प्रसंग नववा - प्रसंग समाप्ति

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


नवव्या प्रसंगाची समाप्ती । ऐकोनि संत श्रोते मानवती । दहावा ऐकूनि ऐसें बोलती । महा अर्थ धरूनी भावें ॥१०८॥
प्रसंगीं अभंग नव्हता सखोल । श्रोतीं विवंचना करावी नवल । पुढें दहावा प्रसंग सांगेल । शेख महंमद वक्तेपणें ॥१०९॥
शेख महंमद श्रोतियांसी विनवी । तुम्‍ही विवेक घ्‍यावी चवी । आपुले आपण होऊनि अनुभवी । मज वेगळें न सांडावें ॥११०॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP