मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|निदर्शन अलंकार| लक्षण २ निदर्शन अलंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ लक्षण ६ निदर्शन अलंकार - लक्षण २ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण २ Translation - भाषांतर ह्या निदर्शनेला वाक्यार्थनिदर्शना म्हणतात. दोन विशेषणविशिष्ट व्यवहार, प्रकृत धर्मींतच एकत्र येऊन त्यांच्यांत आर्थ (सूचित अथवा गम्य) अभेद असेल तर, त्याला वाक्यार्थनिदर्शना म्हणणें इष्ट आहे. ह्या वाक्यार्थनिदर्शनेंत, वाक्यांतील घटकपदार्थांचा बिंबप्रतिबिंबभाव असणें आवश्यक असतें.पदार्थनिदरशनेचें उदाहरण :---“इंद्र वगैरे अगणित परमपुण्यशाली देवांना परिचित (ओळखीचा० असलेला, जगाची उत्पत्ति, स्थिति व प्रलय यांना घडवून आपण्याच्या कलेंत प्रवीन, अमृतसागराच्या उसळणार्या लाटांच्या लीलेनें शोभणारा (म्ह० त्याच्यासारखा) असा तुझ्या डोळ्यांचा कोंपरा माझ्या सर्व पापांचा हळूहळू नाश करो.”ह्या ठिकाणी डोळ्याच्या कोंपर्याची लीला व लाटांची लीला ह्या दोहोंचे आश्रय (डोळा व समुद्र) भिन्न असल्यामुळें, त्या लीला जरी भिन्न असल्या तरी, त्या दोहोंमधील साद्दश्यामुळें, त्या दोन्ही एकरूप आहेत, असें मानलें आहे. अथवा येथें डोळ्याच्या कोंपर्यावर लाटांच्या लीलेचा आरोप केला आहे. (असें म्हणा).अथवा (पदार्थनिदर्शनेचें) हें दुसरें उदहारण :---“घामानें ओलसर व थरथरणारा असा सीतेचा हात, रामानें आपल्य हातांत धरला असतां, दंवाचे थेंव व वार्याची झुळुक यांनीं विव्हळ (आकुल) होणार्या सकाळच्या कमळाची शोभा धारण करता झाला.” पहिल्या श्लोकांत, अभेद एक वाक्यांत आलेला आहे. या श्लोकांत अभेद दोन निराळ्या वाक्यांत सूचित केलेला आहे. पूर्वींच्या श्लोकांत अभेद दोन वस्तूंमधील (क्रियांमधील) औपम्यावर आधरलेला आहे; या श्लोकांत दोन औपम्यांचा म्ह० औपम्यज्ञानांचा (तूं इतर देवांसारखा आहेस, व आकाश जाळ्यांच्या पोकळीसारखें आहे या दोन साद्दश्यज्ञानांचा) अभेद आहे, हा या दोहोंतील अभेदांत फरक.ह्या निदर्शनेला वाक्यार्थनिदर्शना म्हणतात. दोन विशेषणविशिष्ट व्यवहार, प्रकृत धर्मीतच एकत्र येऊन त्यांच्यांत आर्थ (सूचित अथवा गम्य) अभेद असेल तर, त्याला वाक्यार्थनिदर्शना म्हणणें इष्ट आहे. ह्या वाक्यार्थनिदर्शनेंत, वाक्यांतील घटकपदार्थांचा बिंबप्रतिबिंबभाव असणें आवश्यक असतें.पदार्थनिदर्शनेचें उदाहरण :---“इंद्र वगैरे अगणित परमपुण्यशाली देवांना परिचित (ओळ्कखीचा) असलेला, जगाची उत्पत्ति, स्थिति व प्रलय यांना घडवून आणण्याच्या कलेंत प्रवीन, अमृतसागराच्या उसळणार्या लाटांच्या लीलेनें शोभणारा (म्ह० त्याच्यासारखा) असा तुझ्या डोळ्यांचा कोंपरा माझ्या सर्व पापांचा हळूहळू नाश करो.” N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP