श्रीराममाहात्म्य - सीताशुद्धि

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
हनुमंत गेला सीताशुद्धिलागीं  । लंका मध्यभागीं ये-ऊनियां ॥१॥
माता जानकीच्या करीत शुद्धीसी । हिंडे गृहदेशीं राक्षसांच्या ॥२॥
न देखे तो सती सीतादेवीमाया । अकस्मात तया वनामाजी ॥३॥
शिंसीवावृक्षाचे असे तळवटीं । समीप निकटीं राक्ष-सींचे ॥४॥
न चले उपाय कांहीं तो बोलाया । स्मरे रामराया तये काळीं ॥५॥
श्रीरामें मुद्रिका दिली होती संगें । तयासी अव्यंग सो-डावया ॥६॥
वृक्षाचिया माथां बैसोनियां बळी । देत करकमळीं सोडू-नियां ॥७॥
जानकी अवलोकी श्रीरामाची मुद्र । कोठोनी कपींद्रा आणलीसे ॥८॥
सुखी रामराणा कवणिये वना । माझिया तूं प्राणा बोलें वेगीं ॥९॥
ऐकोनी कपींद्र चरणासी वंदी । ह्मणे रामचंद्र सुखी असे ॥१०॥
सहितसौभित्र वनामाजी आहे । शुद्धीलागीं पाहे पाठविलें ॥११॥
तुझेनि वियोगें रामराजा दु:खी । यालागीं तुज देखीं पाठविलें ॥१२॥
ऐकतांची वाणी करीत आक्रोशा । ह्मणे राम कैसा सोडि-बोलतसे ॥१४॥
समीप जे होते रक्षपाळ बळी । ऐकोनी आरोळी दूर झाले ॥१५॥
तये संधीमध्यें हनुमंत खालौता । येवोनियां माता वंदितसे ॥१६॥
क्षुधाक्रांत भारी ह्मणे काय खाऊं । सांगसी उपाऊ तरी येथें ॥१७॥
वनामाजी मेवा घेऊनियां कांहीं । क्षुधेसी ते पाही शांतवावी ॥१८॥
म्हणे सीता दूता रक्षपाळ होती । नि-रोध करिती तुजलागीं ॥१९॥
ह्मणोनियां पाहीं भूमीगत कांहीं । घेऊनि स्वदेहीं विश्रांतीसी ॥२०॥
पडलें तें घेईं ऐसी आज्ञा पाही । वंदोनियं पायीं संतोषला ॥२१॥
करोनी उड्डाण वृक्षमाथां बैसे । उपडोनी झाडास हालवीत ॥२२॥
खालीं पाडी फळें तयांचें भोजन । करूनियां वन विध्वंसिलें ॥२३॥
रक्षपाळ सारे मिळोनी कपींद्रा । धरावया सारा यत्न केला ॥२४॥
न चढे हातासी बहुबळ त्यासी । राक्षसां विध्वंसी हातपायीं ॥२५॥
वृक्षाचेनि घायें मारिले उपायें । ऐसी बळ सोय दाखवीत ॥२६॥
जंबूमाळी बार्गीं तया अधिकार । धांवोनी सत्वर रायापाशीं ॥२७॥
मात ते घेउनि आला तो धांवूनि । कपीराज वनीं आला एक ॥२८॥
त्यानें सर्व वन पाडिलें उपडोन । कोणाचा तो कोण कळेना हो ॥२९॥
राजा करी आज्ञा धरा बांधा त्याला । मारा वानराला वेगीं जारे ॥३०॥
ऐक-तांचि वाणी भूपामुखींची हो । उआठेले लवलाहो राक्षसगण ॥३१॥
जावोनी वेढिला कपीराज राणा । धनुष्यासी बाणां लावूनियां ॥३२॥
मारितं बाणासी न लागे कपिसी । तेव्हां युक्ति कैसी आरंभिली ॥३३॥
करूनि फांसासी धरूं ह्मणती त्यासी । नये तो फांसासी आटोपितां ॥३४॥
धरिती जरी बाहीं निघोनियां जातां । न चढे तो हातां कवणाच्या ॥३५॥
थोर जरी फांसा होत तो लहान । जाय तो निघोन फाशांतुनी ॥३६॥
लहान जरी केला तरी होतो थोर । फांशाचा विचार व्यर्थ करीती ॥३७॥
ऐशापरी झाले श्रमातुर भारी । कपि तो विचारी कार्य पुढें ॥३८॥
ह्मणोनी फांशांत पडे तो तेधवां । धरोनी वानरा नेती दूत ॥३९॥
सन्मुख रावणें देखुनि कपीसी । करी कौतुकासी अपूर्व हो ॥४०॥
कधीं नाहीं ऐसें स्वरूप देखिलें । येणें फार केलें नाशालागीं ॥४१॥
पुसत तूं कोण कवण कार्यालागीं । पातलासी वेगीं याच ठायीं ॥४२॥
वानर म्हणे आलों मूर्खा रावणारे । रामदूत खरे सीताशुद्धि ॥४३॥
ऐकोनि रावण म्हणे यासी जाळा । शेंपूट गुंडाळा अग्नि लावा ॥४४॥
कपीसी पुसिलें म-रण कोणे ठायीं येरू पुच्छ दावी म्हणोनियां ॥४५॥
समग्र लंकेचीं आणोनियां वस्रें । कपीपुच्छ पुरें न होयची ॥४६॥
तेव्हां राजधीनी आणोनी वेष्टितां । परी तो पुरतां न होयची ॥४७॥
तेव्हां तेल घाला म्हणे तो रावण । दूत ते धांवोन टाकिताती ॥४८॥
लावूनि अग्निसीं केला मोठा ज्वाळ । वानर तत्काळ उडाला हो ॥४९॥
लंकेची ते केली सारी तेणें होळी । सहित मंडळी राजघरें ॥५०॥
भुकुक्कार केला वानर उडाला । लंकेमाजी झाला प्रळय हो ॥५१॥
अग्नीचा उबाळा धुरानें दाटला । देखे कपि त्याला सुखरूप ॥५२॥
मुखासी लागला पाहतांची डोळां । म्हणोनी तो झाला शामवर्ण ॥५३॥
येवोनि लवलाहीं श्रीरा- मातें पाही । नमूनि सर्वही सांगितलें ॥५४॥
तेव्हां नामा म्हणे होतों मी जवळा । चरणकमळां ध्यात तेथें ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP