मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नामसंकीर्तन माहात्म्य| अभंग १३ ते १५ नामसंकीर्तन माहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ नामसंकीर्तन माहात्म्य - अभंग १३ ते १५ सदर अभंग संत जनाबाइंना उद्देशून रचिले आहेत. Tags : abhangjanabainamdevpadअभंगजनाबाईनामदेवपद अभंग १३ ते १५ Translation - भाषांतर १३. येऊं ऐसें जाऊं । जनासंगें होंचि दाऊं ॥१॥आपण करूं हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥नाम संशयछेदन । भवपाशाचें मोचन ॥३॥जनी म्हणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥१४. हरिहर ब्रम्हादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥जपें तपें लाजविलीं । तीर्थें शरणागत आलीं ॥३॥नामदेवा कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥देव श्रुतीं देती ग्वाही । जनी म्हणे सांगूं कायी ॥५॥१५. व्हावें कथेसी सादर । मन करूनियां स्थीर ॥१॥बाबा काय झोंपी जातां । झोले चौर्यांशींचे खाता ॥२॥नरदेह कैसारे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥आळस निद्रा उटाउठी । त्यजा स्वरूपीं घाला मिठी ॥४॥जनी म्हणे हरिचें नाम । मुखीं म्हणा धरुनि प्रेम ॥५॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP