प्रसंग सहावा - सद्‌गुरु लक्षणें

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


काहाली रांधणें तवा मडकें । स्‍वयंपाकी तापोनि निवविती आणिकें । तैसे सद्‌गुरूचें लक्ष असें निकें । प्रबोध करावयालागीं ॥४४॥
स्‍वयं सावध आणिकांतें करी सावध । हा कुकड्याचे ठायीं असे गुणभेद । तैसाचि सद्‌गुरु करी सावध । ज्ञानसावधपणें ॥४५॥
सायासें झार्‍यानें मेळवूनि माती । उदकें धोऊनि वेंची रती रती । जिनस जिनस वेगळे निवडिती । शोधूनि हेरिती ते पैं ॥४६॥
तैसें स्‍थूळ ते सवा खंडीची मोट । त्‍यामाजी वस्‍तु अद्दष्‍टली चोखट । तो आत्‍मज्ञानानें शोधूं जाणें निकट । सत्‍य सद्‌गुरु झारा ॥४७॥
ऐसा स्‍वयें झारूनि वेगळा तो साधु । त्‍यास आवडे ना द्वैत द्वेष वेवादु । येर उदंड असतील भोंदू । जन रिझऊनियां ॥४८॥
दीप आपण जळे आणिकां प्रकाश । तैसे स्‍वयें सद्‌गुरु करिती उपदेश । आपुलिया याति कुळाचा हिरास । ते करुनी निमाले ॥४९॥
स्‍वयें उन्हांत साउली पालखीस । सुख दुःख कांहीं न कळे तीस । तैसे सद्‌गुरु देह अभिमानास । विसरले महा योगे ॥५०॥
कार्यार्थ बैसे राजा तसखाना । मन न प्रवर्तें देह अभिमाना । तैसे या जनमाजी साधुजना । सुख दुःख वाटे ॥५१॥
भाड्याचें घोडें मनुष्‍यें करुनी । भ्रतारासी भेटावया चालली राणी । हेतु गुंतला पतीचे अनुसंधानीं । भोडकर्‍या घोड्याची चाड नाहीं ॥५२॥
जेव्हां जाऊनि भेटली भ्रतारास । विसरली भोडकर्‍या घोड्यास । तैसा स्‍वयें साधु भोग अलंकारास । अभोक्तपणें असे ॥५३॥
तुटक्‍या वाहना विळा दोर काबाडी । स्‍वप्नामाजी विसरला कुर्‍हाडी । राजपद भोगीत असे आवडी । जागा जाला सांगें ॥५४॥
तैसे सद्‌गुरु देहविषय विसरले । अगाध ते प्रचीतीनें सांगों लागले । ऐसें ऐकोनि शेख महंमद बोले । भाविकांसी भावें ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP