महावाक्यपंचीकरण - शतक सहावे

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


॥ श्रीरामसमर्थ ॥
प्रथम अध्यात्म अंत:करण जाणा । ते निर्विकल्पना आदिभूत ॥१॥
या आदिदैवत विष्णु रमानाथ । यापरी संकेत जाणावा पैं ॥२॥
मनाचे मंतव्यें तेथें चेंद्रभव्यें । बुद्धीचें बोधव्यें ब्रह्मा तेथें ॥३॥
चित्त रूप हें चि चैतव्ये जाण । यासी नारायण आदिस्थान ॥४॥
अहंकार अहं कर्तव्ये हें जाण । तो गौरीरमण आदिस्थान ॥५॥
कर्णीं श्रोत्रतव्य तेथें आदि दिशा । त्वचेचिया स्पर्षा वायु तेथें ॥६॥
चक्षु दृष्टैतव्ये सूर्ये तेथें दिव्यें । जिव्हा रसैतव्ये करुण तेथें ॥७॥
घ्राणाचे घ्रातव्ये तो अश्र्विनी देव । देवताचें नांव जाणावें पैं ॥८॥
वाचेचें वक्तव्ये वन्ही सर्व सेव्ये । पाणिग्रहतव्ये इंद्र तेथें ॥९॥
पाद तें गंतव्ये शरीर चालत । तें आदिदैवत त्रिविक्रम ॥१०॥
शिस्न उपस्थते आनंदैतव्ये हें । प्रजापति राहे आदि तेथें ॥११॥
गुदइंद्रिय जेथें विसर्घैतव्ये हें । नैरुति तै पाहे आदि तेथें ॥१२॥
पंचप्राण तेथें विहरण चंचळें । येके रूपें खेळे सर्व वायु ॥१३॥
स्वभाविक प्राणस्थानकें पाहाणें । या पिंडाप्रंमाणें कल्पुनीया ॥१४॥
विषयांसी ऐक्ये भूताचिये सोये । स्थूळ ज्ञानेंद्रियें पाहा तेथें ॥१५॥
अज्ञान कारण विकारईतव्या । स्थान मायादेव्या आदि तेथें ॥१६॥
कारण स्थूळासी गांठी येकीमेकीं । लिंगाच्या पंचकीं वोळखावें ॥१७॥
लिंगेद्रियें मूळ कारणाची खूण । नाहीं स्थूळेंविण सुषुप्ती हे ॥१८॥
या देहद्वयाचें अधिष्ठान लिंग । येथें याचे भाग जाणा ऐसे ॥१९॥
कारण अविद्या लिंग ते कामना । स्थूळ कर्म जाणा लिंगाधारें ॥२०॥
यालागी सूक्ष्मीं पुरे या अष्टक । वेदांतीं निष्टंक बोलियेले ॥२१॥
हे अवोद्या काम कर्म ऐसी तीन । चौथें अंत: करणपंचक हे ॥२२॥
पंचम पुर हे ज्ञानइंद्रियें पांच । कर्मइंद्रियें पांच सहावें पै ॥२३॥
सातवें पुर जे हे प्राणपंचक । विषयेपंचक आठवें पै ॥२४॥
लिंगपुरी अष्टक इयाचें निर्शनें । दृश्यातीत पूर्ण ज्ञानें होये ॥२५॥
असो ऐसा जीव अज्ञानें भ्रमला । असे आंवरिला लिंगदेहे ॥२६॥
लिंगदेहे जीव सूक्ष्म शरीर । तयाचें बिढार स्थूळ देहे ॥२७॥
पंचीकृत पंचभूताचा मेळावा । आकार अवघा ऐक बापा ॥२८॥
कोण भूत कोण्या रूपें स्थूळ देहीं । आहेत सर्व हि सांगों आतां ॥२९॥
अस्थि नाडी मांस त्वचा आणि केंस । आहेत सर्व हि सांगों आतां ॥३०॥
लाळ मूत्र आणि शुक्र रक्त मज्जा । द्रवत्व समजा आपाचें पैं ॥३१॥
क्षुधा तृषालस्य निद्रा हे मैथुन । पंचक हें उष्ण तेजाचें पैं ॥३२॥
धांवणें तें चि तें चळण वोळखा । वळण हें देखा आकुंचन ॥३३॥
प्रासारण चौथें आणि निरोधन । जांणिजे पवन पंचरूपें ॥३४॥
काम क्रोध शोक मोहो भय देख । हे पांचै हि वोळख आकाशाचे ॥३५॥
वायु दशविधा सांगितले पांच । आतां ऐक पांच रूपें कैसी ॥३६॥
ताळका कमळी नाग सदां वस । मुख हे विकास तेणें गुणें ॥३७॥
कूर्म नेत्रस्थानीं त्राहाटकु पात्यासी। आळस येणेसी खूण पाहा ॥३८॥
आंगमोठा आणि मुखांत जांभई । देवदत्त पाही प्रचीतीन ॥३९॥
कर्कशा गुणें उचकी करक । धनंजई शिंक पांच ऐसे ॥४०॥
षड् रिपु जे स्थूळ देहीं आहेती । गुण लिंग स्थिति योग ऐसे ॥४१॥
काम तो प्रथम क्रोध तो दुसरा । मद तो तिसरा तीनी ऐसे ॥४२॥
मत्सर तो चौथ्या दंभ तो पांचवा । प्रपंच सहावा साही वैरी ॥४३॥
काल्पनिक सांगों जातां फार आहे । प्रचीतीविण हे व्यर्थ श्रम ॥४४॥
ऐसें हें जीवाचें जे स्थूळ शरीर । षडोर्मी विकार येथें पाहा ॥४५॥
प्रथम जोयेते¹ दुजा तो अस्तिते । तिजा विविधते विकार पै ॥४६॥
चौथा हा विकार विपरिणामत्ते । आणि आपेक्षीते पांचवा पै ॥४७॥
सा ( हा ) वा विकार जाण विनीसेत । साहाचीं रुपें तें ऐसीं ऐके ॥४८॥
जायेते ते ऐसे संबवे उदरीं । नहोनिया परी होणें जालें ॥४९॥
अस्तिते ते ऐसें नसोनी असणें । वाढोनी पावणें जन्मकाळ ॥५०॥
विवर्धते हे चि बाळत्व जालिया । थोर होय काया वृद्धि पावे ॥५१॥
विपरीण मतें तारुण्यदशेते । आणि आपेक्षी ते वृद्धपण ॥५२॥
विनशेते बाण पावल्या मरण । देहीं विकारण षडोर्मीचे ॥५३॥
स्थूळ शरीर हें सांगितलें पष्ट । ब्रह्मांडीं विराट ऐक्य आहे ॥५४॥
ऐक्य पाहों जातां अष्टधा प्रकृत्ती । अन्यया पदार्थी घडे कैसी ॥५५॥
संकळित मुख्य विवेकें पाहावें । कल्पुनियां नांवें किती काय ॥५६॥
स्थूळदेहे याची अवस्था जागृती । विराटीं उत्पत्ति सृष्टीकर्म ॥५७॥
स्थूळीं अभिमानी विश्व वोळखावा । विराटीं जाणावा ब्रह्मदेव ॥५८॥
आकार मात्रा हे दोहीं ठाईं जाण । प्रथम चरण प्रणवाचा ॥५९॥
स्थूळीं नेत्रस्थान तेथें सत्य लोक । भोगस्थळ येक दोहीलागी ॥६०॥
रजोगुण असे दोही ठायीं येक । क्रियाशक्ती देख येकत्रासी ॥६१॥
मुक्ती सलोकता वाणी ते वैखरी । ऋग्वेद समीरीं जीव वर्ते ॥६२॥
ब्रह्मांडीं विराट देहे हे शिवाचे । स्थूळ हे जीवाचें ऐक्य जाले ॥६३॥
येणें न्यायें लिंग हिरण्यगर्भाचें । बोलिजे ऐक्याचें निरूपण ॥६४॥
लिंगदेहे याची अवस्था हे स्वप्न । स्थिति ते हिरन्यगर्भस्थानीं ॥६५॥
लिंगी अभिमानी तेजस वर्ते तो । ब्रह्मांडीं विष्णु तो सूक्षमाचा ॥६६॥
माता ते उकार दोन्ही येक जाण । दुसरा चरण प्रणवाचा ॥६७॥
पिंडीं कंठस्थान तेथें तें वैकुंठ । विष्णु स्वामी श्रेष्ठ सर्वपाळी ॥६८॥
येक चि भोग तो जाणावा प्रविक्त । देहीं तो मिश्रित सुखींदु:खीं ॥६९॥
सत्वगुणीं येक लिंगीं इच्छाशक्ती । येथें ज्ञानशक्तीं देवलिंगीं ॥७०॥
वाणी ते मध्यमा दुसरी जो नाद । आणि यजुर्वेद युक्ति जाणा ॥७१॥
समीपता मुक्ती सूक्षमाची जाणा । जीव तो वासनारूप वर्ते ॥७२॥
लिंग जें हिरण्यगर्भी ऐक्य असे । तिजा देह कैसे ऐक्य सांगो ॥७३॥
कारण अविद्या अव्याकृत माया । हे महाप्रळया नाश पावे ॥७४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP