मराठी मुख्य सूची|दिन विशेष|चैत्र मास|चैत्र शुद्ध पक्ष| चैत्र शु. द्वादशी चैत्र शुद्ध पक्ष चैत्र शु.प्रतिपदा चैत्र शु. द्वितीया चैत्र शु. तृतीया चैत्र शु. चतुर्थी चैत्र शु. पंचमी चैत्र शु. षष्ठी चैत्र शु. सप्तमी चैत्र शु. अष्टमी चैत्र शु. नवमी चैत्र शु. एकादशी चैत्र शु. द्वादशी चैत्र शु. त्रयोदशी चैत्र शु. चतुर्दशी चैत्र पौर्णिमा चैत्र शु. द्वादशी Chaitra shuddha Dvadashi Tags : chaitradvadashishudhaचैत्रद्वादशीशुद्ध चैत्र शु. द्वादशी Translation - भाषांतर मदनद्वादशी : हे एक तिथिव्रत आहे. चैत्र शु. द्वादशीला हे व्रत करतात. त्याचा विधी असा- पाण्याने भरलेले एक भांडे घेऊन त्यात थोडे तांदूळ घालावेत व फळे ठेवावीत. नंतर त्या पात्रावर तांब्याचे तबक ठेवावे व त्यात गूळ, खाद्यपदार्थ आणि सोने घालावे. त्या तबकावर काम आणि रती यांच्या मूर्ती (चित्रे) काढाव्यात . त्यांच्यापुढे नैवेद्य म्हणून खाद्यपदार्थ ठेवावेत. नंतर गीतगायन करावे. दुसरे दिवशी ते जलपूर्ण पात्र ब्राह्मणाला दान देऊन त्याला भोजन घालावे. सांगतेच्या वेळी पुढीलप्रमाणे मदनाची प्रार्थना करावी- प्रीयतामत्र भगवान् कामरूपी जनार्दनः ।हृदये सर्वभूतानां य आनन्दोऽभिधीयते ॥अर्थ : कामस्वरूपी जनार्दन सर्वाच्या हृदयामध्ये आनंदरूपाने राहतो व तो (या व्रताने) संतुष्ट होतो. या वेळी व्रतधारी व्यक्तीने आळणी भोजन करावे.या व्रताचा दुसरा पर्याय असा- चैत्र शु. द्वादशीला रात्री केवळ एक फळ खाऊन उघड्यावर झोपायचे. दुसर्या दिवशी उपवास करुन विष्णूची पूजा करावयाची. याप्रमाणे एक वर्ष व्रत केल्यावर उद्यापनाच्या वेळी एक गाय व काही वस्त्र दान द्यावयाची. तिळाचे हवन करावयाचे. दितीने पुत्रप्राप्तीसाठी हे व्रत केले होते. या व्रताने पापनिवृत्ती होते. N/A N/A Last Updated : December 09, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP