प्रसंग दहावा - मन मुरडून दमन करणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पाहातां मन मर्कटोन्मत्त हस्‍ती । विषयासंगे लागलिया मस्‍ती । मुरडोनि लाविल्‍या सद्‌गुरूचे भक्ति । सायोज्‍यता प्राप्त होय ॥२८॥
सद्‌गुरु म्‍हणती ऐके प्रौढी । मनेंच होईजे ईश्र्वराची जोडी । मनेंचि भोगिजेती नरकाच्या कोडी । भ्रष्‍ट जालियां मन ॥२९॥
न कळतां या मनाचें श्रेष्‍ठ वर्म । म्‍हणती मन हेंचि कर्म अधर्म । गुह्य कळल्‍या मन साकार परब्रह्म । पहा दिसत असे ॥३०॥
सद्‌गुरु म्‍हणे ऐक शिष्‍यकुमरा । जैसी दोरी लावूनि फिरविजे चक्रा । तैसें मन लावावें ऊर्ध्वस्‍वरा । निळारंभ पंथें ॥३१॥
पानचोर्‍या तळीं सात पांच द्वारें । वरील मौकळी गळती अधीरें । तेंच बळकाविल्‍या बरें । तळील वाहूं राहाती ॥३२॥
दुरून सायासें चालविलें पाणी । उंच नीच केली नळाची जोडणी । कळेचे तुषार दिसती नयनीं । नांव कारंजे पावलें ॥३३॥
ऐसेंच मन चढवावें निरंजना । तरीच तूं होसी साधुराणा । सद्‌गुरु सांगते जालें या खुणा । शेख महंमदालागीं ॥३४॥
इतुकें ऐकतांचि उत्तर । शेख महंमदासी आला गहिंवर । म्‍हणे परिसोनि माझा समाचार । मग स्‍वामी खुणा निरोपाव्या ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP