द्वादश स्कंध - अध्याय तिसरा

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । नृपाएकदांपृथ्वीवरी । कर्मयोगेंवृत्रारी । नवर्षलामेघवारी । घोरदुष्काळपडियेला ॥१॥

पधरावर्षेंपर्यंत । अवर्षणतेव्हांहोत । धान्यकैचेंनिपजत । जनव्यापिलेक्षुधेनें ॥२॥

अश्वमहिष उष्ठ्रखर । मारुनभक्षितींतयानर । कोल्हीकुत्रीडुक्कर । सर्वभक्ष्यजाहले ॥३॥

शवाचेझालेपर्वत । लोकशवेंचीभक्षित । जननीबाळासीखात । आकांतएवंवर्तला ॥४॥

विप्रकरितींविचार । केविपाळिजेसंसार । रक्षीलसर्वांसाचार । गौतमथोरतपस्वी ॥५॥

गायत्रीचाउपासक । मोठाआहेधार्मिक । सुभिक्षतेथेसंम्यक । आहेऐसेंऐकिलें ॥६॥

तेथेंगेलेंबहुजन । चलाजाऊआपण । एवंसर्वींविचारुन । निघालेसर्वविप्रते ॥७॥

ओझेंभरुनीशकटीं । मुलेंबैसविलींधाकुटी । स्त्रियागेधनासपाठी । सदासदासीनिघाले ॥८॥

पूर्वादिसर्वदिशांतून । आलेअसंख्यब्राम्हण । गौतमेसमाजपाहून । नमुनित्यांसन्मानिले ॥९॥

कुशलादिप्रश्नकरुन । विचारिलेंयेण्याचेंकारण । दुःखितसर्वांसीपाहून । आश्वासिलेंमुनिवरें ॥१०॥

आजिआश्रमपावन । केलास्वामीयेऊन । पादधुळीस्पर्शून । दुरितसर्वहरियेलें ॥११॥

धन्यझालोभवदर्शनें । सुखेंसर्वांनिराहणें । दाससर्वांचाजाणणें । तपोधनाहोमजलागी ॥१२॥

एवंसर्वांआश्वासुन । यज्ञशालेंमाजीजाऊन । केलेंगायत्रीचेंस्तवन । भक्तिभावेंकरुनिया ॥१३॥

हे अंबेगायत्री । करुणाकरेसावित्री । ममदेवतेजगत्धात्री । धांवपावयेसमईं ॥१४॥

वेदसारेतत्वमये । सर्वज्ञेकरुणालये । ब्रम्हदेवतेब्रम्हमये । धांवपावयेसमईं ॥१५॥

कर्माप्रियेसर्वसाक्षिणा । धर्मप्रियेजगतारिणी । विप्रप्रियेवेदजननी । धांवपावयेवेळीं ॥१६॥

दयासागरेब्रम्हरुपिणी । कामदुघेविष्णुमोदिनी । सर्वप्रदे़शिवकामिनी । धांवपावयेसमईं ॥१७॥

कैचेंतप अनुष्टान । कैचेंसंध्याआणिस्नान । नघडेंकांहींसाधन । धांवपावयेसमईं ॥१८॥

माझेंअपराधपर्वत । कृपावज्रेनाशीत्वरित । जननीतूंयेईधांवत । धांवपावयेसमयी ॥१९॥

अनंतकोटिनमस्कार । मानूनमाझेंसत्वर । संकटकरीमाझेंदूर । धांवपावयेसमईं ॥२०॥

कोण असेऐसाअन्य । जोकरीलमजधन्य । नाहींदुजातुजवांचून । धांवपावयेसमईं ॥२१॥

मुलेंजेव्हांरुसावें । आईनेंसवेंसमजवावें । उलटकेवीमहाप्रभावे । धांवपावयेसमईं ॥२२॥

मीबाळतूंजननी । दुरावलीसकेंवीटाकुनी । गुंतलीसकोठेंभवानी । धांवपावयेसमईं ॥२३॥

जरीमजनरक्षिसी । कायलाभ असेतुजसी । दयासागराम्हणविशी । धांवपावयेसमईं ॥२४॥

ऐकतांचिऐसाधावा । प्रत्यक्ष आलीकरुणार्णवा । पात्रदेउनीतेधवा । आज्ञापीतमुनीशी ॥२५॥

जेंजेंतूंइच्छिशील । पूर्णपात्रींलाधेल । वरदेऊन अनमोल । गुप्तझालीगायत्री ॥२६॥

वस्त्रेंपात्रेंधान्यधन । सर्वरस आणिरत्न । सर्वझालेंनिर्माण । पात्रांतूनतसमईं ॥२७॥

आश्रमझालाशतयोजन । सर्वत्रराहतींब्राम्हण । रोगदोषभयतेथून । पळालेसर्वनृपाळा ॥२८॥

वस्त्राभरणेंकरुन । विप्रस्त्रियाशोभायमान । वस्त्रेंमाल्यचंदन । विप्रशोभतीसर्वही ॥२९॥

गौतमवाक्येंकरुन । कोणांसकांहींनसनून । ज्योतिष्टोमादिकींयजन । विप्रकरितीआनंदें ॥३०॥

इतरहीराहतीबहूतजन । इंद्रहीकरीस्तवन । म्हणेहोगौतमधन्य । दुष्काळांतवपादेईं ॥३१॥

एवंबारावर्षेंझाली । गायत्रीचीस्थापनाकेली । सर्वद्विजेंप्रेमेपुजिली । सर्वप्रदापरांबा ॥३२॥

पुत्रापरीसांभाळकेला । अणुमात्रगर्वनशिवला । धन्य ऐशाभाग्यवंताला । देवीकृपाहेंचिफल ॥३३॥

तेथेंनारदपातला । सभेंमाजीबैसला । गौतमासीबोलला । धन्यधन्य अससीतूं ॥३४॥

देवसभेसींऐकिलें । इंद्रेंतवयशगाइलें । अकाळीविप्रपोशिलें । यज्ञकेलेबहुसाल ॥३५॥

ऐकूनम्यातेथेंयश । आलोतुजपहायास । ब्रम्हर्षेंधन्य आहेस । देवीगायत्रीप्रसादें ॥३६॥

एवंगौतमाप्रशंसून । गायत्रीदर्शनकरुन । नारदगेलानिघून । स्वेष्टगतीमहात्मा ॥३७॥

गौतमाचेंयश ऐकून । तयांविप्रानझालेसहन । गौतमादोषदेऊन । जावेंऐसेंविचारिती ॥३८॥

विपरीतनृपाकाळगती । एवंझालीविपरीतमती । धन्यत्यांचेवडिलाप्रती । उत्पत्तीऐशीजेथुनी ॥३९॥

त्यांहीमावेंगायरचिली । गौतमाचेगृहीगेली । हुंहूंम्हणतांचिमेली । गोध्नम्हणतीगौतमा ॥४०॥

विस्मयझालामुनीसी । योगेपाहिलेंमानसी । विप्रकृत्यकळलेत्यासी । प्रलयाग्नीसमकोपला ॥४१॥

शापवदलादारुण । म्हणेतुम्हीब्राम्हण । फळदेतोघ्याओपुन । पुर्णपणेंकर्मांचे ॥४२॥

गायत्रीवेदवेदोक्त । शिव आणिशिवभक्त । मूलप्रकृतितत्कृत्य । पराडमुखव्हालसर्वतुम्ही ॥४३॥

देवीमंत्रकथानुष्ठान । कर्मधर्म उत्सवदर्शन । भक्तासांनिध्यभक्तार्चन । पराड्मुखव्हाल अधमानों ॥४४॥

रुद्राक्ष आणिभस्मधारण । देवीनामानुकीर्तन । श्रौतस्मार्तसदाचरण । प्रराड्मुखव्हाल अधमानों ॥४५॥

अग्निहोत्रबिल्वार्पण । स्वाध्यायसंध्यागोदान । श्राद्धादिकृछ्रचांद्रायण । पराड्मुखव्हाल अधमानों ॥४६॥

शिवशिवेवांचून । अन्यदेवींजावोमन । शंखचक्रादिधारण । पाखंडतुह्मांआवडो ॥४७॥

यावत्‍ अधर्मभाजन । तुम्हींअधमब्राम्हण । एवंतयांशापुन । जलस्पर्शकरीमुनी ॥४८॥

देवीच्यागेलादर्शना । नमस्कारकेलाचरणां । आश्चर्यदेवीमनां । विप्रकृत्यपाहूनी ॥४९॥

आद्यापिविस्मयकारक । देवीचेंदिसतसेमुख । गौतमासींम्हणेस्मितमुख । शांतिकरीमहाभागा ॥५०॥

गौतमशापेंकरुन । सर्वविसरलेब्राम्हण । धरिलेयेऊनचरण । त्राहीत्राहीम्हणताती ॥५१॥

दयाआलीऋषीसी । बोलेंतेव्हांतयांसी । मिथ्यात्वनसेंवाक्यासों । अवश्यलागेलभोगावें ॥५२॥

कृष्णावतारजोंवरी । विराजेलपृथ्वीवरी । कुंभापाकतुह्मांतोवरी । जन्मायालनंतर ॥५३॥

ममशापानुकूल । कर्मेंकरालसकल । पुनः पुनः पातकाचेंफळ । भोगालतूह्मींनिश्चयें ॥५४॥

जरीउद्धरावेवाटेमनीं । तरीलागागायत्रीभजनी । तदभजनार्थविप्रयोनी । पावालसर्वकलयुगीं ॥५५॥

ऐकोनित्याचीवचनोक्ती । प्रारब्धम्हणोनिकेलीशांती । तेचिआतांनिश्चिती । जन्माआलेब्राम्हण ॥५६॥

गौतमशापेकरुन । बुद्धीभ्रष्टझालेब्राम्हण । आतांश्रीपुरवर्णन । सांगेन ऐकनृपाळा ॥५७॥

गौतमशापाचेंचरित । श्लोकत्याचे एकशत । ऐकतांभाव उपजत । सज्जनांसीकर्मांचा ॥५८॥

श्रीदेवीविजयेद्वादशस्कंदेतृतीयोऽध्यायः समाप्तः ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP