TransLiteral Foundation

प्रसंग दुसरा - संवेदना-दृष्‍टांत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.



गुरूची शिष्‍यास संवेदना-दृष्‍टांत
चावटी करूनियां पुससी । तूं बहु निःसंग जालासी । सांग कवणें चिथावलासी । सत्‌शिष्‍या सगुणा ॥५१॥
स्‍वामी चिथावलों तुमच्या कृपादृष्‍टीं । म्‍हणोनि जाली आगमेसी भेटी । आणि दुजा कोण असे सृष्‍टीं । चिथाविता मजला ॥५२॥
मह तुम्‍हांवाचूनि नेणें दुसरा जैसी कन्या ध्यातसे माहेरा । आणि वत्‍स हुंबरें धेनुक्षीरा । तैसा मी तुम्‍हांप्रती ॥५३॥
जैसें कोरड्या काष्‍टाचें बाहुलें । खांब सूत्रानें बोलुन बोलाविलें । तैसें तुम्‍ही मला चेतविलें । आपुल्‍या सामर्थ्ये ॥५४॥
नाना नग घडे मोडे भूषण सोनारा । तैसें भूषण दिधलें दातारा । कवित्‍व रस बंदिस्‍त अक्षरां । तुझीं तूंचि बैसविसी ॥५५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:08.9370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कलतान

  • न. ( व .) तागाचें जाड विणलेलें कापड ; कंतान ; बारदान . ' भुसान मालाचें बारदान ... मोठें कलतानी असल्यास २॥ रत्तल वजन धरतात .' - मुव्यां ६६ . ( कंतान पहा .) 
RANDOM WORD

Did you know?

अष्टगंधात कोणकोणते घटक असतात?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site