मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|नामसंकीर्तन माहात्म्य| अभंग ७ ते ९ नामसंकीर्तन माहात्म्य अभंग १ ते ३ अभंग ४ ते ६ अभंग ७ ते ९ अभंग १० ते १२ अभंग १३ ते १५ नामसंकीर्तन माहात्म्य - अभंग ७ ते ९ सदर अभंग संत जनाबाइंना उद्देशून रचिले आहेत. Tags : abhangjanabainamdevpadअभंगजनाबाईनामदेवपद अभंग ७ ते ९ Translation - भाषांतर ७. तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥काम होऊनि निष्काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥८. नाम विठोबाचें ध्यावें । मग पाउल टाकावें ॥१॥नाम तारक हें थोर । नामें तारिले अपार ॥२॥आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥नाम दळणीं कांडणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥९. निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रम्हींचें ठेवणे ॥१॥प्रयत्नें काढिलें बाहेरी । संतसाधु सवदागरीं ॥२॥व्यास वसिष्ठ नारद मुनी । टांकसाळ घाटली त्यांनीं ॥३॥उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनीं आटविली चांदी ॥४॥केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥६॥ N/A References : N/A Last Updated : January 23, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP