श्रीदुर्गासप्तशती - तृतीयोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - तृतीयोऽध्याय:
Durga Saptashati

तृतीयोऽध्याय:
ध्यानम्
ॐ उद्य्दभानुसहस्रकान्तिमरुणक्षौमां शिरोमालिकां
रक्तालिप्तपयोधरां जपवटीं विद्यामभीतिं वरम् ।
हस्ताब्जैर्दधतीं त्रिनेत्रविलसद्वक्त्रारविन्दश्रियं
देवीं बद्धहिमांशुरत्‍नमुकुटां वन्देऽरविन्दस्थिताम् ॥
'ॐ' ऋषिउवाच ॥१॥
निहन्यमानं तत्सैन्यमवलोक्य महासुर: ।
सेनानीश्‍चिक्षुर: कोपाद्ययौ योद्‍धुमथाम्बिकाम् ॥२॥
स देवीं शरवर्षेण ववर्ष समरेऽसुर: ।
यथा मेरुगिरे: श्रृङ्‌गं तोयवर्षेण तोयद: ॥३॥
तस्यच्छित्त्वा ततो देवी लीलयैव शरोत्करान् ।
जघान तुरगान् बाणैर्यन्तारं चैव वाजिनाम् ॥४॥
चिच्छेद च धनु: सद्यो ध्वजं चातिसमुच्छ्रितम् ।
विव्याध चैव गात्रेषु छिन्नधन्वानमाशुगै: ॥५॥
सच्छिन्नधन्वा विरथो हताश्‍वो हतसारथि: ।
अभ्यधावत तां देवीं खड्‌गचर्मधरोऽसुर: ॥६॥
सिंहमाहत्य खड्‌गेन तीक्ष्णधारेण मूर्धनि ।
आजघान भुजे सव्ये देवीमप्यतिवेगवान् ॥७॥
तस्या: खड्‌गो भुजं प्राप्य पफाल नृपनन्दन ।
ततो जग्राह शूलं स कोपादरुणलोचन: ॥८॥
चिक्षेप च ततस्तत्तु भद्रकाल्यां महासुर: ।
जाज्वल्यमानं तेजोभी रविबिम्बमिवाम्बरात् ॥९॥
दृष्ट्‍वा तदापतच्छूलं देवी शूलममुंचत ।
तच्छूलं शतधा तेन नीतं स च महासुर: ॥१०॥
हते तस्मिनमहावीर्ये महिषस्य चमूपतौ ।
आजगाम गजारूढश्‍चामरस्त्रिदशार्दन: ॥११॥
सोऽपि शक्तिं मुमोचाथ देव्यास्तामम्बिका द्रुतम् ।
हुंकाराभिहतां भूमौ पातयामास निष्प्रभाम् ॥१२॥
भग्नां शक्तिं निपतितां दृष्ट्‌वा क्रोधसमन्वित: ।
चिक्षेप चामर: शूलं बाणैस्तदपि साच्छिनत् ॥१३॥
तत: सिंह: समुत्पत्य गजकुम्भान्तरे स्थित: ।
बाहुयुद्धेन युयुधे तेनोच्चैस्त्रिदशारिणा ॥१४॥
युद्ध्यमानौ ततस्तौ तु तस्मान्नागान्महीं गतौ ।
युयुधातेऽतिसंरब्धौ प्रहारैरतिदारुणै: ॥१५॥
ततो वेगात् खमुत्पत्य निपत्य च मृगारिणा ।
करप्रहारेण शिरश्‍चामरस्य पृथक्कृतम् ॥१६॥
उदग्रश्‍च रणे देव्या शिलावृक्षादिभिर्हत: ।
दन्तमुष्टितलैश्‍चैव करालश्‍च निपातित: ॥१७॥
देवी क्रुद्धा गदापातैश्‍चूर्णयामास चोद्धतम् ।
बाष्कलं भिन्दिपालेन बाणैस्ताम्रं तथान्धकम् ॥१८॥
उग्रास्यमुग्रवीर्यं च तथैव च महाहनुम् ।
त्रिनेत्रा च त्रिशूलेन जघान परमेश्वरी ॥१९॥
बिडालस्यासिना कायात्पातयामास वै शिर: ।
दुर्धरं दुर्मुखं चोभौ शरौर्निन्ये यमक्षयम् ॥२०॥
एवं संक्षीयमाणे तु स्वसैन्ये महिषासुर: ।
माहिषेण स्वरूपेण त्रासयामास तान् गणान् ॥२१॥
कांश्‍चित्तुण्डप्रहारेण खुरक्षेपैस्तथापरान् ।
लाङ्‌गूलताडितांश्‍चान्यांछृङ्‌गाभ्या च विदारितान् ॥२२॥
वेगेन कांश्र्चिदपरान्नादेन भ्रमणेन च ।
नि:श्वासपवनेनान्यान् पातयामास भूतले ॥२३॥
निपात्य प्रमथानीकमभ्यधावत सोऽसुर: ।
सिंहं हन्तुं महादेव्या: कोपं चक्रे ततोऽम्बिका॥२४॥
सोऽपि कोपन्महावीर्य: खुरक्षण्णमहीतल: ।
श्रृङ्‌गाभ्यां पर्वतानुच्चांश्चिक्षेप च ननाद च ॥२५॥
वेगभ्रमणविक्षुण्णा मही तस्य व्यशीर्यत ।
लाङ्‌गूलेनाहतश्‍चाब्धि: प्लावयामास सर्वत: ॥२६॥
धुतश्रृङ्‌गविभिन्नाश्‍च खण्डं खण्डं ययुर्घना: ।
श्वासानिलास्ता: शतशो निपेतुर्नभसोऽचला: ॥२७॥
इति क्रोधसमाध्मातमापतन्तं महासुरम् ।
दृष्ट्‌वा सा चण्डिका कोपं तद्वधाय तदाकरोत् ॥२८॥
सा क्षिप्त्वा तस्य वै पाशं तं बबन्ध महासुरम् ।
तत्याज माहिषं रूपं सोऽपि बद्धो महामृधे ॥२९॥
तत: सिंहोऽभवत्सद्यो यावत्तस्याम्बिका शिर: ।
छिनत्ति तावत्पुरुष: खड्‌गपाणिरदृश्यत ॥३०॥
तत एवाशु पुरुषं देवी चिच्छेद सायकै: ।
तं खड्‌गचर्मणा सार्द्धं तत: सोऽभून्महागज: ॥३१॥
करेण च महासिंहं तं चकर्ष जगर्ज च ।
कर्षतस्तु करं देवी खड्‌गेन निरकृन्तत ॥३२॥
ततो महासुरो भूयो माहिषं वपुरास्थित: ।
तथैव क्षोभयामास त्रैलोक्यं सचराचरम् ॥३३॥
तत: क्रुद्धा जगन्माता चण्डिका पानमुत्तमम् ।
पपौ पुन: पुनश्‍चैव जहासारुणलोचना ॥३४॥
ननर्द चासुर: सोऽपि बलवीर्यमदोद्‌धत: ।
विषाणाभ्यां च चिक्षेप चण्डिकां प्रति भूध-रान् ॥३५॥
सा च तान् प्रहितांस्तेन चूर्णयन्ती शरोत्करै: ।
उवाचं तं मदोद्‌धृतमुखरागाकुलाक्षरम् ॥३६॥
देव्युवाच ॥३७॥
गर्ज गर्ज क्षणं मूढ मधु यावत्पिबाम्यहम् ।
मया त्वयि हतेऽत्रैव गर्जिष्यन्त्याशु देवता: ॥३८॥
ऋषिरुवाच ॥३९॥
एवमुक्त्वा समुत्पत्य साऽऽरूढा तं महासुरम् ।
पादेनाक्रम्य कण्ठे च शूलेनैनमताडयत् ॥४०॥
तत: सोऽपि पदाऽऽक्रान्तस्तया निजमुखात्तत: ।
अर्धनिष्क्रान्त एवासीद् देव्या वीर्येण संवृत: ॥४१॥
अर्धनिष्क्रान्त एवासौ युध्यमानो महासुर: ।
तया महासिना देव्या शिरश्छित्त्वा निपातित: ॥४२॥
ततो हाहाकृतं सर्वं दैत्यसैन्यं ननाश तत् ।
प्रहर्षं च परं जग्मु: सकला देवतागणा: ॥४३॥
तुष्टुवुस्तां सुरा देवीं सह दिव्यैर्महर्षिभि: ।
जगुर्गन्धर्वपतयो ननृतुश्‍चाप्सरोगणा: ॥४४॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सार्वर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्म्ये
महिषासुरवधो नाम तृतीयोऽध्याय: ॥३॥
उवाच ३, श्लोका: ४१, एवम् ४४,
एवमादित: २१७ ॥

श्री गौरीची कांती हजारो सूर्यतेजासारखी आहे. तिचे लाल रंगाचे पाटव (वस्त्र), तिच्या गळ्यातील रुंडमाला, स्तनांवरील रक्तचंदनी लेप, हातातील जपमाळ, मुद्रेवर ज्ञान, आणि आशीर्वादाचे मंगल भाव, तेजस्वी नेत्र, मस्तकावर चंद्रकोर अधिष्ठित असा रत्‍नजडित मुकुट असलेली, कमलासना देवी, आमचे कल्याण करो. तिला आमचे सहस्त्र प्रणाम.
ऋषी म्हणाले, "महिषासुराच्या सैन्याचा देवी जगदम्बेने कसा धुव्वा उडविला हे आपण या पूवी ऎकले. आपल्या सैन्याची पीछेहाट होत आहे असे पाहून असुर सेनानी चिक्षुर पुढे सरसावला व देवीशी युद्ध करू लागला. ॥१॥२॥
त्याने (चिक्षुराने) देवीवर अगणित बाणांचा वर्षाव केला. ते पाहून मेघ पर्वतशिखरांवर वर्षाधारा अविरत सोडतात त्या प्रसंगाची आठवण झाली. ॥३॥
देवीने त्या बाणवर्षावाचे तात्काल पारिपत्य करून चिक्षुराचे रथ, घोडे आणि सारथी यांना मारून टाकले व दैत्यवीरांचा अहंकार क्षणात नष्ट केला. ॥४॥
चिक्षुराचे धनुष्य आपल्या बाणांनी मोडून टाकला. त्याच्या रथावरील ध्वज ओढून काढून फाडून टाकला आणि त्याच्या शरीराभोवती बाणांचा एक अभेद्य पिंजरा उभा केला. ॥५॥
रथ मोडला, धनुष्य तुटले, रथाचे घोडे मेले, सारथ्यालाही कंठस्नान घडल्याने क्षणभर चिक्षुर विचलित झाला. पण तात्काळ सावरून त्याने हाती ढाल-तलवार घेऊन देवीवर चाल केली. ॥६॥
चिक्षुराने आपल्या हातातील तलवारीने सिंहाच्या मस्तकावर प्रहार केला आणि अत्यंत चपळाईने देवीच्या बाहूवर आघात करून देवीला जखमा केल्या. देवीने त्याचा वार तिथेच अडवला. ॥७॥
कारण हे राजा ! देवीवर राक्षसाने घातलेल्या मर्माघाती घावाने त्याची तलवार दुभंगली व खाली पडली. राक्षसाच्या रागात आणखी भर पडून त्याने अती तीक्ष्ण व तेजस्वी शूल घेतला. ॥८॥
राक्षसाने हातातील शूळ देवीला मारण्यासाठी देवीवर टाकला, तो देवीच्या स्थानी पोहोचेपर्यंत त्याची धार इतकी तेजस्वीपणे चमकली की. त्यापुढे सूर्याचे तेजही फिके वाटावे. ॥९॥
पण तो चमकता शूळ देवीच्यापर्यंत पोहोचलाच नाही, कारण श्रीदेवीने त्या शूळाचे आपल्या हातातील शूळाने शेकडो तुकडे केल्यावर त्याच शूळाचा मर्मभेदी वार चिक्षुरावर करून त्याच्या चिंध्या चिंध्या करून त्याचा वध केला. ॥१०॥
चिक्षुर सेनानीला देवीने मारलेला पाहून महिषासुराच्या सैन्यातील दुसरा महाप्रतापी सेनानी चामर हत्तीवर बसून देवीशी लढण्यासाठी मोठ्या गर्वाने रणांगणात उतरला. ॥११॥
चामराने देवीवर अतिशय चपळाईने एक प्रभावी शक्‍ती सोडली. ती शक्‍ती आणि तिचा स्वामी चामर या दोघांचीही देवीने एका फुंकरीने वाट लावून राख करून त्याला पृथ्वीवर पाडले. ॥१२॥
शक्‍ती विफल होऊन खाली पडलेली पाहताच चामराला खूप राग आला व त्याने हाती शूल घेऊन तो नेम धरून देवीवर फेकला, पण देवीने आपल्या बाणांनी त्या शूळाचे चूर्ण केले. ॥१३॥
देवीच्या सिंहानेही उडी मारून हत्तीच्या मस्तकावर बसलेल्या असुराशी दोन हात करायला सुरुवात केली. ॥१४॥
चामरशी लढता लढता सिंह आणि असुरवीर दोघेही कोसळून एकमेकांवर जबरदस्त टोलेबाजी करू लागले. असुर शस्त्रांनी तर सिंह आपल्या तीक्ष्ण नखांनी एकमेकांना घायाळ करीत होते. ॥१५॥
आणि एका क्षणात सिंहाने आकाशात उंच उडी घेतली आणि खाली येताना हाताने (पंजाने) इतक्या जोरात चामराला ठोसा मारला की, त्याचे मस्तक धडापासून वेगळे होऊन रक्ताचे कारंजे वाहू लागले व चामर गतप्राण झाला. ॥१६॥
राक्षसवीर उदग्रावर देवीने मोठमोठे वृक्ष, शीलाखंड यांचा सतत मारा करीत त्याला ठार मारले तर कराल राक्षसाला थपडा, बुक्क्या मारून आणि आपल्या विक्राळ दातांनी चावून त्याला जेरीस आणून मरणघाट दाखविला. ॥१७॥
देवी आता लढता लढता भयंकर आवेशात आली. तिने उद्धत दैत्याला गदेच्या प्रहारांनी लोळविले, तसेच बाष्कलाला गोफणीने व अंधकाला बाणवर्षावांनी ठार केले. ॥१८॥
आता लढता-लढता देवीने जणू संहारासाठी तिसरा डोळा उघडला. उग्रास्य, उग्रवीर्य आणि महाहनु या तिघांनाही देवी परमेश्वरीने त्रिशूळाने भोसकून ठार केले. ॥१९॥
तलवारीच्या एकाच घावाने बिडाल राक्षसाचे मस्तक देवीने धडावेगळे केले. दुर्धर आणि दुर्मुख या राक्षसवीरांनाही बाणांच्या वर्षावाने यमसदनी पाठविले आणि महिषासुर-सैन्यात आपल्या शौर्याने अनेक प्रमुख दैत्यांचा संहार मांडला. ॥२०॥
अशा प्रकारे आपल्या सैनिकांची अविरत पीछेहाट आणि संहार होताना पाहून महिषासुराने देवीगणांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने महिषाचे (रेड्याचे) रूप घेऊन उन्मत्तपणे रणभूमीवर सैरावैरा धावावयास सुरुवात केली. ॥२१॥
त्याने कुणाला जबड्याने धक्का देऊन मारले. काहींना पायांच्या खुरांनी तुडविले, काहींना लाथा मारल्या, काहींना शेपटीने फटकारले, तर अनेक देवीगणांना शिंगांनी भोसकले किंवा शिंगावर कोलून आकाशात उडविले व विदीर्ण केले. ॥२२॥
काही देवीगणांना अत्यंत वेगाने धावत येऊन, काहींना सिंहनाद करून, काहींना गरगरा फिरवून किंवा काही गणांना दाबून त्यांचे श्वास कोंडून नष्ट केले.
अशा रीतीने बर्‍याच देवीगणांचा नि:पात केल्यावर महिषासुराने देवीच्या सिंहाकडे दृष्टी वळवून सिंहावर हल्ला चढविला. ते पाहता देवी अंबिकेला खूप राग आला. ॥२४॥
सिंहावर चाल केल्याने देवी चिडलेली पाहून महिषासुरही आवेशात आला. रागाने तो धरती खुरांनी उकरू लागला, शिंगांनी त्याने मोठमोठे पर्वतप्राय दगड उचलून फेकले आणि तोंडाने मोठमोठ्या गर्जनांनी रणभूमी निनादून टाकली. ॥२५॥
त्याच्या या अती वेगवान हालचालींनी धरती फाटू लागली, शेपटीच्या वेगवान फटकार्‍यांनी समुद्रातले पाणी उसळून पृथ्वीवर आले व त्याने पृथ्वी पाण्याने बुडविण्याचा निर्धार केला. ॥२६॥
त्याच्या शिंगांच्या आघातांनी आकाशातील मेघमालांचे तुकडे तुकडे झाले व त्याच्या संतापी उष्ण श्वासांनी शेकडो डोंगरपर्वत आपली जागा सोडून आकाशात भिरभिरू लागले. त्याच्या रागाची या प्रमाणे परिसीमा झालेली पाहून -
देवीने आता त्याला ठार मारण्याचा निश्चय केला. रागावलेल्या महिषासुराला प्रथम एक ठिकाणी अडवून थांबविणे जरूर होते. त्या प्रमाणे देवी आपल्या आयुधांनी सज्ज झाली. ॥२८॥
आणि निमिषार्धात देवीने त्याच्या गळ्याभॊवती फास टाकून त्याला बांधले. महिषासुराने आपले रेड्याचे रूप पालटून टाकले. ॥२९॥
व सिंहाचे रूप धारण केले. एका हातातील तलवारीने देवीने महिषसुराच्या मस्तकाचा छेद करायचा प्रयत्‍न करताच त्याने पुरुषरूप धारण केले. ॥३०॥
देवीने त्या महिषासुराच्या पुरुषरूपावर बाणांचा वर्षाव करून त्याला वेढून घेतले, त्या वेळी असुराने पुरुषरूपाचा त्याग करून एका प्रचंड हत्तीचे रूप धारण केले. ॥
महाकाय हत्ती रूपाने आपल्या सोंडेने देवीच्या सिंहाला मोठी गर्जना करून ओढले तोच देवीने महिषासुराची प्रचंड सोंड हातीच्या तलवारीने कापून काढली. ॥३२॥
त्यावेळी महिषासुराने गजरूपाचा त्याग करून पुन्हा रेड्याचे रूप धारण केले आणि पूर्वीप्रमाणेच रणांगणावर उत्पात माजवून धरतीला आणि त्रिलोकातील जीवांना भयभीत केले. ॥३३॥
देवी महिषासुराच्या चकविण्याने अतिशय क्रुद्ध झाली आणि आवेश येण्यासाठी तिने पुन:पुन्हा सुरापान केले. वारंवार दारू पिण्याने तिचे डोळे लाल होऊन अत्यंत त्वेषाने चमकू लागले. ॥३४॥
उन्मत्त महिषासुराला आपल्या पराक्रमाचा अहंकार होता. त्याने चंडिकेवर वारंवार मोठमोठ्या पर्वतप्राय दगडांचा वर्षाव केला व देवी चंडिकेला त्रस्त केले. ॥३५॥
आपल्या बाणांनी देवीने अंगावर येणार्‍या मोठमोठ्या दगडांचे चूर्ण केले. आणि अत्यंत त्वेषाने त्याला धमकावले. बोलतांना देवीने सुरापान केलेले असल्याने तिची जीभ अडखळत होती.  शब्द स्पष्ट येत नव्हते. ॥३६॥
देवी म्हणाली, "रे मूर्खा, तू खुशाल मोठमोठ्याने डरकाळ्या फोड. मी सुरापान करीपर्यंत तुझा हा उन्माद चालू दे मी तुला मारल्यानंतर मात्र सर्व देवदेवतागण तुझ्या वधाने तुझ्यापेक्षाही जास्त बेहोषीने आनंदाने विजयोत्सव साजरा करतील." ॥३८॥
ऋषी म्हणाले, "असे बोलून देवी चंडिकेने महिषासुरावर एक उडी घेऊन त्याच्या कंठात आपला शूळ खुपसला व त्याला ठार मारले. त्या वेळी देवीने धावत धावत येऊन महिषासुरावर चाल करून त्याचा गळा त्रिशूळाने चिरून टाकला. ॥३९॥४०॥
देवीने पायी आक्रमण केले त्या वेळी महिषासुर अर्धामानव मस्तक आणि छातीपर्यंत व बाकी महिषस्वरूपात होता व त्याच अवस्थेत अत्यंत पराक्रमाने राक्षसाला मारले. ॥४१॥
महिषासुराने आपल्या महिष-रूपातून मूळ स्थितीत येण्याचा आटोकाट प्रयत्‍न केला पण देवीचा वार इतका भयानक होता की राक्षसाने  केली त्या पेक्षा जास्त हालचाल करता आली नाही व धड ना राक्षस ना रेडा अशा अर्ध्या अवस्थेतच तो मेला. ॥४२॥
महिषासुराचा वध देवीने केला त्यानंतर असुर-सैन्यात गडबड गोंधळ उडून हाहाकार माजला व देवलोकात आनंदसागराच्या लाटा उसळल्या. देव हर्षभराने वेडे होऊन गाऊ, नाचू लागले व विजयोन्मादाने त्यांनी तिन्ही लोक व्यापून टाकले. ॥४३॥
देव, देवता, ॠषी, मुनी, देवी चंडिकेने मिळविलेल्या महिषासुरावरील विजयामुळे संतुष्ट झाले. त्यांनी विजयोत्सव साजरा केला. देवांनी चंडिकेची स्तुति-स्तोत्रे गायिली, गंधर्व-लोकात विजयगान सुरू झाले व अप्सरा आनंदविभोर होऊन नाचू लागल्या. या अपुर्व सोहळ्याने देवी आनंदित झाली. ॥४४॥
असा हा मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतर समयीचा देवी माहात्म्य ग्रंथातील महिषासुरवधाचा तिसरा अध्याय.
- श्री चंडिका विजयते -

References : N/A
Last Updated : September 25, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP