मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|रसगंगाधर|दीपक अलंकार| लक्षण ५ दीपक अलंकार लक्षण १ लक्षण २ लक्षण ३ लक्षण ४ लक्षण ५ लक्षण ६ लक्षण ७ दीपक अलंकार - लक्षण ५ रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे. Tags : grammerrasagangadharमराठीरसगंगाधरव्याकरण लक्षण ५ Translation - भाषांतर (ह्या श्लोकांत ‘भाति’ हा एक साधारण धर्म श्लोकाच्या प्रारंभीं आला आहे.)“लावण्यामुळें तरुण स्त्री, मदाच्या अतिरेकामुळे श्रेष्ठ हत्ती, व वैभवामुळें तूं, (भवकान् = भवान्) व तुझ्यामुळें पृथ्वीमंडळ शोभतें.” (येथें भाति हा एक धर्म श्लोकाच्या मधोमध आला आहे.)“स्वर्ग इंद्रामुळें, पाताळ सर्पश्रेष्ठ वासुकीमुळें, (शब्दश :--- सर्पाच्या कुळाच्या कुण्डलरूप अशा), व हे लोकांचें भूषण असणार्या व शत्रूंचें खंडन करण्यार्या राजा ! हें भूमण्डल तुझ्यामुळें अत्यंत शोभतें.”(येथें विभातितमाम् हा एक धर्म श्लोकाच्या शेवटीं आला आहे).अशा रीतीनें तीन प्रकार होणें ही गोष्ट तुल्ययोगितेंतही शोधून काढावी.खरें सांगायचें म्हणजे धर्म प्रथम आला, मध्यें आला व शेवटीं आला तरी, त्यामुळें चमत्कारांत कांहीं फरक पडत नसल्यामुळें (त्यामुळें), तीन प्रकार होतात असें म्हणणें वरवर ठीक दिसतें (पण वस्तुत: त्यांत तथ्य नाहीं). हे तीन प्रकार मानले तर धर्म पहिल्या भागवाचे पूर्वीं, मध्यभागाचे पूर्वीं व शेवटच्या पूर्वीं आल्यास, अथवा त्यापेक्षां कमीजास्त ठिकाणीं आल्यास त्यामुळेंहीं, अनंत प्रकार होण्याचा प्रसंग येईल. N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP