काव्यरचना - जगन्नाथ यांना पत्न

महात्मा फुल्यांनी हे काव्य व्यक्तिमात्रास अनुलक्षुन लिहिले नसून फक्त उपमापर लिहून दिलगिरी व्यक्त केली.


आधीं बोधुं लक्षुमणी लक्षुमणी । घाव घालूं निशाणी ॥धृ. ॥

जोड शूद्राला सयाजीरावांची भटांच्या ध्यानीं ॥
कृत्नीम्याचे नेत्न रोखुं पवित्नानीं ॥१॥ आधीं.॥

वडील त्यांचे बहादूर तरवार ढालांनीं ॥
दीन शुद्रां जागे करुं आज सत्य अमृतांनीं ॥२॥आधीं.॥

देशसुधारासाठीं आमच्या रात्नंदिन ध्यानीं ॥
मांगभटां ऐक्य करुं बसवूं पंक्तींनीं ॥३॥आधीं.॥

पुनरपि आम्ही गुरजरप्रांतीं देऊं व्याख्यानीं ॥
मुख्यप्रधाना येश येऊ, जोतीराव मनीं ॥४॥आधीं.॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP