मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे| श्लोक ७६ ते ८० श्रीगणेशाची सहस्त्र नामे श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५ सहस्त्र नामे - श्लोक ७६ ते ८० श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ. Tags : ganapatiganeshगणपतीगणेश श्लोक ७६ ते ८० Translation - भाषांतर उन्नत-आनन- उत्तुङ्ग: उदार-त्रिदश-अग्रणी: ।ऊर्जस्वान् ऊष्मल-मद: ऊहापोह-दुरासद: ॥७६॥४०३) उन्नतआनन---ज्याला कोणासमोरही मान खाली घालावी लागत नाही. नेहमीच ताठ मानेने जगणारा. सर्वांना आदरणीय़ व पूजनीय असणारा.४०४) उत्तुङग---उंच. सर्वोच्च वराहरूपधारी भगवानाच्या दाढेपासून तुङ्गा नावाची नदी प्रकट झाली. त्यावरून वराहाहून अभिन्न असणार्या गणेशास हे नाव पडले.४०५) उदारत्रिदशाग्रणी---त्रिदश म्हणजे ज्यांना तीनच अवस्था असतात. बाल-कुमार व तरुण. म्हणजे देव. देवांना माणसासारखी वृद्धावस्था नसते. उदार देवतांमध्ये प्रथमस्थानी असणारा. श्रेष्ठ.४०६) ऊर्जस्वान्---तेजस्वी आणि बलवान.४०७) ऊष्मलमद---ज्याच्या गण्डस्थलातून गरम मद वाहत आहे असा.४०८) ऊहापोहदुरासद---ऊह म्हणजे तर्क, अनुमान, सिद्धांत आणि अपोह म्हणजे वाटाघाट, शंकासमाधान. ऊहापोह म्हणजे तर्कयुक्त विचार. अशा गोष्टींनी प्राप्त न होणारा.ऋग्-यजु:-साम-सम्भूति: ऋद्धि-सिद्धि-प्रवर्तक: ।ऋजु-चित्त-एक-सुलभ: ऋणत्रयविमोचक: ॥७७॥४०९) ऋग्यजुस्सामसम्भूति---ऋक्. यजुस् व साम हे तीन वेद ज्याच्या नि:श्वासातून प्रकट झाले आहेत.४१०) ऋद्धिसिद्धिप्रवर्तक---राजवैभव, ऐश्वर्य आणि अणिमादी अष्टसिद्धींचा प्रवर्तक. अणिमा-महिमा-लधिमा-गरिमा-प्राप्ति-प्राकाम्य-ईशित्व आणि वशित्व या अष्टसिद्धी आहेत. अणिमा (शरीर सूक्ष्म करणे), महिमा (शरीर मोठे करणे), लधिमा (शरीर कापसाहूनही हलके करणे), गरिमा (शरीर जड करणे), प्राप्ति (चराचरातील कोणत्याही वस्तूचा संपर्क करण्याची क्षमता) प्राकाम्य-इष्टवस्तुप्राप्ती. ईशित्व (सर्व चराचरावर ताबा ठेवणे) वशित्व (विषय भोगून इन्द्रियांवर स्वामित्म ठेवणे).४११) ऋजुचित्तैकसुलभ---केवळ सरळ आणि निर्मळ चित्ताद्वारे प्राप्त होणारा, आकळणारा.४१२) ऋणत्रयविमोचक---देवऋण, पितृऋण, ऋषिऋण या तिन्ही ऋणातून मुक्त करणारा. मनुष्य जन्मास येतो तो ही तीन ऋणे घेऊन येतो. ती अनुक्रमे यज्ञ, स्वाध्याय व पुत्रोत्पादन इत्यादींनी फेडायची असतात.लुप्तविघ्न: स्वभक्तानां लुप्तशक्ति: सुरद्विषाम् ।लुप्तश्री:-विमुख-अर्चानां लूता-विस्फोटनाशन: ॥७८॥४१३) स्वभक्तानां लुप्तविघ्न---आपल्या भक्तांची संकटे दूर करणारा.४१४) सुरद्विषां लुप्तशक्ति---देवद्रोही दैत्यांची शक्ती नष्ट करणारा.४१५) विमुखार्चानां लुप्तश्री---गणेशोपासनेपासून विन्मुख होणार्यांचे ऐश्वर्य हरण करणारा.४१६) लूताविस्फोटनाशन---दन्त-लूतादी, आन्तर्बहिर गळवे, अर्बुदे यांचा तसेच कोडादी व्याधींचा नाश करणारा. (लूता = कातडीवरील व्रण, अर्बुद = गाठ, टयूमर, फोड)एकारपीठ-मध्यस्थ: एकपादकृतासन: ।एजित-अखिलदैत्यश्री: एधितअखिलसंश्रय: ॥७९॥४१७) एकारपीठमध्यस्थ---एकारपीठ त्रिकोणचक्राच्या मध्यभागी विराजमान.४१८) एकपादकृतासन---काशीक्षेत्री एका पायावर उभा राहणारा.४१९) एजिताखिलदैत्यश्री---दैत्यांची संपत्ति हिरावून घेणारा. दैत्यसंपत्तीला हादरे देणारा. ४२०) एधिताखिलसंश्रय---शरणागतांच्या वैभवात नित्य वृद्धी करणारा.ऐश्वर्यनिधि: ऐश्वर्यम् ऐहिक- आमुष्मिकप्रद: ।ऐरम्मद-समोन्मेष: ऐरावतनिभ-आनन: ॥८०॥४२१) ऐश्वर्यनिधि---समस्त ऐश्वर्यांचा परमसंग्रह. भक्तांचे ठायी ऐश्वर्यनिधी ठेवणारा.४२२) ऐश्वर्यम्---साक्षात् ऐश्वर्यच असणारा. परम ऐश्वर्य.४२३) ऐहिकामुष्मिकप्रद---ऐहिक म्हणजे येथील. या पृथ्वीलोकावरील. आमुष्मिक म्हणजे पारलौकिक. स्वर्गातील. ऐहिक आणि पारलौकिक गोष्टींचा लाभ मिळवून देणारा.४२४) ऐरम्मदसमोन्मेष---ज्याच्या दृष्टिचा उन्मेष (तेज, चमक) विद्युतप्रकाशाप्रमाणे आहे असा.४२५) ऐरावतनिभानन---ऐरावतहत्तीच्या मुखाप्रमाणे ज्याचे मुख आहे असा. N/A References : N/A Last Updated : July 19, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP