TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

निदर्शन अलंकार - लक्षण ३

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


लक्षण ३
ह्या ठिकाणीं डोळ्याच्या कोंपर्‍याची लीला व लाटांची लीला ह्या दोहोंचे आश्रय (डोळा व समुद्रा) भिन्न असल्यामुळें, त्या लीला जरी भिन्न असल्या तरी, त्या दोहोंमधील साद्दश्यामुळें, त्या दोन्ही एकरुप आहेत, असें मानलें आहे. अथवा येथें डोळ्याच्या कोंपर्‍या लाटांच्या लीलेचा आरोप केला आहे. (असें म्हणा).
अथवा (पदार्थनिदर्शनेचें) हें दुसरें उदाहरण :---
“घामानें ओलसर व थरथरणारा असा सीतेचा हात, रामानें आपल्या हातांत धरला असतां, दंवाचे थेंव व वार्‍याची झुळुक यांनीं विव्हळ (आकुल) होणार्‍या सकाळच्या कमळाची शोभा धारण करता झाला.”
ह्या ठिकाणीं दंवाच्या थेंबांनीं विव्हळ होणें म्ह० दंवाच्या थेंबांनीं भरून जाणें; व वार्‍यानें विव्हल होणें म्हणजे वार्‍यानें हालणें, या हिमांबुविव्हलता व मंदानिलविव्हलता यांच्याशीं, सस्वेदता व सकम्पता यांचा बिंबप्रतिबिंबभाव आहे; हा वरील पदार्थनिदर्शनेच्या दोन उदाहरणांत फरक. प्रभातपद्म ह्यांत पद्माचे जवळ ‘प्रभात’ हा शब्द असल्यानें कमळाचें थोडेंसें उमलणें (उघडणें) व थोडेंसे मिटणें हे धर्म प्रतीत होतात. व या दोन धर्मांची सीतेच्या हातावरही प्रतीति होते. पदार्थनिदर्शनेंत उपमान व उपमेय यांच्यांतील धर्मांत आर्थ अभेद प्रतीत होतो; (आणि वाक्यार्थ निदर्शानेंत मुख्य दोन विशेष्यांत अभेद सूचित होतो हा फरक.) म्हणून हिला पदार्थनिदर्शना म्हणतात. (निदर्शनेंत) बिंबप्रतिबिंबभाव मात्र उपमान व उपमेय यांचीं विशेषणें असलीं तरच त्यांच्यांत होतो; पण विशेषणें नसलीं बिंबप्रतिबिंबभाव होतच नाहीं; हा सुक्ष्म फरक (ध्यानांत ठेवावा).
येथें एक शंका अशी :--- वाक्यार्थनिदर्शानेंत शोधयन्त: व गवेषयन्ति या रूपांनीं शोधनक्रियाविशिष्ट शोधणारे (कर्ते) व गवेषणक्रियाविशिष्ट गवेषण करणार (कर्ते) असा विशेषणविशिष्ट कर्त्यांचा बोध करणार्‍या शब्दांनीं, त्या कर्त्यांच्या शोधन व गवेषण या क्रियारूपी विशेषणांचाही निर्देश केला असल्यानें, त्या दोन क्रिया उपात्त आहेत, व त्यामुळें ह्या ठिकाणीं दोन उपात्त क्रियांचा अभेद आहे हें तर ठीक आहे. पण पदार्थनिदर्शनेंत (पद्मस्य बभार सोभाम्० इत्यादि श्लोकांत) उपमान जें पद्म याचीच फक्त (उपमेय व उपमान या दोघांच्या शोभेपैकीं उपमानाचीच) शोभा येथें शब्दानें सांगितलेली आहे; दोहोंची शोभा येथें उपात्त नाही.” (मग जेथें एक शोभा इजरच नाही, तेथें तिचा दुसर्‍या शोभेशीं अभेद कसा करतां येईल ?) या शंकेवर उत्तर असें :--- येथें जो ‘शोभा’ शब्द आहे त्यानें शोभात्व (जाति) हा अर्थ दाखविला असल्यानें, दोन्हीही शोभा उपात्त आहेत (असें मानायला हरकत नाहीं, करण शोभात्व जातीच्या पोटांत शोभाव्यक्ति आल्याच). वरील श्लोकांत सांगितलेली शोभा उपमेयाची अथवा उपमानाची व्हायला ती उपमेयाची अथवा उपमानाची अवच्छेदक या रूपानेंच (म्ह० विशेषण म्हणून) आली असली पाहिजे असा कांहीं अभिप्राय नाहीं; तसा असतां तर येथें (म्ह० पदार्थनिदर्शनेंत) वरील लक्षणाची अव्याप्ति झाली असती. अथवा, (यद्वा) येथें ‘उपात्तयोरर्थयोरार्थ: अभेद:’ इ० हें लक्षण वाक्यार्थनिदर्शनेचें आहे, पदार्थनिदर्शनेचें नाहीं, (असें समजा) आणि हिचें (म्ह० पदार्थनिदर्शनेचें) लक्षण, “उपमानोपमेययोरन्यतरधर्म स्यान्यतरत्रारोप:” (उपमान व उपमेय यांपैकीं कुणाच्या तरी धर्माचा कुणावर तरी (उपमान व उपमेय यांपैकीं कुणावर तरी) आरोप, असें समजा. तुम्ही म्हणाल, “ठीक आहे, (तुम्ही म्हणतां तसें.) पण, वाक्यार्थनिदर्शना रुपकध्वनीनें गतार्थ होतें, व पदार्थन्दर्शना निगीर्याध्यवसानरूप अतिशयोक्तीनें गतार्थ होतें. (म्ह० रूपकध्वनीनें व अतिशयोक्तीनें या अलंकाराच्या दोन्हीही प्रकारांचें काम भागत असल्यानें निदर्शनेच्या या दोन्हीही प्रकारांची जरूर नाहीं.) ” पण तें चूक आहे; कारण, वाक्यार्थ निदर्सनेंत, रूपक गुणीभूत असल्यानें, रूपकध्वनि येथें होऊच शकत नाहीं. नाहींतर (म्ह० गुणीभूताणेम ध्वनीचें काम भागत असेल तर) गुणीभूत उपमेनें रूपकाचेंहीं काम भागतें, असें म्हणण्याची पाळी येईल. शिवाय पदार्थनिदर्शनेचें शरीर, उपात्त पदार्थांचा परस्पर अभेद एवढेंच असल्यानें, तो अभेद उपमेय व उपमान ह्या दोहोंवरही राहतो; पण रूपक व अतिशयोक्ति या दोहोंतही उपमेयावर उपमानाचा अभेद असतो. (उपमानावर उपमेयाचा अभेद नसतो). आतां अतिशयोक्तींत निगरण असतें. व रूपकांत नसतें, हा या दोहोंत फरक आहे, ही गोष्ट निराळी. अशारीतीनें, निदर्शनेचा रूपक व अतिशयोक्ति यांहून निराळेपणा स्पष्टच आहे. म्हणूनच (म्ह० निदर्शनेंत अभेदाची विश्रांति उभयावर असल्यानें,) ‘त्वामन्तरात्मनि०’ या पद्यांत, ‘गवेषयन्ति’ ऐवजी गवेषयन्त; असें करून (म्ह० शोधणारा असें करून० व त्या शब्दाला अनुवाद्य बनवून (म्ह० उद्देश्यकोटींत टाकून) शोधयन्ति (शोधतात) असें विधान केलें (म्ह० शोधयन्ति ला विधेय केलें) तरी, व पूर्वार्धाला उत्तरार्ध व उत्तरार्धाला पूर्वार्ध बनविलें तरी, त्यांत सौंदर्याची कांहींही हानी होणार नाहीं (कारण अभेद उभयांवर असल्यानें, त्याचें विधान दोहोंपैकीं कुणावरही केलें तरी चालेल.) पण वाच्यरूपकांत अशी उलटापालट केली तर, रूपकांतील व्यंग्य कक्षेंतील उद्देश्यविधेयभाव हा थेट वाच्यकक्ढेंतील उद्देश्यविधेयभावाला अनुसरुनच होत असल्यानें, उपमानाचे ठिकाणीं उपमेयाच्या अभेदाची सिद्धि (म्ह० चंद्राचे ठिकाणीं मुखाच्या अभेदाची सिद्धि) होऊ लागेल; आणि मग, सगळेंच तिरपगडें होण्याची वेळ येईल, ही गोश्ट विद्वानांनीं ध्यानांत घ्यावी.  आतां अलंकारसर्वस्वकारांनीं,
“तुझ्या पायाच्या नखरूपी रत्नांना अळित्याचा रंग लावणें म्हणजे चंदनाच्या लेपानें चंद्राला पांढरे करणे आहे.”
हें पद्य वाक्यार्थनिदर्शनेचें उदाहरण देऊन म्हटलें आहे, “ज्या ठिकाणीं प्रकृत वाक्यार्थावर दुसर्‍या (म्ह० अप्रकृत) वाक्यार्थाचा सामानधिकरण्यानें आरोप केला जातो, त्या ठिकाणीं, दोहोंचा संबंध न जुळणें यावर आधारलेली निदर्शनाच मानणें योग्य आहे, रूपक मानणें योग्य नाहीं.” हें त्यांचें म्हणणें योग्य नाहीं; कारण त्यांचें हें म्हणणें मान्य केलें तर, वाक्यार्थरूपकाला तिळांजळी देण्याची पाळी येईल. तुम्ही (अलंकारसर्वस्वकार) म्हणला, “जाई ना रूपक; ती आपत्ति आम्हांला इष्टच आहे;” पण यावर “निदर्सनेचीच हकालपट्टी करून रूपकाचाच स्वीकार करा कीं,” असा तोडीस तोड म्हणून, आम्हांलाही प्रश्न करतां येईल. आणि खरें म्हणजे, या श्लोकांत रूपक असणेंच योग्य आहे. पदार्थरूपकांत, उदा० मुखं चंद्र: ह्या ठिकाणीं, सिद्ध झालेला अभेदारोप रूपकाचा प्राण आहे, अशी कल्पना करणेंच योग्य आहे. (याचे उलट) ‘नुद्शोभां वहत्यास्यम’ (तोंड चंद्राची शोभा धारण करतें,) या पदार्थनिदर्शनेंत (शाब्द) अभेदारोप मुळींच नसल्यानें, अभेदारोपाला निदर्शनेचा प्राण समजणें, योग्य नाहीं. आतां रूपकांत बिंबप्रतिबिंबभाव नसतो, व निदर्शनेंत मात्र असतो, असें म्हणणें म्हणजे, शपथेवर (कांहींतरी) सांगण्यासारखें आहे; कारण असें म्हणण्याला युक्तीचा आधार नाहीं. (बरे, ‘त्वत्पादनख०’ या श्लोकांत रूपक मानलें तर वाक्यार्थनिदर्शनेला जागाच राहणार नाहीं, असें म्हणत असाल तर,) आम्ही दिलेल्या उदाहरणांत (त्वामन्तरात्मनि० यांत) वाक्यार्थनिदर्शनेला (भरपूर) जागा आहे. (तेव्हां रूपकानें जागा अडविल्यास, निदर्शनेनें जावें कुठें ? अशी भीति नको.)

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:05.4200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निपराद

  • वि. १ दुष्ट ; नीच . - एभा ३ . ४३१ . बाळ बापा म्हणे काका । तरी कां निपराध पारिखा । - तुगा ३२४८ . २ निरुपयोगी ; व्यर्थ . रानी वसती औषधी । तरि कां म्हणाव्या निपराधी । - तुगा ३५३२ . [ ? नि + अपराध ] 
RANDOM WORD

Did you know?

महावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site