गृहप्रवेश - पूजा प्रारंभ

नवीन घर घेतल्यावर वास्तुशांत करावयाचे नसल्यास गृहप्रवेश विधी करून राहायला जाता येते.


अथ पूजा-प्रारंभः ।

श्रीगणेशाय नमः ।
पूजा करणार्‍या पति-पत्‍नीने ( अथवा ) एकटयाच व्यक्तीने पाटावर बसावे. पतीने स्वतःच्या कपाळाला लाल गंध उभे लावून घ्यावे. पत्‍नीने स्वतःला हळद-कुंकू लावून घ्यावे अथवा अन्य सुवासिनीने पुरुषाला वर सांगितल्याप्रमाणे लाल गंध लावावे व सुवासिनीला हळद-कुंकू लावावे. नंतर कुंकुम तिलक करणार्‍या सुवासिनीला पूजेला बसलेल्या सुवासिनीने हळद-कुंकू लावावे. पुरुषाने विडा द्यावा. लहानाने नमस्कार करावा. पद्धत असेल तर पूजेला बसणार्‍या पति-पत्‍नीला कुंकू लावणार्‍या सुवासिनीने ओवाळावे. पूजेला बसणार्‍या सुवासिनीची ओटी भरण्याचीही पद्धत आहे. पद्धतीप्रमाणे करावे.

हे सर्व झाल्यावर पूजा करणार्‍या व्यक्तीने आचमन करावे. पुढील तीन नावांचा उच्चार करुन आचमन करावे. प्रत्येक नावाच्या उच्चाराच्या शेवटी संध्येच्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन प्यावे. यालाच आचमन म्हणतात. आचमन केल्यावर उजव्या हातावरुन ताम्हनात पाणी सोडून हात धुवावा.
केशवाय नमः ।
नारायणाय नमः ।
माधवाय नमः ।
गोविंदाय नमः ।
असे म्हणून उजव्या हाताने पळीभर पाणी ताम्हनात सोडावे. पुनः आचमन करावे.
केशवाय नमः ।
नारायणाय नमः ।
माधवाय नमः ।
गोविंदाय नमः ।
असे म्हणून उजवा हात धुवून हात जोडून नंतर पुढील नावे म्हणावीत -
विष्णवे नमः ।
मधुसूदनाय नमः ।
त्रिविक्रमाय नमः ।
वामनाय नमः ।
श्रीधराय नमः ।
ह्रुषीकेशाय    नमः ।
पद्मनाभाय नमः ।
दामोदराय नमः ।
संकर्षणाय नमः ।
वासुदेवाय नमः ।
प्रद्युम्नाय नमः ।
अनिरुद्धाय नमः ।
पुरुषोत्तमाय नमः ।
अधोक्षजाय नमः ।
नारसिंहाय नमः ।
अच्युताय नमः ।
जनार्दनाय नमः ।
उपेंद्राय नमः ।
हरये नमः ।
श्रीकृष्णाय नमः ।
उजव्या हातात अक्षता घेऊन गणपतीचे स्मरण करावे व नमस्कार करावा. अक्षता विडयावर वाहाव्यात.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि-समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
महागणपतये नमः ।
प्रार्थनापूर्वकं तांबूलं नारिकेलफलं समर्पयामि ।
नमस्करोमि ।
अक्षता घेऊन आपल्या कुलदेवतेचे स्मरण करुन हातातील अक्षता विडयावर वाहाव्यात. सुवासिनीने हळ्द-कुंकू वाहावे व नमस्कार करावा.
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताःस्म ताम्‌ ॥
कुलदेवतायै नमः ।
प्रार्थनापूर्वकं तांबूलं नारिकेलफलं च समर्पयामि ।
नमस्कोरोमि ।
अक्षता घेऊन क्षेत्रपालाचे स्मरण करुन विडा व नारळ यांवर अक्षता वाहाव्यात. नमस्कार करावा.
क्षेत्रपालदेवताभ्यो नमः ।
प्रार्थनापूर्वकं तांबूलं नारिकेलफलं च समर्पयामि ।
नमस्कोरोमि ।
अक्षता घेऊन वास्तुदेवतेचे स्मरण करुन विडयावर अक्षता वाहाव्यात. नमस्कार करावा.
वास्तुदेवंतायै नमः ।
प्रार्थनापूर्वकं तांबूलं समर्पयामि ।
नमस्कोरोमि ।
अक्षता ठेवलेले सर्व विडे व नारळ यांच्यावर पळीने पाणी वाहावे. गणपतीला ठेवलेला विडा ( नारळ ) घरातील देवांपुढे ठेवावा. ( पानांचे डेख, नारळाची शेंडी देवापुढे करावी. सुवासिनीने देवांना हळदकुंकू वाहावे. दोघांनी देवांना तसेच घरातील मोठया माणसांना नमस्कार करावा. नंतर पूजा करण्यासाठी आसनावर येऊन बसावे. )
हातात अक्षता घेऊन, हात जोडून पुढीलप्रमाणे देवादिकांना वंदन करावे.
श्रीमन्महागणाधिपतये नमः ।
श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः ।
श्रीउमामहेश्वराभ्यां नमः ।
श्रीशचीपुरंदराभ्यां नमः ।
मातापितृभ्यां नमः ।
इष्‍टदेवताभ्यो नमः ।
कुलदेवताभ्यो नमः ।
ग्रामदेवताभ्यो नमः ।
स्थानदेवताभ्यो नमः ।
वास्तुदेवताभ्यो नमः ।
सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।
सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः ।
आदित्यादिनवग्रह देवताभ्यो नमः ।
अविघ्नम्‌ अस्तु ।
यांनतर पुढील श्र्लोकांनी देवदेवतांचे ध्यान व स्तवन करावे.
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गजकर्णकः ।
लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः ।
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ॥
विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा ।
संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते ॥
शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजम्‌ ।
प्रसन्नवदनं ध्यायेत्‌ सर्वविघ्नोपशांतये ॥
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके ।
शरण्ये त्र्यंबके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥
सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममंगलम्‌ ।
येषो ह्रुदिस्थो भगवान्‌ मंगलायतनं हरिः ॥
तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव ।
विद्याबलं दैवबलं तदव लक्ष्मीपते तेंऽघ्रियुगं स्मरामि ॥
लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराभवः ।
येषामिंदीवरश्यामो ह्रुदयस्थो जनार्दनः ॥
विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान्‌ ।
सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थ सिद्धये ॥
अभीप्सितार्थसिद्धयर्थं पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः ।
देवा दिशंतु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः ॥
आता हात जोडलेले आहेत अशा स्थितीतच देश, काल, ऋतु, मास, तिथी, वार इत्यादींचा पुढील प्रमाणे उच्चार करावा. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया, प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे, विष्णुपदे, श्रीश्वेतवाराहकल्पे, वैवस्वत मन्वंतरे, कलियुगे, कलिप्रथम चरणे, भरतवर्षे, भरतखंडे, जम्बुद्वीपे, दंडकारण्ये देशे, गोदावर्याः दक्षिणेतीरे, कृष्णावेण्योः उत्तरे तीरे, शालिवाहन शके, अमुकनामसंवत्सरे, अमुकअयने, अमुकऋतौ, अमुकमासे, अमुकपक्षे, अमुकतिथौ, अमुकवासरे, अमुकदिवस नक्षत्रे, अमुकस्थिते वर्तमाने चंद्रे, अमुकस्थिते श्रीसूर्ये, अमुकस्थिते देवगुरौ, शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थान-स्थितेषु सत्सु, एवंगुण-विशेषण-विशिष्‍टायां, शुभपुण्यतिथौ,
( येथे ते ते संवत्सर, ऋतु, महिना, इत्यादिकांच्या नावांचा उच्चार करावा - उदा. प्रमोदनाम संवत्सरे, वरीलप्रमाणे उच्चार करणे अशक्य असेल तर खालील श्र्लोक म्हणावा व त्यानंतर शेषेषु ग्रहेषु....
तिर्थिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च । योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्‌ ॥
उजव्या हातात पळीने पाणी घेऊन पुढील संकल्प म्हणावा-
मम आत्मनः, सकलशास्त्रपुराणोक्त, फलप्राप्‍त्यर्थ, अस्माकं, सकलकुटुंबानां, क्षेमस्थैर्य-आयुरारोग्य-सकल ऐश्वर्य प्राप्‍त्यर्थं,  सकलपीडा परिहारार्थं, मनसेप्सित-सकलमनोरथसिद्धयर्थं, शारीरिक, वाचिक, मानसिक, सुखप्राप्‍त्यर्थं, तथा च नूतन गृहप्रवेश समये ( गृहारंभसमये ) आदित्यादिनवग्रहाणां आनुकूल्यार्थं अद्य आदित्यादि नवग्रह पूजनं तथा च वरुणपूजनं करिष्ये ।
हातातील पाणी ताम्हनात सोडावे. (भूमिपूजनाचा संकल्प - तथा च कच्छप, वराह, शेषभूमि, तथा च गृहारंभसमये विविध खनिज साधनानां ( पहार, कुदळ, फावडे इ. ) पूजनं करिष्ये । )
उजव्या हातावरुन पुनः ताम्हनात पाणी सोडावे -
निर्विघ्नार्थं श्रीमहागणपतिपूजनं, कलश-घंटा-दीप पूजनं, च करिष्ये ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP