मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|योगसंग्राम| प्रास्ताविक ७ योगसंग्राम प्रास्ताविक १ प्रास्ताविक २ प्रास्ताविक ३ प्रास्ताविक ४ प्रास्ताविक ५ प्रास्ताविक ६ प्रास्ताविक ७ प्रास्ताविक ८ प्रास्ताविक ९ प्रास्ताविक १० प्रास्ताविक ११ योगसंग्राम - प्रास्ताविक ७ श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. Tags : kavitapoemsaintsheikh muhammadकविताकाव्यमराठीशेख महंमदसंत प्रास्ताविक ७ Translation - भाषांतर भक्तीचे दोन प्रकारः एक काम्य ऐहिक फलप्राप्तीसाठी व दुसरी निष्काम पराप्राप्तीसाठी. अज्ञ माणें ही काम्य भक्ती म्हणजे भक्तिभावसर्वस्व असें कल्पून मुख्य ईश्र्वराला विसरतात. या प्रवृत्तीचें निखंदन करण्याकरितां शेख महंदानें या दुर्बल पाषाणी देवदेवतांवर, नवससायास करणार्या भक्तांवर, या देवतांप्रीत्यर्थ व्रतकैकल्यें आचारणारे व्रती, मुरळ्या, वारकरी इत्यादि व्रतनिष्ठांवर, अंगारेधुपारे देणार्या भोपी वगैरेंवर तपशिलवार टीका केलेली आहे. या अनिष्ट प्रवृत्तीचा उपहास करावा तितका थोडाच आहे. परंतु असा सार्वत्रिक उपहास होत असतांनासुद्धा या देवदेवतांचें प्राबल्य कमी होण्याऐवजी नवीन देवता उत्पन्न करण्याची अहमहमिका वैकुंठवासी झालेल्या संतसाधूंचे स्वार्थी, लबाड, भक्त म्हणवून घेणारे लोक या साधूंचे त्यांच्यामागे देवदेव्हारे करून अज्ञ भक्तोपासकांस नवसासायासास प्रवृत्त करीत आहे ही खेदाची गोष्ट आहे. या कुशिष्यांच्या कृतीचे दोष आपल्या शिरावर येत आहेत हे पाहून त्या संतसाधूंना काय वाटत असेल याचा विचारच या मंडळींचे मनाला शिवत नसावासा वाटतो. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP