आश्लेषादि जन्मनक्षत्रांचीं फळें

ज्योतिष हा विषय वेदांइतकाच प्राचीन आहे .


आश्लेषादि जन्मनक्षत्रांचीं फळें .

आश्लेषाख्यसमुत्पन्नौ श्वश्रूं कन्यासुतौ हत : ।

मूलजौ श्वशुरं हंति ज्येष्ठोत्था स्वधवाग्रजम् ॥६७॥

खालीं लिहिलेले अपवाद खेरीज करून आश्लेषानक्षत्रावर जन्मलेली कन्या अथवा पुत्र हीं आपल्या विवाहानंतर आपल्या सासूला वाईट असतात . मूलनक्षत्रीं जन्मलेली कन्या किंवा पुत्र सासर्‍याला वाईट असतात . ज्येष्ठानक्षत्रोत्पन्न कन्या आपल्या वडील दिराला वाईट आणि विशाखानक्षत्रीं जन्मलेली कन्या धाकटया दिराला वाईट असते , असें मानिलेलें आहे . वाईट म्हणजे क्लेश देणारी असें समजावें .

आश्लेषादि नक्षत्रांचे अपवाद .

आश्लेषाप्रथमः पादः पादो मूलांतिमस्तथा ।

विशाखाज्येष्ठयोराद्यास्त्रय : पादा : शुभावहा : ॥६८॥

आश्लेषाचा पहिला चरण , मूळनक्षत्राचा शेवटचा चरण आणि विशाखा व ज्येष्ठा या दोन नक्षत्रांचे पहिले तीन चरण यांवर कन्या किंवा पुत्र यांचा जन्म झाला असतां शुभ होय , म्हणजे त्यांच्या ठिकाणीं वर लिहिलेले दोष नसतात असें समजावें . अनिष्ट मंगळ व दुष्टनक्षत्रीं जन्म हें प्रथम पाहून नंतर अष्टविधमैत्री पहावी .

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP