TransLiteral Foundation

श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ११

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


ताटीचें अभंग - ११

आले श्रीगुरुनाथ अथवा येती कळे । व्हावें उतावीळ जावें तेथे ॥१॥

आणावे सेवावें सर्वस्वे निरंतर । तरीचशिष्य येर जाती नरका ॥२॥

असो कांही काज हर्ष का संकट । समय प्राणांत होवो कांहीं ॥३॥

देवो कोणी ताप जावो देह प्राण । उडवो शीर आण शपथ वाहो ॥४॥

जावो देवो नये तारकासी कंही । पडो ब्रह्मांडही कोसळोनि ॥५॥

घाडलिया होय सर्वस्वाची बुड । पुरवावे कोड सर्व कांही ॥६॥

विकावे देहें धरुं नये लाज । साधावें निजकाज याचि देहें ॥७॥

घेवोनि शपथ होवोनि निर्भय । वरावे अक्षय तारकासी ॥८॥

दिधले देवें गात्र शक्ति हें वैभव । मन बुद्धी सर्व अंतरबाह्म ॥९॥

न मिळे न जन्म ऐसा हा पुढती । खोविल्या मागुती कांही केल्या ॥१०॥

नेमें नित्य निशी साठ घटीं आत । साधावे निजहित झटी एक ॥११॥

नसेचि सुलभ राजयोगा ऐसें । याचि देहीं दिसे देव डोळां ॥१२॥

एकांती अभ्यास निकट गुरुक्षेत्री । करावा बसोनि घरीं करु नये ॥१३॥

पुरुषें पत्‍नीसह करावा अभ्यास । घ्यावा उपदेश उमयतां ॥१४॥

आकारिली वस्तु रुपें स्त्रीपुरुष । एकचि प्रत्यक्ष मासे दोन ॥१५॥

म्हणोनि श्रौत स्मार्त योगयाग सर्व । करावें सर्वथैव पत्‍नीसह ॥१६॥

मोगोनि विलास साधावा राजयोग । हटी तो निहर्ग वसे वनी ॥१७॥

असोनिया पत्नी करोनये एकाकी । नेदावे कवतिकी तारकेही ॥१८॥

वदो नये निमित्त काम धंदा आळस । निर्वाहाचे मीष सच्छिष्येंही ॥१९॥

सेवनी प्रेमें सुखें राहोनी संसारी । व्हावे स्वयें हरी आपेंआप ॥२०॥

म्हणे जनार्दन साठवावा संपुटी । उघडी भ्रमताटीएकनाथ ॥२१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-01-23T04:45:46.8570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निकण

 • न. १ दुसर्‍यांदा मळलेली किंवा तुडवलेली ( जोंधळा , बाजरी इ० ची ) कणसे ; पोकळ कणसे . आकण व मदन पहा . २ दाणा होण्यापूर्वीच कणसाचा भाग . - एभा ७ . ३३७ . [ सं . निस + कण ] 
 • वि. १ कणहीन ; मळणी झाल्यावरचे धान्याने न भरलेले , रिकाने , पोकळ ( कणीस ). वांया निकण भुस काय उपणिसी । - ज्ञागा २०३ . २ किड्यांनी खाल्ले गेल्यामुळे सत्वरहित ; निःसत्व ; फोल ( धान्य ). ३ कण्या काढून साफ केलेले ; कणी काढलेले ; बिनकणीचे ( तांदूळ इ० ). ४ कांडतांना कूट न होणारे ( तांदूळ , गहूं इ० ). ५ कणी नसलेले ; हलके भिकार ( तूप ). [ नि + कण ] 
 • a  Void of corn, i.e. thrashed. Wanting granules,-clarified butter. 
RANDOM WORD

Did you know?

आठ या संख्येला माया संख्या आणि नऊला ब्रह्मसंख्या कां म्हणतात?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.