उत्तरार्ध - अध्याय ३९ वा

हरिवंशांतल्या आर्यारचना आर्याभारताच्याच तोलाच्या आहेत.


बळदेवान्हि अद्भुत, ज्याच्या संकीर्तनें निवे ताप, ।
पाप त्रासोनि पळे, गरुडाच्या जेंवि भनुजपें साप. ॥१॥
आत्मविनाशाकरितां जेव्हां प्रद्युम्न शंबरें हरिला, ।
सुत सांब याचि मासीं शंभुवरें प्राप्त जाहला हरिला. ॥२॥
सांबावरि राम करी प्रेमा, शस्त्रास्त्र सर्व या सिकवी, ।
मानिति रामासि जसें यादध, सकळहि तसेंच यासि कवी. ॥३॥
दुर्योधन यज्ञ करी, देखाया पातले नरेश तदा, ।
ऐकति ते तज्ज्ञमुखें प्रभुचे संपत्तिगुण बरे शतदा. ॥४॥
दूत प्रेषुनि, करुनी प्रभुसीं संधान, भूप सर्व तया ।
भेटों जाति, म्हणे त्यां पक्षिरवें रैवताख्य पर्वत “या” ॥५॥
पांडवकौरवकोसलगंधारप्रमुख देशपति, अन्य ।
आले; त्यांच्या सेना अठरा अक्षौहिणी सुराजन्य. ॥६॥
भेटे त्यांतें सुखघन, बैसे सिंहासनीं, तया बसवी, ।
वसवी चकोर, ते प्रभु चंद्रचि, सत्कार तो सुधारस वी. ॥७॥
तेजस्विप्रभुदर्शनहृष्ट कथिति धर्मनयकथा राजे, ।
देते हिमालयींहि अहितजनां तापकर न थारा जे. ॥८॥
तों तेथें श्रीनारद आला, सिंहासनीं, प्रभुसि पाहे ।
वाहे प्रभु भव्यासन, तेथें सानंद साधु तो राहे. ॥९॥
प्रभुसि म्हणे, “देवांत श्रीशा ! आश्चर्य, धन्य, तूं मात्र; ।
कृष्णा ! लोकांत नसे तुजवांचुनि अन्य या यशा पात्र.” ॥१०॥
प्रभु मुनिस म्हण,ए “साधो ! जें तूं वदलास काय, गा ! बा ! हें ।
सत्य, परि दक्षिणासह धन्यहि, आश्चर्यहि, स्वयें आहे”, ॥११॥
ऐकुनि देवर्षि म्हणे, “कृष्णा ! पर्याप्तवाक्य मी झालों, ।
जातों, दया असों दे, देवा ! यास्तवचि या स्थळा आलों.” ॥१२॥
इतुकें वदोनि निगतां, विनवुनि कृष्णासि, पुसति ते राय, ।
“सांग, विभो ! तूं नारद दोघे हें गूढ बोलिलां काय ?” ॥१३॥
श्रीकृष्ण म्हणे, “नृप ! हो ! हें या देवर्षिनेंचि सांगावें, ।
अर्थिजनें, कल्पतरु त्युजुनि, परातें धनार्थ कां गावें ?” ॥१४॥
मग देवदेव मुनितें हंसुनि म्हणे, “यांसि सांग, बा ! राहे, ।
तुजचि यश मिळे, न परा धुवुनि तपें अब्द आंग बार हें,” ॥१५॥
बैसुनि कांचनपीठीं, देवर्षि वदे, “नृपाळ ! हो ! परिसा, ।
स्नानार्थ सुरनदीप्रति गेलों, भीती जिच्या जळा अरि सा. ॥१६॥
गंगेंत देखिला म्यां तो कूर्म क्रोशमंडलाकार, ।
स्पर्शुनि वीणाकारा, वदलों, ‘तूं धन्य कच्छपा ! फार.’ ॥१७॥
मज कूर्म म्हणे, “कांहीं नाहीं आश्चर्य, धन्य, बा ! हा मी, ।
जीत असे बहु, गंगा धन्या, आश्चर्यरूपिणी, स्वामी !” ॥१८॥
गंगेतें वदलों, “तूं माते ! आश्चर्य भूषिता, धन्या.” ।
“आश्वर्य धन्य !’ ऐसें वदतां, प्रकटोनि, भेटि अर्णव दे, ।
“जीवरि मी, हे धन्या भूमि,” असें सिंधु शुद्ध वर्ण वेद. ॥२०॥
‘आश्चर्य ! धन्य !’ म्हणतां, क्षितिहि म्हणे, “मज म्हणों नको, पावें. ।
पर्वत सर्व तसे, बा ! हरिति मला, कीं, तिंहीं न कोपावें.” ॥२१॥
नृप हो ! क्षितिची झाली कर्णाला उक्ति तोखराशि खरी, ।
आश्चर्य धन्य गमला, जो मेरुप्रमुख, तो खरा सिखरी. ॥२२॥
मग सर्व भूधरांतें म्हणतां ‘आश्चर्य ! धन्य !’ ते प्रणती ।
करुनि, “प्रजापतीतें म्हण, देवर्षे !" असें मला म्हणती. ॥२३॥
वदलों प्रजापतिस मी, ‘देवा ! आश्चर्य ! धन्य ! तूं कर्ता, ।
भर्ता, या विश्वाचा, भक्ताचा पातकव्यथाहर्ता. ॥’२४॥
तों विधि मला म्हणे, “म्हण, वत्सा ! ‘आश्चर्य ! धन !’ वेदांतें, ।
हे ज्ञानामृतघन या मोरच्या हरिति सर्व खेदांतें. ॥२५॥
वदलों त्या, ‘आश्चर्यहि धन्यहि कथिलांत वेद ! हो ! तातें, ।
हरिलें अज्ञान तुम्हीं , जेणें जीवासि खेद होता, तें.’ ॥२६॥
वेद वद्ले, “प्रजांतें देती जी रति नरेश महिवर, ती ।
आम्हां मख, यांसि भजुनि भाग्य, महद्यश, अरे ! शमहि,  वरती. ॥२७॥
आश्रय आम्हां मख, रे ! न खरे याहूनि सर्व जे अन्य, ।
आश्चर्य जगीं यज्ञचि, देवर्षे ! हेचि जण बा ! धन्य.” ॥२८॥
ब्रहयाहुनि वेद परम, वेदाहुनि प्रम यज्ञ, हें कळलें; ।
मन्मन सद्यश जिकडे, खावू तिकडेचि तोकसें वळलें. ॥२९॥
गुरु गमले जे, त्यांवरि कळतां मख परम, मी न कां बदलों ? ।
‘आश्चय, धन्यहि, तुम्ही, यशहि त्रिजगांत मुख्य,’ हें वदलों. ॥३०॥
मख वदले, “विष्णुचि जो जाणे आश्चर्य, तो कवि नयज्ञ; ।
त्या ‘धन्य’ म्हणे, तद्वच गुरुसि रुचे, जेंवि तोक विनयज्ञ. ॥३१॥
आश्चर्य परम विष्णुचि, धन्य परम एक विष्णु, हा नियम; ।
हें बोधामृत पी ना, त्यासी न करील काय हानि यम ? ॥३२॥
आश्चर्य धन्य विष्णुचि, देधर्षे ! यज्ञ दक्षिणासहित, ।
धन्य असा अन्य नसे, संन्यस्ताखिलमहत्सभामहित.” ॥३३॥
यज्ञोक्त असें ऐकुनि, आलों येथें खरें करायास, ।
सफळ मदायास जसा, मार्गीं रचिल्या सरें करायास. ॥३४॥
आलों  शोध करित, तों श्रीविष्णु विलोकिला तुम्हांआंत, ।
बद्धहि, मुक्तहि, काळव्याघ्राचे हाचि करितसे दांत.” ॥३५॥
जें आश्चर्यत्व, तथा धन्यत्वहि जें, जगीं असे, याची ।
श्रीकृष्ण पराकाष्ठा वर्णुनि, कूर्मादि मुनि कथी साची. ॥३६॥
श्रीकृष्ण म्हणे, ‘जे बहुदक्षिण मख करुनि, यज्ञपतिस मज ।
यजति, तयांसचि होत्ये हे, इतरां दुर्लभाचि अति समज.’ ॥३७॥
मुनि कथुनि असें, गेला, प्रभुहि, अमृततृप्तकर्ण ते राजे ।
किति हें ज्ञान सुरक्षिति, जपति महामंत्रवर्ण तेरा जे. ॥३८॥
हें ध्यनोपाख्यान’ श्रवण करावें, कधीं  न भागावें, ।
देवांनींहि विमानीं बसुनि सुखें लंघितां नभा, गावें. ॥३९॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP