मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|वेदोक्त वास्तुशांती| निर्विघ्नार्थं गणपतिपूजन वेदोक्त वास्तुशांती धार्मिक महत्व साहित्य अथ पंचगव्य मेलनम् । यज्ञोपवीत संस्कार : क्षेत्रपाल वंदन देवतावंदन आणि संकल्प निर्विघ्नार्थं गणपतिपूजन मंगलार्थं स्वस्ति पुण्याहवाचन नांदीश्राद्ध स्थलशुद्धि वास्तुमंडल रेषा ग्रहदेवतास्थापन वास्तुशांती - निर्विघ्नार्थं गणपतिपूजन वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.While entering a new house, as per the Vedic tradition, a Vastushanti homam (shanti) is performed, this acts as a remedy for whatever malific influences are present in the house and removes the vastu. Tags : shantivastushantividhiवास्तुशांतीविधीशांती निर्विघ्नार्थं गणपतिपूजन Translation - भाषांतर निर्विघ्नार्थं गणपतिपूजनतांदुळाच्या राशीवर गणपति - पूजनासाठी पद्धतीनुसार सुपारी किंवा नारळ ठेवावा. नारळाची शेंडी पूजा करणार्याकडे असावी. त्यावर गणपतीचे आवाहन करावे. हातात अक्षता घ्याव्यात.ॐ गणानां त्वा गणपति हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं । ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ नः शृण्वन् नूतिभिः सीदसादनं ।ॐ भूर्भुवःसुवः । अस्मिन् पूगीफले ( नारिकेलफले ) महा गणपतिं सांगं, सपरिवारं, सायुधं, सशक्तिकं, आवाहयामि ।( प्रत्येक वेळी देवतेच्या नावापूर्वी ॐ भूर्भुव: सुव: असे म्हणावे. )अक्षता घेऊन देवाचे ध्यान ( स्मरण ) करुन अक्षता वाहाव्यात. महागणपतये नमः । ( ध्यायेत् ) ध्यनार्थे अक्षतान् समर्पयामि ।आसनासाठी देवाला अक्षता वाहाव्यात.महागणपतये नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।डाव्या हाताने पळीत पाणी घेऊन, ते पाणी फुलाने किंवा दूर्वेने देवावर ( गणपतीवर ) शिंपडावे.महागणपतये नमः । पादयोः पाद्यं समर्पयामि ।अर्घ्यपात्रातील पाणी डाव्या हाताने पळीत घेऊन ते अर्घ्य फुलाने देवावर शिंपडावे.महागणपतये नमः । हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि ।पुनः साधे पाणी देवावर शिंपडावे.महागणपतये नमः । आचमनीयं समर्पयामि ।स्नानासाठी देवावर पुनः पाणी शिंपडावे.महागणपतये नमः । स्नानं समर्पयामि ।देवाला कापासाची २ वस्त्रे वाहावीत. नसल्यास अक्षता वाहाव्यात.महागणपतये नमः । वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं, अक्षतान् वा समर्पयामि ।देवाला जानवे वाहावे. नसल्यास अक्षता वाहाव्यात.महागणपतये नमः । उपवस्त्रार्थे यज्ञोपवीतं, अक्षतान् वा समर्पयामि ।देवाला करंगळीजवळच्या बोटाने गंध लावावे.महागणपतये नमः । विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि ।देवाला अलंकारासाठी अक्षता वाहाव्यात.महागणपतये नमः । अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि ।देवाच्या अंगभूत असणार्या ऋद्धिसिद्धींना अगोदर हळद व नंतर कुंकू वाहावे.ऋद्धिसिद्धिभ्यां नमः । हरिद्रां - कुडकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि ।देवाला शेंदूर, अष्टगंध, इत्यादी वाहावे.महागणपतये नमः । परिमलद्रव्यं समर्पयामि ।दूर्वांची जुडी सोडून गंध - अक्षता - हळद - कुंकू यांच्यासह आपल्याकडे दूर्वाग्र करुन वाहावी.महागणपतये नमः । दूर्वांकुरान् समर्पयामि ।देवाला लाल फूल वाहावे. ( फुलाचे डेख देवाकडे करावे. )महागणपतये नमः । पूजार्थे कालोद्भव - पुष्पं समर्पयामि ।उजव्या हाताने अगोदर उदबत्ती व नंतर नीराजन ओवाळावे. डाव्या हाताने घंटा वाजवावी.महागणपतये नमः । धूपं समर्पयामि । महागणपतये नमः । दीपं समर्पयामि ।देवाच्या समोर पाण्याने चौकोन करुन त्यावर गूळ, खोबरे, पेढे ठेवावे. उजव्या हातात पाणी घेऊन ते नैवेद्याभोवती एकदा फिरवावे व हात जोडावेत.सत्यंत्वर्तेन परिषिंचामि । अमृतोपस्तरणमसि । ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।नैवेद्याभोवती पुनः एकदा पाणी फिरवून हात जोडावेत.ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा । ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा । ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।उजव्या हातावरुन चार वेळा ताम्हनात पाणी सोडावे. नंतर देवाला गंध फूल वाहावे.उत्तरापोशनं समर्पयामि । हस्तप्रक्षालन समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि । आचमनीयं समर्पयामि । करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि ।सोइस्कर जागी विडा, दक्षिणा, खारीक, बदाम व उपलब्ध असलेले फळ व दक्षिणा ठेवून त्यांवर डाव्या हातातील पळीने उजव्या हातावरुन पाणी सोडावे.महागणपतये नमः । मुखवासार्थे पूगीफल - तांबूलं, खर्जुरी फलं, वाताम्बुफलं, यथासम्पादित - कालोद्भव - फलं समर्पयामि । तथा अ सुवर्णपुष्पदक्षिणां च समर्पयामि ।देवाला गंध - फूल वाहून नमस्कार करावा.महागणपतये नमः । मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि । नमस्करोमि ।हातात अक्षता घेऊन प्रार्थना करुन झाल्यावर हातातील अक्षता देवाला वाहाव्यात.वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।महागणपतये नमः । प्रार्थनां समर्पयामि ।उजव्या हातावरुन ताम्हनात पाणी सोडावे.अनेन कृतपूजनेन महागणपतिः प्रीयताम् ।यानंतर कलश, शंख, घंटा, दीप पूजन करावे. N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP