मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|स्तवन|गणेशस्तवनें| ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... गणेशस्तवनें ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... श्रीगणाधिपतयें नम: । श्री... ॐ नमो अनादि आद्या । वेद व... लंबोदरा तुझा शोभे शुंडादं... पाहतां त्रिभुवनीं हो दुजा... मन माझें वेधलें गणराजीं ।... धरोनिया फरश करीं । भक्तजन... विद्यानिधान गणराज विराजता... ॐ नमो गणेशपायांसी । जया न... नमो परमं ब्रह्मणस्पति । प... सद्गुरू गणेशा अचला । सद्... संत ज्ञानेश्वर रचित - ॐ नमो श्री आद्या । वेदप्र... पूजा करण्याआधी मन प्रसन्न करण्यासाठी त्या त्या देवीदेवताचे स्तवन करावे. Tags : poojastavanपूजास्तवन संत ज्ञानेश्वर रचित Translation - भाषांतर ॐ नमो श्री आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥देवा तूंचि गणेशु । सकलमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥हें शद्बब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।तेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥स्मृति तेचि अवयव । देखा अंगीकभाव ।तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥अष्टादश पूराणें । तींचि मणिभूषणें ।पदपद्धती खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥५॥पदबंद नागर । तेंचि रंगाथिलें अंबर ।जेथ साहित्य वाणे सपूर । उजाळाचें ॥६॥देखा काव्यनाटका । जें निर्धारितां सकौतुका ।त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनी ॥७॥नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥८॥तेथ व्यासादिकांचिया मती । तेचि मेखळा मिरवती ।चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥९॥देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती ।म्हणऊनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥१०॥तरी तर्कुं तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥एके हातीं दंतु । जो स्वमावता खंडितु ।तो बौद्धमत संकेतु । वार्तिकांचा ॥१२॥मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयह्स्तु ॥१३॥देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।येथ परमानंदु केवळु । ब्रह्मसुखाचा ॥१४॥तरी संवादु तोचि दशनु । जो समताशुभ्रवर्णु ।देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं ।बोधमदामृत मुनी - । अली सेविती ॥१६॥प्रमेयप्रवाल सुप्रम । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।सरिसे एकवटत इभ - । मस्तकावरी ॥१७॥उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें ।तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥१८॥अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ।तें मियां गुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥ N/A References : N/A Last Updated : July 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP