मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीगणेशाची सहस्त्र नामे| श्लोक ६१ ते ६५ श्रीगणेशाची सहस्त्र नामे श्लोक १ ते ५ श्लोक ६ आणि ७ श्लोक ८ आणि ९ श्लोक १० ते १२ श्लोक १३ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३३ श्लोक ३४ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ७० श्लोक ७१ ते ७५ श्लोक ७६ ते ८० श्लोक ८१ ते ८५ श्लोक ८६ ते ९० श्लोक ९१ ते ९५ श्लोक ९६ ते १०० श्लोक १०१ ते १०५ श्लोक १०६ ते ११० श्लोक १११ ते ११५ श्लोक ११६ ते १२० श्लोक १२१ ते १२५ श्लोक १२६ ते १३० श्लोक १३१ ते १३५ श्लोक १३६ ते १४० श्लोक १४१ ते १४५ श्लोक १४६ ते १५० श्लोक १५१ ते १५५ श्लोक १५६ ते १६० श्लोक १६१ ते १६५ श्लोक १६६ ते १७० श्लोक १७१ ते १७७ श्लोक १७८ ते १८० श्लोक १८१ ते १८४ श्लोक १८५ ते १८९ श्लोक १९० ते १९५ श्लोक १९६ ते २०३ श्लोक २०४ ते २१५ सहस्त्र नामे - श्लोक ६१ ते ६५ श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ. Tags : ganapatiganeshगणपतीगणेश श्लोक ६१ ते ६५ Translation - भाषांतर अजिता-अर्चित-पादाब्ज: नित्या-नित्य-अवतंसित: ।विलासिनी-कृत-उल्लास: शौण्डीसौन्दर्य-मण्डित: ॥६१॥३१८) अजितार्चितपादाब्ज---अपराजिता शक्तीने ज्याची चरणकमळे पूजली आहेत.३१९) नित्यानित्यावतंसित---नित्याशक्तीला ज्याचे चरणकमळ सदैव कर्णभूषणांप्रमाणे आहेत.३२०) विलासिनीकृतोल्लास---विलासिनी शक्तीनेजो उल्लसित राहतो.३२१) शौण्डीसौंदर्यमण्डित---शौण्डी नामक शक्तीच्या सौंदर्याने जो मण्डित (भूषित) झाला आहे.अनन्ता-अनन्तसुखद: सुमङ्गलसुमङ्गल: ।इच्छाशक्ति-ज्ञानशक्ति-क्रियाशक्ति निषेवित: ॥६२॥३२२) अनन्तानन्तसुखद---अनन्ता नामक शक्तीला अनन्त सुख देणारा.३२३) सुमङ्गलसुमङ्गल---सुमङ्गल पीठ ज्याच्या मुळे मंगलमय होते.३२४) इच्छाशक्तिज्ञानशक्तिक्रियाशक्तिनिषेवित---इच्छाशक्ती-ज्ञानशक्ती-क्रियाशक्ती या तीनही शक्ती ज्याची सेवा करतात.सुभगा-संश्रित-पद: ललिता-ललिता-आश्रय: ।कामिनी-कामन: काममालिनी-केलि-लालित: ॥६३॥३२५) सुभगासंश्रितपद---सुभगा नावाच्या शक्तीने ज्याच्या चरणकमळांचा आश्रय घेतला आहे.३२६) ललिताललिताश्रय---जो ललितादेवीचे मनोहर आश्रयस्थान आहे.३२७) कामिनीकामन---कामिनी या शक्तिदेवतेची इच्छा पूर्ण करणारा.३२८) काममालिनीकेलिलालित---काममालिनी शक्तीच्या केलि म्हणजे क्रीडांनी प्रसन्न राहणारा.सरस्वती-आश्रय: गौरीनन्दन: श्रीनिकेतन: ।गुरुगुप्तपद: वाचासिद्ध: वागीश्वरीपति: ॥६४॥३२९) सरस्वत्याश्रय---सरस्वती म्हणजे वाक्देवतेचा आश्रय असणारा.३३०) गौरीनन्दन---पार्वती देवीस आनन्द प्रदान करणारा.३११) श्रीनिकेतन---श्री म्हणजे लक्ष्मी. निकेतन म्हणजे निवासस्थान. जो लक्ष्मीचे निवासस्थान आहे.३३२) गुरुगुप्तपद---गणकाचार्यादी समस्त गुरूंनी चरणी दृढ आलिंगन दिल्यामुळे ज्याचे चरण झाकले गेले आहेत.३३३) वाचासिद्ध---ज्याची वाणी सिद्ध आहे. म्हणजे तो बोलेल त्याप्रमाणे घडते.३३४) वागीश्वरीपति---भाषेची देवता (वाक्+ईश्वरी = वागीश्वरी) सरस्वती अथवा बुद्धिदेवता यांचा स्वामी. नलिनी-कामुक: वामाराम: ज्येष्ठामनोरम: ।रौद्रीमुद्रित-पादाब्ज: हुम्बीज: तुङ्गशक्तिक: ॥६५॥३३५) नलिनीकामुक---नलिनीनाम शक्तीचा वल्लभ.३३६) वामाराम---वामा नामक शक्तीचा विसावा असलेला किंवा वामा नामक शक्ती ज्याची प्रिया आहे. ३३७) ज्येष्ठामनोरम---ज्येष्ठा नामक शक्ती ज्याची मनोरमा प्रिया आहे असा.३३८) रौद्रीमुद्रितपादाब्ज---रौद्री नामक शक्तीने ज्याचे चरणकमळ आपल्या ओंजळीत बद्ध केले आहेत.३३९) हुम्बीज---‘हुम्’ हे ज्याचे बीज आहे. ‘वक्रतुण्डाय हुम्’ या षडाक्षरी मंत्राचा अन्तिम वर्ण जो ‘हुम्’ आहे तोच समस्त पुरुषार्थाचे कारणबीज आहे. त्यामुळे भगवान गणपती ‘हुम्बीज’ या नावाने प्रसिद्ध आहे. ३४०) तुङ्गशक्तिक---‘तुङ्ग’ ही ज्याची शक्ती आहे. N/A References : N/A Last Updated : July 19, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP