गृहप्रवेश - वरुण स्थापना

नवीन घर घेतल्यावर वास्तुशांत करावयाचे नसल्यास गृहप्रवेश विधी करून राहायला जाता येते.


वरुण ( मंगल कलश ) स्थापना
आपले दोनही हात उताणे करुन कराग्रांनी भूमीला स्पर्श करुन भूमीची प्रार्थना करावी.  -
सर्वेषामाश्रया भूमिर्वराहेण समुद्धृता ।
अनन्तसस्यदात्री या तां नमामि वसुन्धराम्‌ ॥
उताणे केलेल्या हाताच्या बोटांनी चौरंगावरील धान्यराशीला स्पर्श करावा. -
यासामप्यायकः सोमो राजायाः शोभनाः स्मृताः ।
ओषध्यः प्रक्षिपाम्यत्र ता अद्य कलशार्चने ॥
वर सांगितल्याप्रमाणे कलशाला स्पर्श करुन कलशाची प्रार्थना करावी.  
कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः ।
मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाः स्मृताः ॥
कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ।
ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्मथर्वणः ।
अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः ।
अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्‍टिकरी तथा ।
आयांतु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः ॥
उजव्या हाताने पळीभर पाणी कलशात वाहावे.
गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धु कावेरि कुम्भेऽस्मिन्‌ संनिधिं कुरु ॥
कलशात गंध-अक्षता-हळद-कुंकू-फुले व दूर्वा वाहाव्यात.
मलयाचलसम्भूतं घनसारं मनोहरं ।
ह्रुदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रक्षिपाम्यहम्‌  ॥
दूर्वेऽमृतजन्मासि वन्दिताऽसि सुरैरपि ।
सौभाग्यसन्ततिकरी सर्वकार्येषु शोभना ॥
आंब्याचा टहाळा ( टहाळ्याचे डेख कलशांत जाईल अशा रीतीने ) कलशाच्या मुखावर ठेवावा.
अश्वत्‍थोदुम्बरप्लक्षचूतन्यग्रोधनपल्लवाः ।
पञ्चभङ्गा इति ख्याताः सर्वकर्मसु शोभनाः ॥
कलशामध्ये सुपारी व दक्षिणा ( सव्वा रुपयाची नाणी ) वाहावी.
फलेन फलितं सर्व त्रैलोक्यं सचराचरम्‌ ।
कलशेऽस्मिन्‌ क्षिपामीदं सर्वकर्मफलप्रदम्‌ ॥
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनन्तपुण्यफलदं कुम्भेऽस्मिन्‌ प्रक्षिपाम्यहम्‌ ॥
कलशामध्ये अक्षता वाहून वरुण देवतेचे आवाहन करावे.
पाशहस्तं च वरुणं यादसांपतिमीश्वरम्‌ ।
आवाहयामि यज्ञेऽस्मिन्‌ पूजनार्थं नमामि तम्‌ ॥
अस्मिन्‌ कलशे वरुणाय नमः ।
वरुणं सांगं,  सपरिवारं सायुधं, सशक्तिकम्‌ आवाहयामि ।
यानंतर नवग्रह व वरुण यांची एकदमच पुढील उपचार वाहून पूजा करायची आहे.
सर्वांसाठी
आवाहित देवताभ्यो नमः ।
असे म्हटले आहे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि ।
आसनासाठी देवाला अक्षता वाहाव्या.
आवाहित देवताभ्यो नमः ।
आसनार्थे अक्षतान्‌ समर्पयामि ।
डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन ते पाणी फुलाने किंवा दूर्वेने देवावर शिंपडावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
पादयोः पाद्यं समर्पयामि ।
अर्ध्यपात्रातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते अर्ध्य फुलाने देवावर शिंपडावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
हस्तयोः अर्ध्य समर्पयामि ।
पुनः साधे पाणी देवावर शिंपडावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
आचमनीयं समर्पयामि ।
स्नानासाठी देवावर पुनः पाणी शिंपडावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
स्नानं समर्पयामि ।
देवाला कापसाची २ वस्त्रे वहावीत. नसल्यास अक्षता वाहाव्या.
आवाहित देवताभ्यो नमः ।
वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं,
अक्षतान्‌ वा समर्पयामि ।
देवाला जानवे वाहावे. नसल्यास अक्षता वाहाव्या.
आवाहित देवताभ्यो नमः ।
उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं, अक्षतान्‌  वा समर्पयामि ।
देवाला करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे -
आवाहित देवताभ्यो नमः ।
विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।
देवाला अलंकारासाठी अक्षता वाहाव्यात.
आवाहित देवताभ्यो नमः ।
अलङ्‌कारार्थे अक्षतान्‌ समर्पयामि ।
देवाच्या अंगभूत असणार्‍या देवीला अगोदर हळद् व नंतर कुंकू वाहावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
हरिद्रां कुङ्‌कुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।
देवाला शेंदूर अष्‍टगंध इत्यादि वाहावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
परिमलद्रव्यं समर्पयामि ।
दूर्वांची जुडी सोडून गंध-अक्षता-हळद-कुंकू यांच्यासह आपल्याकडे दूर्वाग्र करुन वाहावी.
आवाहित देवताभ्यो नमः ।
दूर्वाङ्‌कुरान्‌ समर्पयामि ।
( सूर्य, मंगळ व वरुण या देवांना ) देवाला लाल फूल वहावे. ( फुलाचे डेख देवाकडे करावे )
आवाहित देवताभ्यो नमः ।
पूजार्थे कालोद्‌भवपुष्पं समर्पयामि ।
उजव्या हाताने अगोदर उदबत्ती व नंतर नीरांजन ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी.
आवाहित देवताभ्यो नमः ।
धूपं आघ्रापयामि ।
आवाहित देवताभ्यो नमः ।
दीपं दर्शयामि ।
देवाच्या समोर किंवा चौरंगावर पाण्याने चौकोन करुन त्यावर एका वाटीत पेढे ठेवावीत. उजव्या हातात पाणी घेऊन ते नैवेद्याभोवती एकदा फिरवावे, व हात जोडावेत.
सत्यंत वर्तेन परिषिंचामि ।
आवाहित देवताभ्यो नमः ।
नैवेद्यार्थे उपलब्धनैवेद्यं समर्पयामि ।
प्राणाय नमः ।
अपनाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।
नैवेद्या भोवती पुनः एकदा पाणी फिरवून पळीभर पाणी ताम्हनात सोडावे व हात जोडावेत.
नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि ।
अपनाय नमः ।
व्यानाय नमः ।
उदानाय नमः ।
समानाय नमः ।
प्राणाय नमः ।
ब्रह्मणे नमः ।
उजव्या हातावरुन चार वेळा ताम्हनात सोडावे आणि देवाला गंध फूल वहावे.
उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
आचमनीयं समर्पयामि ।
करोद्‌वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।
चौरंगावर विडा, दक्षिणा, खारीक, बदाम, किंवा उपलब्ध असलेले फळ ठेवून त्यावर उजव्या हातावरून पाणी सोडावे.
आवाहित देवताभ्यो नमः ।
मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं, खर्जुरीफलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित कालोद्‌भवफलं समर्पयामि ।
सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि ।
देवाला गंध-फूल वाहून नमस्कार करावा.
आवाहित देवताभ्यो नमः ।
मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि ।
नमस्करोमि ।
उजव्या हातावरुन ताम्हनात पाणी सोडावे.
अनेन कृतपूजनेन आवाहित देवताः प्रीयतां न मम ।
पूजा झाल्यावर गणपतीची, देवीची आरती करुन मंत्रपुष्पांजलि म्हणून झाल्यावर सर्वांनी प्रार्थना करावी. हात जोडावेत.
आवाहनं न जानामि, न जानामि तवार्चनम्‌ ।
पूजां चैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं, भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥
उजव्या हातावरुन पुनः पाणी सोडावे.
कृतस्य कर्मणः सांगतासिद्धयर्थं ब्राह्मणाय यथाशक्ति दक्षिणा-प्रदानं करिष्ये ।
एका विडयावर गंधाक्षतफूल, नारळ व दक्षिणा ठेवून त्यावर पळीने पाणी वाहून नमस्कार करावा. पूजा पूर्ण झाल्यावर यजमानाने घराच्या प्रवेश दाराच्या खालच्या उंबरठयावर कोपर्‍यात दोन्ही बाजूला कुंकुमाने स्वस्तिक काढावे. वरच्या बाजूला तोरण बांधावे. दारावर
॥ शुभ ॥ लाभ॥ श्री गणेशाय नमः ।
असे लिहावे.
नवीन घरात प्रवेश असेल तर गणपतीचे चित्र चिकटविणे. यजमान-पत्‍नीने स्वयंपाकाच्या ओटयावर कुंकमाने स्वस्तिकं काढावे. स्टोव्ह / गॅसची शेगडी यांची पूजा करावी. दूध तापत ठेवावे. थोडे दूध उतू गेल्यावर नंतर चहा / कॉफी करावी. सर्वांना यथाशक्ति अल्पोपहार व चहा / कॉफी द्यावी. अथवा रस, सरबत आदि शुद्ध पेय द्यावे. पेढे वाटावे.
दुसर्‍या दिवशी आपण ज्या देवतांची पूजा केली त्यांचे अक्षता वाहून विसर्जन करावे.
यांतु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं ।
इष्‍टकाम प्रसिद्धयर्थं पुनरागमनाय च ॥
कुलदेवतेला ठेवलेला विडा नारळ आपण प्रसाद म्हणून घरात वापरावा. क्षेत्रपालाचा विडा / नारळ रखवालदाराला द्यावा. अन्य सर्व उरलेले विडे, नारळ, तांदूळ सुपार्‍या व वर सांगितलेला विडा व दक्षिणा आपल्या गुरुजींना द्यावी. यानंतर आपल्या सोईप्रमाणे नव्या घरात सर्व घर सामान व्यवस्थित लावून झाल्यावर आपल्याला यथोचित वेळी वास्तुशांती करावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP