दीपक अलंकार - लक्षण ४

रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.


असें जें दुसर्‍या प्रकारच्या दीपकाचें उदाहरण काव्यप्रकाशकारांनीं दिलें आहे, त्यावर विचार करूं या :---  येथें (पहिली गोष्ट ही कीं,) वरील काव्यप्रकाशकारिकेंत (म्ह०  सकृद्धृत्तिस्तु० या कारिकेंत) पहिल्या अर्धांत आलेल्या लक्षणानें, दोन्हीही दीपकाच्या प्रकारांचा संग्रह होत असल्यानें, दीपकाच्या दुसर्‍या प्रकाराचें लक्षण करणें व्यर्थ आहे. अनेक गुणी (धर्मी) व अनेक कारक (धर्मी) यांचा  (अनुक्रमें)  एक गुण व  एक क्रियारूप धर्माशीं  जसा एकच वेळ संबंध होऊन (तुल्ययोगिता अथवा दीपक) अलंकार होतो त्याप्रमाणें, अनेक क्रियांचा सुद्धां एक कारकरूपी धर्माशीं संबंध होऊन अलंकार होणें, ही गोष्ट स्पष्ट आहे. यावर (काव्यप्रकाशकारांच्या वतीनें) कुणी म्हणतील :--- “या ठिकाणीं (म्ह० कारकदीपकाच्या लक्षणांत) प्रकृत व अप्रकृत क्रिया नसल्या तरी, (वास्तविक दीपक व्हायला कांहीं प्रकृत व कांहीं अप्रकृत असे क्रिया वगैरे पदार्थ पाहिजेत, तरी सुद्धां,) व केवळ प्रकृत अथवा केवळ अप्रकृत अशा  क्रिया असल्या तरी, एकच कारक वेळ श्लोकांत (स्विद्यति कूणति० या,) आलें, म्हणजे दीपक अलंकार (म्ह० कारकदीपक) होतो; (कारण ह्या ठिकाणीं क्रियारूप धर्मी आहेत); पण क्रियेहून निराळे असे  पदार्थ (म्ह० गुणी हे धर्मी) असल्यास (त्यांचा दीपक अलंकार व्हावयास मात्र) त्यांच्यापैकीं कांहीं प्रकृत व कांहीं अप्रकृत असेच असले पाहिजेत; व त्यांचा क्रिया गुण वगैरे एक धर्माशीं अन्वय झाला पाहिजे, असा ह्या दीपकाच्या प्रकारांत (म्ह० क्रियारूप धर्मी असलेला दीपक व इतर प्रकारचे धर्मी असलेला दीपक यांच्यांत) फरक असल्यामुळें, त्यानें होणार्‍या दीपकाच्या दोन प्रकाराकरतां, दोन निराळीं लक्षणें करावी लागलीं.” यावर आमचें उत्तर :--- (केवळ प्रकृत व केवळ अप्रकृत धर्मीं, क्रियारूपी असून ही व त्यांचा एकच वेळ येणार्‍या एक कारकाशीं  अन्वय होत असूनही, त्याला कारकदीपक म्हणायाचें असेल तर,)  कारकतुल्ययोगिता अजिबात नष्ट होण्याची वेळ येईल, आणि मग,  सर्व आलंकारिकांच्या सिद्धांतला विरोध केल्याचिई आपत्ति येईल.  शिवाय, वरील दोन लक्षणांत अनुगत म्ह० दोघांना सामान्य असें स्वरूपच दिसत नाहीं, “ह्या दोन  लक्षणांपैकीं कोणतें तरी एक लक्षण  असणें हें,  दीपकाचें  सामान्य लक्षण”  असें म्हणाल तर, त्यांत गौरवदोष  आहे व असें लक्षण केलें तर सगळीकडेच घोंटाळा माजण्याचा प्रसंग येईल, याचप्रमाणें,  ‘स्विद्यति कूणति,’  हें कारकदीपकाचें  उदाहरण म्हणून जुळत नाहीं, कारण ह्यांतील सर्व क्रिया केवळ  प्रकृत आहेत.
शिवाय, दीपक व तुल्ययोगिता या अलंकारांत व्यंग्य असणारें साद्दश्य हा या दोन अलंकारांचा प्राण आहे, हें सर्वांना मान्य आहे. आतां,  (स्विद्यति कूणति०)  या श्लोकांत स्वेदन कूणन वगैरे क्रिया, एक कारकाशीं (नववधूशीं) अन्वित असूनही, त्या क्रियांत आपापसांत साद्दश्य दाखविण्याचें कवीच्य मनांत  नाहीं, म्हणून  ह्या (स्विद्यति कूणति०)  ठिकाणीं, समुच्चयालंकाराची छाया आहे, असें म्हणणें योग्य आहे. आम्ही दिलेल्या (वसु दातुं० व वासयति० या दोन श्लोकांत,  उदाहरणांत,  राजकर्तृक वसुदान (द्रव्य देणें) वगैरे क्रियांचा (पहिल्या श्लोकांत), व दुर्बळांना थारा देणें वगैरे  क्रियांचा (दुसर्‍या श्लोकांत)  आपापसांत साद्दश्यभाव प्रतीत होत आहे, याला सह्रदयांचें ह्रदय प्रमाण आहे; तेव्हां  (तुमच्या श्लोकांत तरी साद्दश्य कुठें सूचित  झालें आहे असा)  आम्हांला उलट जाब विचारायचा येथें प्रसंगच नाहीं.  आंता,  ‘स्विद्यति०’  यांतील स्वेदन वगैरे क्रियांचें आपापसांत साद्दश्य सूचित होतें  असा (तुमचा)  आग्रहच असला  तरी सुद्धां,  या सर्व क्रिया केवळ प्रकृत असल्यानें येथें कारकतुल्ययोगिताच होईल,  कारक दीपक होणार  नाही.  जाऊं  द्या  झालें.
आतां विमर्शिनीकारानें :---
‘ज्या मनुष्याला चंद्रमुखी स्त्रीला  आलिंगिण्याची, अमृत पिण्याची, कीर्ति  संपादन करण्याची,  संपत्ति मिळविण्याची  व अपूर्व गोडी  असलेली  तुझी  भक्ति ह्रदयांत बाळगण्याची फारशी उत्सुकता नाहीं, त्याला मी पशूच  मानतो.”
हें उदाहरण  देऊन,  “या ठिकाणीं  आलिंगन वगैरे  अनेक  क्रियांचा कर्ता म्हणून एकच मनुष्य  सांगितला (असल्यानें  कारकदीपक)  आहे.”  असें  म्हटलें  आहे,  तेंही चुकीचें आहे;  कारण येथें  आलिंगन वगैरे क्रियांविषयीं  फारसा उत्सुक नसणारा, या दृष्टीनें  या सर्व क्रियांचा आश्रय एकच  मनुष्य आहे,   असें मानणें आवश्यक असलें तरी, त्या सर्व क्रियांचा  आपापसांत एकच आश्रय असला आहे.  (म्ह०  त्या सर्व क्रिया करणारा एकच मनुष्य पाहिजे)  असें म्हणण्याची  मात्र आवश्यकता नाहीं.  जो चंद्रमुखीला आलिंगिण्याविषयीं, जो अमृत पिण्याविषयीं, जो कीर्ति संपादन  करण्याविषयीं,  जो संपत्ति  मिळविण्याविषयीं व जो तुझी  भक्ति करण्याविषयीं उत्सुक नाहीं.  असें हे सर्व  लोक मला पशु वाटतात, असें  तुमन्त  (हेत्वर्थ  कृदन्त)  रूपांचें भिन्न भिन्न कर्ते आहेत असें मानूनही  (ह्या श्लोकार्थाची)  उपपत्ति  लावणें शक्य असल्यानें,  “येथें  एक कारकाशीं अनेक क्रियांचा अन्वय आहे  व त्या  अन्वयामुळें होणारें  त्या क्रियांचें आपापसांतील साद्दश्य चमत्कारी  आहे :---”  असें (पूर्वपक्षानें)  म्हणणें शक्य नाहीं; उलट शशिमुखी,  सुधा,  कीर्ति, लक्ष्मी,  (तुझी)  भक्ति  या पदार्थांचा  परस्पर बिंबप्रतिबिंबभाव आहे व त्यामुळें  होणार्‍या साद्दश्याचा येथें  चमत्कार  आहे असेंही  म्हणणें  शक्य आहे.  शिवाय, या सर्व  क्रियांना एकच  कर्ता आहे असें  मानण्यांत अर्थाचा परिपोष असा  कांहींच होत  नाहीं, उलट श्लोकांतील  अर्थाशीं  ते एककर्तृत्व विरुद्ध  होतें. वरील क्रियांपैकीं  एक क्रियेविषयीं  मंदादर  असलेले सर्व  लोक पशु  होतें. वरील क्रियांपैकीं  एक एक  क्रियेविषयीं  मंदादर असलेले  सर्व  लोक पशु  आहेत, असें  म्हणणें  जितकें  सुंदर आहे  तितकेम, या सर्व क्रिया करण्याविषयीं  उत्सुक नसलेला मनुष्य  पशु  आहे असें म्हणणें हें सुंदर  नाहीं.
आतां  विमर्शिनीकारांच्या म्हणण्याचें समर्थन  अवश्य केलें पाहिजे,  असा आग्रहच  असेल तर असें  समर्थन करा  :---  ‘येथें  सर्व  क्रियांचा एक कर्ता नसला  तरी,  कर्तृत्वावच्छेदक धर्म  मंदादरत्व हा  येथें  एकच आहे; व तो  परंपरासंबंधानें एकच  (सर्व  क्रियांचा  आपआपसांत संबंध  नसला  तरी) साधारण  धर्म  होतो;  व त्याचा एकच  वेळ निर्दिश  श्लोकांत केला असल्यानें  (म्ह०  तो सकृद्‍वृत्ति असल्यानें,) येथें  कारकदीपक  म्हणायला हरकत नाहीं;’  कारण, कारक एक असलें म्हणजे  ज्याप्रमाणें  कारकदीपक होतें, त्याप्रमाणें,  कारकाचा  अवच्छेदक असा  विशिष्ट  धर्म एक  असला तरी,  त्या ठिकाणीं  कारकदीपक,  शास्त्राच्या विशिष्ट  अर्थाच्या  द्दष्टीनें आहे, असें  म्हणणें शक्य  आहे.  आतां  एक कारकाच्या एकच वेळ केलेल्या  निर्देशाचें  उदाहरण  पाहिजे असेल तर आम्ही  वर दिलेलें  उदाहरण  घ्या.
येथें  हें ध्यानांत ठेवावें  कीं,  ‘तुल्ययोगितेहून दीपक निराळें  मानणें  योग्य नाहीं,  कारण ‘एकच  धर्म एकच वेळ येणें’  यामुळें  होणारा चमत्कार या दोन्हीही  अलंकारांत सारखाच आहे. आणि  (ही  गोष्ट  सर्वमान्य आहे कीं)  चमत्कार निराळा होत  असेल  तरच  अलंकार  निराळा  मानावा. (निराळा चमत्कार  हा  निराळ्या अलंकाराचें कारण.)  तुम्ही  (जुन्याचे अभिमानी)  म्हणाल कीं, धर्माची  सकृद्‌वृत्ति  (एकच वेळ येणें)  ह्या बाबतींत ह्या दोन अलंकारांत  फरक नसला  तरी,  तुल्ययोगितेंत  (गुणी  अथवा क्रियावान् पदार्थ हे)  कारकरूपी  धर्मीं, एक तर सर्व  प्रकृत  अथवा  सर्व  अप्रकृत  असतात;   आणि  दीपकांत हे (गुणी वगैरे  धर्मी)  एक प्रकृत  आणि कांहीं  अप्रकृत  असे  असतात,  असा  या दोहोंत फारक  आहे. पण  हाच जर  फरक मानायचा असेल तर,  तुमच्या  तुल्ययोगितेंतही धर्मी,  केवळ प्रकृत,  अथवा केवळ अप्रकृत,  असतात; तेव्हां हा सुद्धां  फरकच असल्यानें,  दोन तुल्ययोगिता  मानण्याचा प्रसंग  येईल.  तसेंच  श्लेषामध्यें दोन श्लेषा (केवळ  प्रकृत  व केवल अप्रकृत)  मानायची पाळी  येईल;  व(इतकेपणा  असल्यानें,  त्या सर्व  प्रकारांना निराळे  अलंकार मानायची पाळी  येईल.  तुम्ही  म्हणाल,  “दीपकांत खरें  साद्दश्य  सूचित  होते,  कारण  एक प्रकृत  व एक  अप्रकृत ह्या स्वरूपाचीं  उपमे  व उपमान हीं,  दीपकांत  असतात.  तुल्ययोगितेंतील साद्दश्य  मानण्यावर  असतें;  (तें  खरें  नसतें,  कल्पित असतें);  कारण  तिच्यांतील धर्मी  (ते  सर्वच प्रकृत अथवा  सर्वच अप्रकृत असल्यानें)  उपमान  व  उपमेयरूप  नसतताच, हा तुल्ययोगिता  व दीपक  यांत फरक  आहे.”  पण,  (हेंही  म्हणणें खरें  नाहीं, कारण)  उपमान  व उपमेय  हीं  (दर एक वेळीं)  अप्रकृत  व प्रकृत  (अनुक्रमें)  असलींच  पाहिजे याला  (म्ह० असें  मानण्याला,)  प्रमाण  नाहीं,  [शिवाय  उपमान व उपमेय हीं (अनुक्रमें)  अप्रकृत व प्रकृत असलींच पाहिजेत असें  मानलें  तर]  ‘खमिव  जलं  जलमिव  खम्’  (आकाशाप्रमाणें  पाणी व पाण्याप्रमाणें  आकाश)  या उपमेयोपमा अलंकारांत व प्रतीप  अलंकारांत साद्दश्य नसतें, असें  म्हणण्याची पाळी  येईल. म्हणून (यावरून  निष्कर्ष  असा कीं)  तुल्ययोगिताच  (खालीलप्रमाणें)  तीन  प्रकारची  मानावी  :--- (१)  सर्व  प्रकृत धर्मींचा एक वेळ  येणारा  धर्म;  (२)  सर्व अप्रकृत  धर्मींचा  एक  वेळ  येणारा धर्म;  व  (३)  प्रकृत व अप्रकृत धर्मींचा एक  वेळ  येणारा धर्म, (जिच्यांत असतो  ती).  अशा रीतीनें पाहतां तुल्ययोगितेहून  दीपक निराळा अलंकार आहे,   हें  प्राचीनांचें  म्हणणें  केवळ  दुराग्रह आहे’ असें  नवीनांचें  मत.
कुणी  या दीपक अलंकाराचे  गुण,   क्रिया  वगैरे  धर्म (श्लोकांत) प्रथम येणें,  मध्यें  येणें  व शेवटीं  येणें,  ह्यांमुळें  होणारे तीन  प्रकार  मानतात.  उदा० :---
“यति  वैराग्यावांचूनचा  असेल  तर, तो  सुंदर असला  तरी  शोभत  नाहीं;  ब्राम्हाणही विद्वत्तेवांचूनचा शोभत  नाहीं; व तुझ्यावांचून हे राजा ! हा  मर्त्यलोकही  शोभत नाहीं;”

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP