द्वादश स्कंध - अध्याय पहिला

श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय.


श्रीगणेशायनमः । सतम्हणजेपरात्पर । अविनाशवस्तुसुंदर । सत्यब्रम्हनिर्विकार । सतम्हणजेपरात्मा ॥१॥

तयासीरसाआचार । यानांवसदाचार । तयाचाकेंविआचार । विचारयाचाकरावा ॥२॥

आचारम्हणजेकृती । तोदेखतांनिराकृती । सदाचारनामप्राप्ती । केवींकरावाविवेक ॥३॥

सतजेंवेदीगाइलें । अनंत अव्ययबोलिलें । ओतप्रोत असेंभरलें । निष्कलंकशुद्धतें ॥४॥

सदाचारजेणेंनिर्मिला । जेणेंवर्णिलाऐकिला । अथवाजेणेंआचरिला । सत्याहूनतोपृथकनसे ॥५॥

सत्येंचजोआचरिला । सदाचारतोम्हणविला । दोषलागेयाहीबाला । अनाचारहीसमरसे ॥६॥

आचारनाअनाचार । तेथेंनसेंदोघांथोर । सद्वस्तुनिर्विकार । मनोवाणीकावल्या ॥७॥

हेंतोसर्वखरें । परीजगहेंकेवींपसरे । भ्रांतीकोठूनवापरे । द्वैतकेवीअद्वैतीं ॥८॥

एवंघातलेंकुडें । वेदझालेबोबडे । तेव्हांतेंब्रम्हरोकडे । केवींशब्दप्रगटला ॥९॥

निःशब्दजरीठेला । ब्रम्हशब्दलोपला । नास्तीकतेव्हांबळावला । कांहींचनाहींबोभांत ॥१०॥

त्याचेकरायाखंडन । द्वैतहातींधरुन । अद्वैतकीजेमंडन । द्वैतसहजमावळें ॥११॥

कांटाकांटयानीचनिघे । निघतांफेकीलेदोघें । निष्कंटपणेंझोंपघे । खरे अद्वैतलाधतां ॥१२॥

जेव्हांबोलिलेंसत । तैच उदेलेअसत‍ । असतवांचूनीसत‍ । ओळखावेंतेंकोणी ॥१३॥

सत्यापाठीअसत्य । थोड्यापाठींबहूत । अद्धैतापाठींद्वैत । शब्द उमटेअवश्यहा ॥१४॥

सतेंवर्णिलातोसदाचार । असतेंकेलाअनाचार । समरसताजाहलीदूर । पृथक्पृथकदोघेंही ॥१५॥

सद्वस्तूजेनिरंतर । तदनुभवार्थजोआचार । तयानांवसदाचार । अनाचारवैपरीत्यें ॥१६॥

असततीचहीमाया । राहिलीसत्‍ झांकूनीया । तिसींदूरकराया । सक्रियाचीसमर्थ ॥१७॥

सत्‍ तेंब्रम्हनिष्फल । सक्रियाविद्याप्रबल । असद्विद्येचेकांहींबल । सद्विद्येसींनचाले ॥१८॥

जीवहाचिजाणासत । मनहेंचीझालेंअसत । मनजेव्हांगुप्तहोत । जीवत्वनाशतेव्हांची ॥१९॥

त्यासताचीसदबुद्धी । सदाचारहीचसाधी । तोडीसर्व उपाधी । सक्रियेच्याबलानें ॥२०॥

मनाचीजीकल्पना । अविद्यातीचवासना । सदाचारतत्ववस्तू ॥२१॥

नारदम्हणेमहामुनी । आनंदझालाबहुमनी । देवीप्रसादकारक ॥२२॥

परी असेकष्टसाध्य । कलियुगाहाअसाध्य । अल्पायास आणिसुसाध्य । तत्वयाचेवर्णिजे ॥२३॥

नारदासांगेनारायण । साधोनसाधोकर्म अन्य । परीसंध्याआणिस्नान । अर्घ्यजपघडोसदा ॥२४॥

होऊनियाएकनिष्ठ । गायत्रीजपेविधिनिष्ठ । नित्यत्रिसहस्रवरिष्ठ । तोचिहोयनिर्धारे ॥२५॥

गायत्रीचेजपकाळीं । पादादिन्याससकळी । करुनकवचतेवेळी । पूर्वीजपावीशताक्षरा ॥२६॥

मगकरावेंस्तवन । एकाग्रकीजेंमन । विप्रासींगायत्रीसमान । अन्यदैवतनसेची ॥२७॥

नमोनमोआदिशक्ते । भक्तवत्सलेजगन्माते । सर्वव्याप्तेअनंते । श्रीसंध्यनमोस्तुते ॥२८॥

तूंचिसंध्यागायत्री । नमोनमोसावित्री । सरस्वतीजगद्धात्री । रक्तवर्णेनमोस्तुते ॥२९॥

नमोब्राम्हीवैष्णवी । नमोसौम्येमाधवी । नमोदुर्गेभैरवी । सितेकृष्णेनमोस्तुते ॥३०॥

बालरुपातूंप्रभाती । मध्यान्हींतूंचयुवती । सायंवृद्धाभगवती । त्रयावस्थेनमोस्तुते ॥३१॥

नमोऋग्वेदपाठके । नमोयजुर्वेदरुपिके । नमोसामवेदगायके । अथर्वसिद्धेनमोस्तुते ॥३२॥

नमोनमोहंसवाहिनी । नमोहंसस्वरुपिणी । नमोहंसपदगामिनी । हंसहंसनमोस्तुते ॥३३॥

नमोनमोवृषावाहिनी । नमोनमोवृषतोषिणी । नमोनमोवृषभाविनी । धर्ममूर्तेनमोस्तुते ॥३४॥

नमोनमोसुपर्णवाहिनी । नमोसुपर्णविधायिनी । नमोस्रुपर्णमोहिनी । त्रिसुपर्णेनमोस्तुते ॥३५॥

भरादिसप्तलोकी । व्याप्त आहेसत्रिलोकी । भक्तवत्सलेविनायकी । सर्वमयेनमोस्तुते ॥३६॥

सप्तऋषिप्रीतिजनके । अनंतविश्वमायिके । अनंतवरदायिके । सर्वपालेनमोस्तुते ॥३७॥

शिवाशिवनेत्रांतुनी । हस्ताश्रूंघर्मापासुनी । दशरुपेंदुर्गेजननी । प्रत्यक्षातुनमोस्तुते ॥३८॥

नीलगंगासंध्यावरदा । वरिष्ठावरारोहासर्वदा । गरिष्ठासंध्याभोगमोक्षदा । वरवर्णिनीनमोस्तुते ॥३९॥

भागीरथीभोगावती । त्रिपथातूंसुधावती । शोकधरेभूमिगती । धरत्रीतेनमोस्तुते ॥४०॥

भुवर्लोकींवायुमया । स्वर्लोकींतेजोमया । महर्लोकींसिद्धिमया । जनमयेनमोस्तुते ॥४१॥

तपोलोकीतपस्विनी । सत्यलोकींसत्यवाणी । विष्णुलोकींनारायणी । ब्रम्हगायत्रीनमोस्तुते ॥४२॥

रुद्रलोकींतूंचिगौरी । अहंपदतूंचिउरी । प्रणवतूंचीप्राणांतरी । अनहंकृतीनमोस्तुते ॥४३॥

अनाहततूंचिध्वनी । प्रकृतितूंचिबीजयोनी । शबलबम्हरुपिणी । समावस्थेनमोस्तुते ॥४४॥

तद्वाच्यतेंतप्तरा । परापरमापरात्परा । इच्छाज्ञानक्रियापरा । शक्तित्रयोनमोस्तुते ॥४५॥

गंगायमुनासरस्वती । विपाशाशरयूऐरावती । नर्मदादैविकाचर्मण्वती । गोदावरीनमोस्तुते ॥४६॥

तापीगंडकीवितस्ता । गोमतीचित्राशतद्रुता । कौशिकीचंद्रभागाख्याता । कावेरीतेनमोस्तुते ॥४७॥

इडापिंगलासुषुन्मा । गांधारीहस्तजिव्हानाम्ना । पुषापुषामहाधाम्ना । अलंबुषानमोस्तुते ॥४८॥

कुहूशंखिनीप्राणवाहिनी । नाडीतूंशरीरगामिनी । ह्रदयस्थाप्राणधारिणी । कंठस्थेतेनमोस्तुते ॥४९॥

स्वप्नाचीतूंनायिका । तालुस्थांशब्दगोपिका । तूंचिआधारदायिका । मंत्रनायकेनमोस्तुते ॥५०॥

बिंदुस्थांबिंदुमालिनी । मुलाधारेकुंदलिनीं । शक्तीतुंसर्वव्यापिनी । केशमूलगेनमोस्तुते ॥५१॥

तूंशिखांतरवासिनी । तूंशिखाग्रशायिनी । सर्वांवस्थांमनोन्मनी । महादेवीनमोस्तुते ॥५२॥

फारकासयाबोलणें । जेंदिसेंबोलेंऐकणें । रुपतुझेंचिमीजाणें । श्रियेसंध्येनमोस्तुते ॥५३॥

हेंस्तोत्रकरितांपठण । सर्वपातकांचेदहन । सर्वपुरुषार्थसाधन । प्रसन्नहोयगायत्री ॥५४॥

करावेंस्तोत्रपठण । सहस्रनामाचेंकीर्तन । गुरुपाशीदीक्षाघेऊन । यथास्थित आचारावें ॥५५॥

हेंचिसर्वसाधन । अतिरहस्यवेदनिधान । येणेंचिमजसमाधान । झालेंजाणनारदा ॥५६॥

तूंहीगायत्रीचेंध्यान । करिनित्य अनुष्ठान । नद्यावेंशठाकारण । देवीभक्तांदेइजें ॥५७॥

व्यासम्हणेनृपती । एवंवदोनिनारदाप्रती । डोळेंमिटूननिश्चिती । ध्यानस्थझालानारायण ॥५८॥

नारदेकरुनीनमन । गेलातपालागुन । करावयादेवीदर्शन । मनींप्रेम उपजलें ॥५९॥

अठ्ठावीसचतुःशत । गायत्रीआख्यान अदभुत । वर्णिलेंयेथेंकिंचित । प्राकृतबोधाकारणें ॥६०॥

श्रीदेवीविजयेद्वादशेप्रथमः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP