मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|संत नामदेव रचित गवळण| १६ ते २० संत नामदेव रचित गवळण १ ते ५ ६ ते १० ११ ते १५ १६ ते २० २१ ते २५ २६ ते ३० ३१ ते ३४ गवळण - १६ ते २० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevअभंगगवळणनामदेव १६ ते २० Translation - भाषांतर १६. घाघरिया छंद चरण घवघवी । अरुणा दाखवी चरणतळीं ॥१॥आरुता येई कान्हा देईं आलिंगन । उतरी निंबलोण मुखावरुनी ॥२॥वाघनखें कडदोरा कंठीं घालूनि सरी । झणीं तुज मुरारी द्दष्टी लागो ॥३॥अंबुलें लोळिया कटीं रिठे गांठी । छंदें जगजेठी हालवी मान ॥४॥भाळीं चंदन वरि मसीचा टिळकला । झणीं तुज गोपाळा द्दष्टी लगे ॥५॥नामयाचा स्वामी हरि माझें चिंतणें । छंदें गीत गाऊं नाचूं मी सदा जाणें ॥६॥१७. कृष्ण डोलतु रांगतु रंगणीं । इडापीडा धांवोनी घेती गौळणी ॥१॥जीवापरीस हें बाल्हें बाळक । शिणलिया विसांवा त्याचें पाहे श्रीमुख ॥२॥सर्व सुख याचेनी मनोहरें । तेंचि खेळवितां धनी मन न पुरे ॥३॥देह गेह नाठवे सर्वथा । सुत पतीची मावळली वार्ता ॥४॥सुख न सांगवे वैखरी कोंदली । रूपीं रमतां मनें बुडी दिधली ॥५॥नामया स्वामी सुखाचा सागरू । कृष्ण खेळविताम सुफळ हा संसारू ॥६॥१८. चाल सखिये वेगु करीं वहिला । दिन सरला काळ थोडा उरला ॥१॥आवडी घेऊं गे निजसुख धनीचें । आर्त पुरोनी जें उरलेंसे मनींचें ॥२॥कृष्णमुख पाहे द्दष्टी भरोनी । चित्त सांडी कुरवंडी करोनी ॥३॥झणीं विसरसी हे खूण निरुती । मग अंतरलें सर्व सुख पुढती ॥४॥हाचि निर्धार करुनियां मानसीं । आंत बाहेरी हरिरूप देखसी ॥५॥नामया स्वामी राजीवलोचनु । रमारमणू तो जीवींचा जीवनू ॥६॥१९. हातीं घेवूनियां काठी । शिकविते श्रीपती । यमुनेची माती । खासी कां कां कां कां ॥१॥हरी तूं खोडी नको करूम माझ्या बा बा बा बा ॥ध्रु०॥धांऊनियां धरिला करीं । बैसविला मांडिवरी । मुख पसरोनि करी । आ आ आ आ ॥२॥विष्णुदास नामा म्हणे । मरोनियां जन्मा येणें । कृष्ण सनातन पाहूं । या या या या ॥३॥२०. गौळणी ठकविल्या । गौळणी ठकविल्या । एक एक संगतीनें मराठी कानडीया । एक मुसलमानी । कोकणी । गुजरणी अशा पांचीजणी गौळणी ठकविल्या ॥ध्रु०॥गौळणी सुंदरी । गौळणी सुंदरी । गेल्या यमुनेतीरीं । वस्त्रें फेडूनियां स्नान करिती नारी । गोविंदानें वस्त्रें नेलीं कळंबावरी । स्नान करोनियां त्या आल्या बाहेरी ॥१॥लडोबा गोविंदा । लडोबा गोविंदा । निरवाणी आज । आडचाल्लो पडचाल्लो । शीर फोडया न कोडो । मारी कन्हय्या पानी खेळ्या न खेळो ॥२॥देखेरे कन्हय्या । देखेरे कन्हय्या । मै इज्यतकी बडी । कदम पकडुंगी । मैयां कुटीजुडी । मेरी चुनरी दे मेरीले दुल्लडी ॥३॥देवकी नंदना देवकी नंदना । तूं ऐक श्रीपती । उघडी हिंवाची तुज विनवूं किती ।पायां पडत्यें बा । मी येत्यें काकुळती । माझी साडी दे । घे नाकाचें मोतीं ॥४॥पावगा दाताला । पावगा दाताला । तूं नंदाचा झिलो ।माकां फडको दी । मी हिंवान मेलों । घे माझो कोयतो । देवा पायां पडलों ॥५॥ज्योरे माधवजी । ज्योरे माधवजी । मे शरण थई । तनकाकाकैपी । बाप दयाळ तूंही । मारी साडी आपो । हातणीले कंकणी ॥६॥इतुकें ऐकुनी । इतुकें ऐकुनी । देव बोले हांसोनी । सूर्या दंडवत करा कर जोडुनी । नामाविनवितो । म्हणे सारंगपाणीं । गौळ्या ऐक तूं । धन्य तुझी करणी ॥७॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP