मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|मानपंचक| मान प्रथम मानपंचक मान प्रथम मान द्वितीय मान तृतीय मान चतुर्थ मान पंचम मानपंचक - मान प्रथम समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : ramdassamarthaरामदाससमर्थ मान प्रथम Translation - भाषांतर राम विश्राम देवांचा । राम भक्तांसी आश्रयो ।राम योगी मुनी ध्यानीं । राम रक्षी रुसीकुळा ॥१॥राम व्यातो चंद्रमौळी । राम राम सदा जपे ।रामकथा ऐकतां हे । रामरूप निरंतरीं ॥२॥पार्वती पुसतां सांगे । राम जप अत्यादरे ।सुंदरें दोनी अक्षरें । निवालों अंतरीं सुखें ॥३॥नाळिलें पोळिले वीषें । कर्कशे काळिमा चढे ।उपाय बहुधा केले । रामनामेंचि सुटीका ॥४॥सव्य अपसव्य या नामें । तरले सुटले बहु ।अंतकाळीं सर्व काळिं । सुटीका सकळै जना ॥५॥कीर्ति या रघुनाथाची । पाहातां तुळणा नसे ।येकबाणी येकवचनी । येकपत्नी च धार्मिकु ॥६॥राज्य या रघुनाथाचें । कळी काळासी नातुडे ।बहु वृष्टी अनावृष्टी । हें कदा न घडे जनीं ॥७॥उद्बग पाहातां नाहिं । चिंता मात्र नसे जनीं ।व्याधी नाहिं रोग नाहिं । लोक आरोग्य नांदती ॥८॥युव्य नाहिंच आयोव्या । राग ना मछरु नसे ।बंद निर्बंदे ही नाहिं । दंड दोष कदा नसे ॥९॥कुरूपी पाहातां नाहिं । जरा मृत्य असेचिना ।आदरु सकळै लोका । सख्यप्रीती परस्परें ॥१०॥बोलणें सत्य न्यायाचें । अन्याय सहसा नसे ।अनेक वर्तती काया । येक जीव परस्परें ॥११॥दरिद्री धुंडितां नाहीं । मूर्ख हा तो असेचिना ।परोपकार तो मोठा । सर्वत्र लोकसंग्रहो ॥१२॥अद्भूत पीकती भूमी । वृक्ष देती सदा फळें ।अखंड दुभती धेनु । आरोग्यें वाहाती जळें ॥१३॥जळजें स्वापदें पक्षी । नाना जीव भूमंडळीं ।आनंदरूप बोभाती । नाना स्वर परस्परें ॥१४॥नद्या सरोवरें बावी । डोलती नूतनें बनें ।फळती फुलती झाडें । सुगंध वनवाटिका ॥१५॥उदंड वसती ग्रामें । नगरें पुरें चि पट्टणें ।तीर्थे क्षत्रें नाना स्छानें । शिवाल्यें गोपुरें बरीं ॥१६॥मठ मढया पर्णशाळा । रुसीआश्रम साजिरे ।वेदशास्रधर्मचर्चा । स्नानसंव्या तपोनिधी ॥७॥चढता वाढता प्रेमा । सुखानंद उचंबळे ।संतोष समस्पै लोकां । रामराज्य भुमंडळीं ॥१८॥हरीदास नाचती रंगीं । गायनें कीर्तनें बरीं ।रागरंग तानमानें । टाळबधें विराजती ॥१९॥प्रबंद कविता छेंदे । धोटी मुद्रा परोपरीं ।आन्वय जाड दृष्टांतें । गद्यें पद्यें चि औघडें ॥२०॥नाना युक्ती नाना बुधी । नाना विद्या नाना कळा ।नाना संगीतसामर्थ्यें । नाना वाद्यें परोपरीं ॥२१॥संमार्जनें रंगमाळा । पुष्पमाळा बहुविधा ।केशरें धुशरें गंधें । सुगंधें करताळिका ॥२२॥सर्व हि तोषले तोषें । नाम नामघोषेंची गर्जती ।पुरेना दिन ना रात्रीं । यात्रा पर्वें हरीकथा ॥२३॥दीपीका चंद्रजोती त्या । आर्त्या नीरांजनें जनें ।रामराजा दयासिंधु । वोळला सेवकांवरी ॥२४॥रामदासीं ब्रह्मज्ञान । सारासार विचारणा ।धर्मस्थापनेसाठी । कर्मकांड उपासना ॥२५॥इति श्री मानपंचक सारासारविवेकनाम मान प्रथम ॥१॥ N/A References : N/A Last Updated : April 02, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP