प्रसंग दहावा - सद्‌गुरुचा ‘ना-भी’ कार

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


म्‍हणऊनि म्‍यां धरिलें धीरपण । ऐकिले तुझिया दुःखाचें दंडण । आतां शिष्‍या बोलूं नको होई सावधान । हृदयीं बिंबलों तुझें ॥९७॥
एके शिते कळे हांड्याची पक्वता । तूं काय सांगसी करूनि नेणता । तुवां सांगोन म्‍यां ऐकोन गुणवंता । उशीर लागले ग्रंथीं ॥९८॥
बहुत दिवस पर्वतीं वनस्‍थळीं । बहु सायासें वाढल्‍या प्रभावळी । निमिष न लागतां पावक जाळीं । काचणी लाऊनियां ॥९९॥
तैसी तुज मज आहिक्‍य काचणी। संचितें लागलीं शिष्‍या शिरोमणी। दहन करीन पातकांच्या खाणी। निमिष न लागतां एक ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP