मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचमान| मान २ पंचमान मान १ मान २ मान ३ मान ४ मान ५ पंचमान - मान २ समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ मान २ Translation - भाषांतर वायोमधें देव नाना । वायोरूपेंची देवता ।त्रैलोक्य चालवी वायो । वायोस्तुनि न बोलवे ॥१॥निश्चळा वेगळा वायु । चंचळा वर्तवी सदा ।देव तो हाची जाणवा । सर्व देह्यांतरीं वसे ॥२॥येकांगें पाहातां वायो । येकांगें पाहातां हरी ।चंचळत्वें जग्गजोती । आत्मा त्यासीच बोलीजे ॥३॥सर्वात्मा सर्व अंतरात्मा । सर्वसाक्षी सर्वोत्तमु ।सर्वकर्ता सर्वभोक्ता । सर्वत्र देहधारकु ॥४॥बहु देही बहु लीळा । बहु रूपी बहु कळा ।बहु रंगी बहु संगी । बहु गुण बहु बहु ॥५॥जगदीश जगदात्मा । जाणता जगजीवनु ।जुनाट जजरी काया । धरी त्यागी परोपरीं ॥६॥चालवितो दिसेना कीं । शरीरें चालती खरें ।क्तीयेनें प्रत्यया येतें । रूप तें पाहातां नये ॥७॥देहे हा आस्तीमौंशाचा । त्यामधें प्राण वासना ।वासना जाणते सर्वै । प्राण देह्यास चेतवी ॥८॥प्राण तों चेतना देहीं । प्राण जातां घडेचिना ।तया प्राणांतरीं वर्ते । जाणती जगज्जोती हे ॥९॥सुषुप्ती आवस्तेमघें । प्राण तो येत जातसे ।परंतु नेणवे कांहिं । वेगळी जाणती कळा ॥१०॥देह्यांतीं टाकितां देहो । मन प्राण समागमें ।येक तें निवडेना कीम । तथापी भेदही कळे ॥११॥कळे त्याला कळे सर्वैं । कळेना त्या कळेचिना ।म्हणोनि सांडीजे हेंका । प्रत्ययो पाहाणें बरा ॥१२॥आंडजा जारजा खाणी । स्वेतजा उत्बीजादीका ।नाना देह्यांतरीं वर्ते । द्रष्टा पाहे परस्परें ॥१३॥नाना परादिका वाणी । नाना देश भाषा रीती ।नाना क्षत्रीं नाना स्थानीं । येकला नट नाटकु ॥१४॥ज्ञानघनु ची सर्वज्ञु । कांहीं येक पुरातनु ।नाना विद्या कळा जाती । दक्ष धूर्त विचक्षणु ॥१५॥गुरु तो शिष्य तो जाला । शिष्य तोची पुढें गुरु ।देव तो भक्त तो ज्ञानी । सर्व तो जगदांतरें ॥१६॥थोर तो धाकुटा मोठा । सर्वत्र वैश्वानरु ।तथा बीजाकारे पाणी । येकहि भेदहि दिसे ॥१७॥बहु भाग्य सभागी तो । अभागी अल्पवैभवें ।भाग्यांशें पाहातां येकु । थोडया भाग्यें न मानिती ॥१८॥जाणणें म्हणिजे ज्ञान । ज्ञानें सर्वत्र वर्तती ।परंतु येक तो ज्ञानी । येक तो ज्ञानसाधकु ॥१९॥कीतेक देवतें भूतें । कीतेक ब्रह्मयोगिणी ।कीतेक हरीहरादिक । सर्वत्र जाणती कळा ॥२०॥कल्पना कामनारूपें । वायोरूप विराजती ।कीतेक घुमती आंगीं । प्रचात रोकडी जनीं ॥२१॥आपलाल्या साभिमाने । मीपणें वाद घालिती ।शरीरभावना भिन्न । भिन्नें क्षत्रे परोपरीं ॥२२॥वास घे वासना देवो । स्थुळेंवीण खातां नये ।म्हणोनी ब्राह्मणा द्यावें । विप्रमुखें संत्रुप्तता ॥२३॥निर्वैर सर्वभूतांसीं । वर्तणें न घडे कदा ।उगेंची वेर्थ बोलावें । चालणें न घडे कदा ॥२४॥नेणताम नुमजे कांहीं । तारुणी मकरध्वजु ।वृधाप्य आदळे आंगीं । दु:ख ब्रह्मांड कोसळे ॥२५॥मागील कोण तो जन्म । माता पिता कळेचिना ।कन्या पुत्र वधु कोण । कोण ते जन्मभूमिका ॥२६॥मागील नाठवे आतां । आतांचें नाठवे पुढें ।येकाकी येकलें जावें । मायाजाळें भ्रमे जनु ॥२७॥संचितासारिखे येती । प्राणी हे भोग भोगिती ।भोगणें पुर्वीचा ठेवा । म्हणोनि पुण्य पाहिजे ॥२८॥पुण्यमार्गें भले जाती । पापीष्टें पाप संचिती ।पापयोगें माहां दुखें । पापयोगें दरीद्रता ॥२९॥पातकी दैन्यवाणा तो । निंद्रा द्वेष वसे मनीं ।न्याय अन्याय तो नेणे । मातला मदमछरें ॥३०॥देव धर्म क्तिया नेणें । भ्रष्ट चांडाळ दुर्जनु ।कुकर्मी घातकी दोषी । या लोका येमयातना ॥३१॥इति श्रीपंचमाने स्वल्पसंकेते अंतरात्माविवरण नाम मान दुसरें ॥२॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP