प्रसंग सहावा - अद्वैत शोभेचें महिमान

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ॐ नमोजी अक्षर विस्‍तार बावन मातृकेसी । निराकार गवसिले सहजेसी । मग आकार मांडिलें निरशून्यासी। संस्‍कार छप्पन्न भाषा ॥१॥
शून्य असंख्य युगांचें जुनें निमोलें । तें गुरु राम कृष्‍ण नामें विकिलें । जैसें आकार तरंग नांव ठाकले । जुन्या उदकाचे ॥२॥
जैसे मृगजळाचे राउत हस्‍ती । दुरुनि संग्राम करितां दिसती । ऐसे अवतार गेले असंख्याती । निरशुन्याच्या पोटीं ॥३॥
घटकाश मठाकाश नांवें । महदाकाश म्‍हणती स्‍वभावे । हिरण्यगर्भ बुदबुद करावे । ऐसें ठायीचें ठायी ॥४॥
सिंधूच्या लाटा नांव लहरी पावलें । तैसें अवतरणीं शून्य साहाकारिलें । राम कृष्‍ण दीर्घ नांव पावले । चिन्मात्र चराचर नांवें ॥५॥
केळीचा कंद तैसी शुन्याची टीका । पत्रन्यायें विस्‍तार सायका । घड निपजले तैसे अवतार देखा । केलें तैसें साधु गोड ॥६॥
घड निपजल्‍या आधीं धड छेदिले । तैसे सद्‌गुरूनें मज मायेसी केलें । परतोनि केळ्यांसी जन्म नाहीं जाले । साक्षात्‍कारें बोलिलें ॥७॥
ऐसें शुन्य प्रबळत्‍वाचा डोहो असे । त्‍यांत अवतार राम कृष्‍ण न दिसे । मिथ्‍या असती द्वैतपणाचे फांसे । मृगजळ जैसें मुरी ॥८॥
ऐसें हे अद्वैत शोभेचें महिमान । तेथें याति वर्ण नाहीं गुण अवगुण । जाणतील ते सद्‌गुरु संपूर्ण । त्‍यांची दीक्षा सांगेन ॥९॥
आतां सांगतों सद्‌गुरूचे चिन्ह । मेरु तुका न ये ऐसें महिमान । विकासे शेख महंमद मुसलमान । ऐहिक्‍य श्रोत्‍यां सांगेन ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP