाचिल्या होइजे तोंडाळ । कवित्व कथितां होईल विव्हळ । जाणतेपणाचें ॥६३॥जाणीव जाणिवेसी घाली हुंबरी । जैसें श्र्वान श्र्वाना देखोनि गुरगुरी । म्हणोनि जाणीव नको गा श्रीहरि । येणें निवें संकट ॥६४॥माझा गुरु थोर तुझा गुरु लहान । ऐसे भांडती इलामति लावून । येरून येरां अप्रतिष्ठा अपमान । करूनि शाहाणे फिरती ॥६५॥साहीजणांमुखीं एक सद्गुरु असे । नांव उच्चारिणी कैसे करिती झांसे । अहं धरुनी जाले भ्रमिष्ट पिसे । पुसी पुसतील ॥६६॥जाणीवेनें पुसों जातां जगीं । तंव अज्ञानत्व लगतसे अंगीं । जैसें केळ्याला म्हणिजेतील वांगी । तदन्याय जाला असे ॥६७॥एक आत्मा एक पंचकरण त्रिगुण । दुसरा कैंचा हितोपावयालागून । कोणाचें हिरोन दांभिक भूषण । कोणें मान घ्यावा ॥६८॥हें जों नाहीं भासलें निश्र्चलपणें । तों धिंग मनुष्यजन्म ज्यालेपणें । व्यर्थ माता कष्टी केली अज्ञानें । गर्भीहूनि कां गळेच ना ॥६९॥अन्नाची राशी षड्रस पक्वान्ना । त्यावरी जरी सोडिलें दोघां श्र्वानां । काळवंडोनि अन्नाचा करिती धिंगाणा । परि ते स्वादें भक्षीत ना ॥७०॥तैसें स्वयंभ परब्रह्म राशी । स्वादें लुटवे ना साहीजणांसी । येरून येरां दूषिती अपेशी । एकाचींच असोनियां ॥७१॥ Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP