श्रीदुर्गासप्तशती - पञ्चमोऽध्याय:

श्रीदुर्गासप्तशती - पञ्चमोऽध्याय:


पञ्चमोऽध्याय:
उत्तरचरित्र
ध्यानम्
ॐ घण्टाशूलहलानि शङ्‌खमुसले चक्रं धनु: सायकं
हस्ताब्जैर्दधतीं घनान्तविलसच्छीतांशुतुल्यप्रभाम् ।
गौरीदेहसमुद्‌भवां त्रिजगतामाधारभूतां महा-
पूर्वामत्र सरस्वतीमनुभजे शुम्भादिदैत्यार्दिनीम् ॥
'ॐ क्लीं' ऋषिरुवाच ॥१॥
पुरा शुम्भनिशुम्भाभ्यामसुराभ्यां शचीपते: ।
त्रैलोक्यं यज्ञभागाश्‍च ह्रता मदबलाश्रयात् ॥२॥
तावेव सूर्यतां तद्वदधिकारं तथैन्दवम् ।
कौबेरमथ याम्यं च चक्राते वरुणस्य च ॥३॥
तावेव पवनर्द्धिं च चक्रतुर्वह्‌निकर्म च ।
ततो देवा विनिर्धूता भ्रष्टराज्या: पराजिता: ॥४॥
ह्रताधिकारास्त्रिदशास्ताभ्यां सर्वे निराकृता :।
महासुराभ्यां तां देवीं संस्मरन्त्यपराजिताम् ॥५॥
तयास्माकं वरो दत्ते यथाऽऽपत्सु स्मृताखिला: ।
भवतां नाशयिष्यामि तत्क्षणात्परमापद: ॥६॥
इति कृत्वा मतिं देवा हिमवन्तं नगेश्‍वरम् ।
जग्मुस्तत्र ततो देवीं विष्णुमायां प्रतुष्टुवु: ॥७॥
देवा ऊचु: ॥८॥
नमो दैव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् ॥९॥
रौद्रायै नमो नित्यायै गौर्ये धात्र्यै नमो नम: ।
ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नम: ॥१०॥
कल्याण्यै प्रणतां वृद्धयै सिद्धयै कुर्मो नमो नम: ।
नैऋत्यै भूभृतां लक्ष्म्यै शर्वाण्ये ते नमो नम: ॥११॥
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नम: ॥१२॥
अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नम: ।
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नम: ॥१३॥
या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै ॥१४॥ नमस्तस्यै ॥१५॥
नमस्तस्यै नमो नम: ॥१६॥
या देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते ।
नमस्तस्यै ॥१७॥ नमस्तस्यै ॥१८॥
नमस्तस्यै नमो नम: ॥१९॥
या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै ॥२०॥ नमस्तस्यै ॥२१॥
नमस्तस्यै नमो नम: ॥२२॥
या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै ॥२३॥ नमस्तस्यै ॥२४॥
नमस्तस्यै नमो नम: ॥२५॥
या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै ॥२६॥ नमस्तस्यै ॥२७॥
नमस्तस्यै नमो नम: ॥२८॥
या देवी सर्वभूतेषुच्छायारूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥२९॥ नमस्तस्यै ॥३०॥
नमस्तस्यै नमो नम: ॥३१॥
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥३२॥ नमस्तस्यै ॥३३॥
नमस्तस्यै नमो नम: ॥३४॥
या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥३५॥ नमस्तस्यै ॥३६॥
नमस्तस्यै नमो नम: ॥३७॥
या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥३८॥ नमस्तस्यै ॥३९॥
नमस्तस्यै नमो नम: ॥४०॥
या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥४१॥ नमस्तस्यै ॥४२॥
नमस्तस्यै नमो नम: ॥४३॥
या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥४४॥ नमस्तस्यै ॥४५॥
नमस्तस्यै नमो नम: ॥४६॥
या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥४७॥ नमस्तस्यै ॥४८॥
नमस्तस्यै नमो नम: ॥४९॥
या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥५०॥ नमस्तस्यै ॥५१॥
नमस्तस्यै नमो नम: ॥५२॥
या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥५३॥ नमस्तस्यै ॥५४॥
नमस्तस्यै नमो नम: ॥५५॥
या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥५६॥ नमस्तस्यै ॥५७॥
नमस्तस्यै नमो नम: ॥५८॥
या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥५९॥ नमस्तस्यै ॥६०॥
नमस्तस्यै नमो नम: ॥६१॥
या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥६२॥ नमस्तस्यै ॥६३॥
नमस्तस्यै नमो नम: ॥६४॥
या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥६५॥ नमस्तस्यै ॥६६॥
नमस्तस्यै नमो नम: ॥६७॥
या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥६८॥ नमस्तस्यै ॥६९॥
नमस्तस्यै नमो नम: ॥७०॥
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥७२॥ नमस्तस्यै ॥७२॥
नमस्तस्यै नमो नम: ॥७३॥
या देवी सर्वभूतेषु भ्रान्तिरूपेण संस्थिता ॥
नमस्तस्यै ॥७४॥ नमस्तस्यै ॥७५॥
नमस्तस्यै नमो नम: ॥७६॥
इन्द्रियाणामधिष्ठात्री भूतानां चाखिलेषु या ।
भूतेषु सततं तस्यै व्याप्तिदैव्ये नमो नम: ॥७७॥
चितिरूपेण या कृत्स्नमेतद् व्याप्य स्थिता जगत् ।
नमस्तस्यै ॥७८॥ नमस्तस्यै ॥७९॥
नमस्तस्यै नमो नम: ॥८०॥
स्तुता सुरै: पूर्वमभीष्टसंश्रया
त्तथा सुरेन्द्रण दिनेषु सेविता ।
करोतु सा न: शुभहेतुरीश्‍वरी
शुभानि भद्राण्यभिहन्तु चापद: ॥८१॥
या साम्प्रतं चोद्धतदैत्यतापितै-
रस्माभिरीशा च सुरैर्नमस्यते ।
या च स्मृता तत्क्षणमेव हन्ति न:
सर्वापदो भक्तिविनम्रमूर्तिभि: ॥८२॥
ऋषिरुवाच ॥८३॥
एवं स्तवादियुक्तानां देवानां तत्र पार्वती ।
स्नातुमभ्याययौ तोये जान्हव्या नृपनन्दन ॥८४॥
साब्रवीत्तान् सुरान् सुभ्रूर्भवद्‌भि: स्तूयतेऽत्र का ।
शरीरकोशतश्‍चास्या: समुद्‌भूताब्रवीच्छिवा ॥८५॥
स्तोत्रं ममैतत् क्रियते शुम्भदैत्यनिराकृतै: ।
देवै: समेतै: समरे निशुम्भेन पराजितै: ॥८६॥
शरीराकोशाद्यत्तस्या: पार्वत्या नि:सृताम्बिका ।
कौशिकीति समस्तेषु ततो लोकेषु गीयते ॥८७॥
तस्यां विनिर्गतायां तु कृष्णाभूत्सापि पार्वती ।
कालिकेति समाख्याता हिमाचलकृताश्रया ॥८८॥
ततोऽम्बिकां परं रूपं बिभ्राणां सुमनोहरम् ।
ददर्श चण्डो मुण्डश्‍च भृत्यौ शुम्भनिशुम्भयो: ॥८९॥
ताभ्यां शुम्भाय चाख्याता अतीव सुमनोहरा ।
काप्यास्ते स्त्री महाराज भासयन्ती हिमाचलम् ॥९०॥
नैव तादृक् क्वचिद्रूपं दृष्टं केनचिदुत्तमम् ।
ज्ञायतां काप्यसौ देवी गृह्यतां चासुरेश्‍वर ॥९१॥
स्त्रीरत्‍नमतिचार्वङ्‌गी द्योतयन्ती दिशास्त्विषा ।
सा तु तिष्ठति दैत्येन्द्र तां भवान् द्रष्टुमर्हति ॥९२॥
यानि रत्‍नानि मणयो गजाश्वादीनि वै प्रभो ।
त्रैलोक्ये तु समस्तानि साम्प्रतं भान्ति ते गृहे ॥९३॥
ऎरावत: समानीतो गजरत्‍नं पुरन्दरात् ।
परिजाततरुश्‍चायं तथैवोच्चै:श्रवा हय: ॥९४॥
विमानं हंससंयुक्‍तमेतक्तिष्ठति तेऽङ्‌गणे ।
रत्‍नभूतमिहानीतं यदासीद्वेधसोऽद्‌भुतम् ॥९५॥
निधिरेष महापद्‌म: समानीतो धनेश्‍वरात् ।
किञ्जिल्किनीं ददौ चाब्धिर्मालामम्लानपङ्‌कजाम् ॥९६॥
छत्रं ते वारुणं गेहे काञ्चनस्रावि तिष्ठति ।
तथायं स्यन्दनवरो य: पुराऽऽसीत्प्रजापते: ॥९७॥
मृत्योरुत्क्रान्तिदा नाम शक्तिरीश त्वया ह्रता ।
पाश: सलिलराजस्य भ्रातुस्तव परिग्रहे ॥९८॥
निशुम्भस्याब्धिजाताश्‍च समस्ता रत्‍नजातय: ।
वह्‌‍निरपि ददौ तुभ्यमग्निशौचे च वाससी ॥९९॥
एवं दैत्येन्द्र रत्‍नानि समस्तान्याह्रतानि ते ।
स्त्रीरत्‍नमेषा कल्याणी त्वया कस्मान्न गृह्यते ॥१००॥
ऋषिरुवाच ॥१०१॥
निशम्येति वच: शुम्भ: स तदा चण्डमुण्डयो: ।
प्रेषयामास सुग्रीवं दूतं देव्या महासुरम् ॥१०२॥
इति चेति च वक्‍तव्या सा गत्व वचनान्मम ।
यथा चाभ्येति सम्प्रीत्या तथा कार्यं त्वया लघु ॥१०३॥
स तत्र गत्वा यत्रास्ते शैलोद्देशेऽतिशोभने ।
सा देवी तां तत: प्राह श्‍लक्ष्णं मधुरया गिरा ॥१०४॥
दूत उवाच ॥१०५॥
देवि दैत्येश्‍वर: शुम्भस्त्रैलोक्ये परमेश्‍वर: ।
दूतोऽह प्रेषितस्तेन त्वत्सकाशमिहागत: ॥१०६॥
अव्याहताज्ञ: सर्वासु य: सदा देवयोनिषु ।
निर्जिताखिलदैत्यारि: स यदाह श्रृणुष्व तत् ॥१०७॥
मम त्रैलोक्यमखिलं मम देव वशानुगा: ।
यज्ञभागानहं सर्वानुपाश्‍नामि पृथक् पृथक् ॥१०८॥
त्रैलोक्ये वररत्‍नानि मम वश्‍यान्यशेषत: ।
तथैव गजरत्‍नं च ह्रत्वा देवेन्द्रवाहनम् ॥१०९॥
क्षीरोदमथनोद्‌भूतमश्वरत्‍नं ममामरै: ।
उच्चै:श्रवससंज्ञं तत्प्रणिपत्य समर्पितम् ॥११०॥
यानि चान्यानि देवेषु गन्धर्वेषूरगेषु च ।
रत्‍नभूतानि भूतानि तानि मय्येव शोभने ॥१११॥
स्त्रीरत्‍नभूतां त्वां देवि लोके मन्यामहे वयम् ।
सा त्वमस्मानुपागच्छ यतो रत्‍नभुजो वयम् ॥११२॥
मां वा ममानुजं वापि निशुम्भमुरुविक्रमम् ।
भज त्वं च चलापाङ्‌गि रत्‍नभूतासि वै यत: ॥११३॥
परमैश्‍वर्यमतुलं प्राप्स्यसे मत्परिग्रहात् ।
एतद् बुद्ध्या समालोच्य मत्परिग्रहतां व्रज ॥११४॥
ऋषिरुवाच ॥११५॥
इत्युक्‍ता सा तदा देवी गम्भीरान्त:स्मिता जगौ ।
दुर्गा भगवती भद्रा ययेदं धार्यते जगत् ॥११६॥
देव्युवाच ॥११७॥
सत्यमुक्‍तं त्वया नात्र मिथ्या किंचित्त्वयोदितम् ।
त्रैलोक्याधिपति: शुम्भो निशुम्भश्‍चापि तादृश: ॥११८॥
किं त्वत्र यत्प्रतिज्ञातं मिथ्या तत्क्रियते कथम् ।
श्रूयतामल्पबुद्धित्वात्प्रतिज्ञा या कृता पुरा ॥११९॥
यो मां जयति संग्रामे यो मे दर्पं व्यपोहति ।
यो मे प्रतिबलो लोके स मे भर्ता भविष्यति ॥१२०॥
तदागच्छतु शुम्भोऽत्र निशुम्भो वा महासुर: ।
मां जित्वा किं चिरेणात्र पाणिं गृहणातु मे लघु ॥१२१॥
दूत उवाच ॥१२२॥
अवलिप्तासि मैवं त्वं देवि ब्रूहि ममाग्रत: ।
त्रैलोक्ये क: पुमांस्तिष्ठेदग्रे शुम्भनिशुम्भयो: ॥१२३॥
अन्येषामपि दैत्याना सर्वे देवा न वै युधि ।
तिष्ठन्ति सम्मुखे देवि किं पुन: स्त्री त्वमेकिका ॥१२४॥
इन्द्राद्या: सकला देवास्तस्थुर्येषां न संयुगे ।
शुम्भादीनां कथं तेषां स्त्री प्रयास्यसि सम्मुखम् ॥१२५॥
सा त्वं गच्छ मयैवोक्‍ता पार्श्‍वं शुम्भनिशुम्भयो: ।
केशाकर्षणनिर्धूतगौरवा मा गमिष्यसि ॥१२६॥
देव्युवाच ॥१२७॥
एवमेतद् बली शुम्भो निशुम्भश्‍चातिवीर्यवान् ।
किं करोमि प्रतिज्ञा मे यदनालोचिता पुरा ॥१२८॥
स त्वं गच्छ मयोक्‍तं ते यदेतत्सर्वमादृत: ।
तदाचक्ष्वासुरेन्द्राय स च युक्‍तं करोतु तत् ॥ॐ॥१२९॥
इति श्रीमार्कण्डेयपुराणे सावर्णिके मन्वन्तरे देवीमाहात्मये
देव्या दूतसंवादो नाम पच्चमोऽध्याय:॥५॥
उवाच ९, त्रिपान्मन्त्रा:६६, श्‍लोका: ५४,
एवम् १२९. एव,मादित: ३८८ ॥
- श्री ललितागौरी विजयते -


उत्तरचरित्र
ॐ अस्य श्री उत्तरचरित्र्यस्य रुद्रऋषि: महासरस्वतीदेवता अनुष्टभ छंद: भीमा शक्ति: भ्रामरीबीजम्सूर्यच्तत्त्वम्सामवेद: स्वरूपम्: महासरस्वतीप्रीत्यर्थे उत्तरचरित्रपाठे विनियोग: ।
ध्यान - जिच्या हातात घंटा, शूळ, हल (नांगर), शंख मुसळ, चक्र आणि धनुष्यबाण आहेत, शरद ऋतुच्या चांदण्याप्रमाणे शुभ्र आणि मनोहर जिचे लावण्य आहे, जी गौरीच्या शरीरातून प्रकट होऊन त्रिलोकातील जीवांच्या रक्षणासाठी आधारभूत ठरली आणि महाप्रतापी राक्षसवीर शुंभाचा जिने युद्धात वध केला, त्या महासरस्वती देवीचे मी भजन करतो.
ऋषी म्हणाले, "पूर्वी शुंभ आणि निशुंभ नावाच्या दोन राक्षसांनी आपल्या शक्तिशाली बाहूंच्या घमेंडीने देवेंद्राचे राज्य जिंकून ते त्रिलोकाचे स्वामी झाले आणि त्यांनी देवांचे अधिकार, यज्ञभाग हिसकावून घेतले. ॥१॥२॥
त्या दोन्ही दैत्यांनी सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांना आपल्या बंदीशाळेत टाकून त्यांची कामे आपसांत वाटून घेतली. त्यामुळे पराजित देव हतबल झाले॥३॥
इतकेच नव्हे तर, वायू आणि अग्नी यांची सृष्टि-चक्रातली कामेही दैत्यांनी स्वत:कडे घेतली आणि सर्व देवांना अपमानित करून देवांचे राज्य लाटले. ॥४॥
देवांचे अशा प्रकारे सर्व अधिकार काढून घेऊन, त्यांना तिरस्कृत करून स्वर्गाचे बाहेर हाकलून लावले. देव अशा प्रकारे हतबल व राज्यभ्रष्ट झाल्याने देवांनी अपराजिता देवीचे स्मरण केले. ॥५॥
पूर्वी देवीने या देवदेवतांना असा वर दिला होता की, ज्या ज्या वेळी तुम्ही संकटात असाल आणि संकटमुक्‍तीसाठी स्मरण करून मला हाक माराल, त्या क्षणीच मी (देवी) धावत येऊन तुमचे रक्षण करीन. ॥६॥
या वरदायिनीचे, अंबेचे स्मरण झाल्याबरोबर सर्व देवगण नगराज हिमालय पर्वतावर गेले. तेथे देवी गुप्त रूपाने रहात असे. तेथे जाऊन भगवती विष्णुमायेची स्तुति-स्तोत्रे गायिली. ॥७॥
देव म्हणाले, "हे महादेवी, हे मंगलदायिनी शिवा गौरी आम्ही तुला निरंतर वंदन करतो, हे जीवदायिनी भद्रकाली आमच्यावर प्रसन्न हो. ॥८॥९॥
तुझ्या रौद्र रूपाला, स्वाभाविक रूपाला, गौरी आणि पालनकर्त्या मातृरूपाला आमचे नमस्कार असोत. तू शीतल चांदण्याप्रमाणे, प्रसन्न चंद्राप्रमाणे आल्हाददायिनी आहेस, सौख्यदायिनी आहेस. आमचे नमस्कार स्वीकार कर. ॥१०॥
तू कल्याणी आहेस, तू वत्सला, तू ऋद्धी, सिद्धी, कूर्मी ही सारी तुझी रूपे आहेत. राक्षसांची लक्ष्मी नैऋती, नृपलक्ष्मी शर्वाणी, अखिल भूमंडलातील लक्ष्मी ही सारी तुझी रूपे आहेत. या सर्व रूपांना आम्ही पुन:पुन्हा शरणभावनेने वंदन करतो. ॥११॥
तू स्वत: दुर्गा (रणदुर्गा) अति बिकट दुर्गम संकटातून तारणारी सर्वांच्या कामात उपयुक्त ठरणारी सर्वकारिणी तू सर्वांना ख्यात (प्रख्यात) आहेस. तू कृष्णा आहेस. धूम्रा आहेस या तुझ्या सर्व रूपांना आमचे वंदन असो. ॥१२॥
तू मृदुलांत मृदुल आहेस, रौद्र स्वरूपात अघोरा आहेस. आम्ही नतमस्तक होऊन तुला नमन करतो. या जगाला प्रतिष्ठा मिळवून देणारी कृतिदेवी हे तुझेच रूप आहे. आम्ही वारंवार तुला नमस्कार करतो. ॥१३॥
या भूतलावर विष्णुमाया या नावाने ओळखल्या जाणार्‍या देवी तुझ्या रूपाला आमचे त्रिवार वंदन. ॥१४॥१५॥१६॥
या जगात चैतन्याचे झरे वहात राहून सर्व प्राणिमात्रांना ऊर्जा मिळावी म्हणून तुझे चैतन्यरूप आहे. त्याला आमचे त्रिवार वंदन. ॥१७।१८।१९॥
या धरतीवर तू सकलांना विचारशक्ती प्रदान करतेस. त्यामुळे तुझ्या बुद्धिरूपाला बुद्धिदेवी म्हटले जाते. तुझ्या या बुद्धिरूपाला आमचे त्रिवार वंदन. ॥२०।२१।२२॥
आपापले कर्तव्य करून थकल्यावर मातृप्रेमाने तू आम्हाला विश्रांतीसाठी निद्रा प्रदान करतेस व पुढील कामाला उत्साह देतेस. त्या निद्रादेवीला आमचे त्रिवार वंदन ॥२३।२४।२५॥
सर्व जीवजंतूंच्या पोषणासाठी अन्न आवश्यक आहे आणि अन्न ग्रहणासाठी भूक. कष्टानंतर भूक प्रदान करणार्‍या क्षुधादेवीला आमचे त्रिवार वंदन. ॥२६।२७।२८॥
मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशातील कष्टानंतर छायेची जरूरी विश्रांतीसाठी भासते आणि छायारूपाने तू मायेची सावली आमच्यावर धरतेस, त्या तुझ्या छायारूपाला हे देवी त्रिवार वंदन.॥२९।३०।३१॥
संकटाशी संघर्ष करण्यासाठी दुर्बलता उपयोगी नसल्याने तू आमच्या ठायी शक्ती निर्माण केलीस, त्या तुझ्या शक्तिरूपाला हे देवी, आमचे त्रिवार वंदन. ॥३२।३३।३४॥
शरीराला पाणी आवश्यक आहे, किंबहुना हे शरीरच पाणीमयआहे. शरीरातील पाणी कमी झाल्यावर तहान लागते. हे देवी, तू तृष्णादायिनी आहेस, आमचे तुला त्रिवार वंदन. ॥३५।३६।३७॥
क्रोध आणि अपराधांना काही प्रसंगी क्षमावृत्ती ठेवावी लागते. ती क्षमाशीलता आमचे ठायी उत्पन्न करणार्‍या क्षमादेवी, तुला आमचे त्रिवार वंदन ॥३८।३९।४०॥
प्राणिमात्रांत निरनिराळ्या प्रकारच्या जाती निर्माण केल्यास (स्त्री, पुरुष, वनचर, जलचर इ.) आणि त्यांच्या जातिनुसार स्वाभाविक कामे देऊन हे सृष्टिचक्र चालविलेस, हे जातिदेवी आमचे तुला त्रिवार वंदन. ॥४१।४२।४३॥
ज्याप्रमाणे कर्तव्यात अभिमान आवश्यक, त्याचप्रमाणे इतरांच्या गुणांचाही गौरव असतो. त्यासाठी तू आम्हाला विनयी बनविलेस. नम्रता शिकविणार्‍या लज्जादेवी तुला आमचे त्रिवार वंदन. ॥४४।४५।४६॥
जन-सामान्यांचे आयुष्य संघर्षानंतर स्थिर होणे जरूर आहे. शांत रस हा सात्त्विकतेचा भाव आहे. शांतपणे तुझी आठवण केल्यास तुझ्या प्रेमळ मातृरूपाचे दर्शन घडते. हे शांति-देवी तुला आमचे त्रिवार वंदन. ॥४७।४८।४९।
तुझ्या आठवणीसाठी शांतता, तसेच तुझ्यावरील दृढ विश्‍वास म्हणजे श्रद्धा असेल तरच तू संकट-विमोचन करशील. म्हणून हे देवी! आमचे ठीकाणी तुझा निवास राहो. या श्रद्धादेवीला आमचे त्रिवार वंदन. ॥५०।५१।५२॥
शक्‍ती, शांतता विनय, श्रद्धा याप्रमाणे तेजाचीही आम्हाला आवश्यकता आहे. तेज नसेल, स्वाभिमान नसेल तर जय मिळणे अशक्य, म्हणून कान्ति देणार्‍या हे कांतिदेवी तुला आमचे त्रिवार वंदन. ॥५३।५४।५५॥
' सर्वे गुणा: कांचनमाश्रयन्ते' या उक्तिप्रमाणे निर्धनाला जीवनात कोणतीही वस्तू धनाशिवाय लाभत नाही. धनसंचयाशिवाय संसार, भविष्यातील जीवन व्यर्थ, म्हणून हे लक्ष्मीदेवी, तू आमच्या घरी सतत वास कर. आम्ही तुला त्रिवार वंदन करीत आहोत. ॥५६।५७।५८॥
मानवी जीवनात काय किंवा इतरात काय महत्त्वाकांक्षा असतेच. ती वृत्ती बाळगली नाही तर आयुष्य दिशाहीन होईल. म्हणून हे वृत्तिदेवी तू आमचे मनात ऊर्मीरूपाने रहा. आमचे तुला त्रिवार वंदन. ॥५९।६०।६१॥
सृष्टीत मानवाला ज्याप्रमाणे बुद्धी दिली तशी आठवणही दिलेली आहे. वनचरांना ही स्मृती संरक्षणापुरती असेल. स्मृतींनी भविष्याची पुढील वाटचाल सापडते. म्हणून आमचे ठायी स्मृती निर्माण करणार्‍या स्मृतिदेवीला आमचे त्रिवार वंदन. ॥६२।६३।६४॥
सबलांशी क्रोध, संघर्ष, तर निर्बल, अबलांशी दया, क्षंमा या प्रवृत्ती शोभून दिसतात. सर्व जीवजंतूंविषयी प्रेम आणि वत्सल भाव हे दयादेवी, तू आमच्या ठायी उत्पन्न केलास, त्या तुझ्या दयास्वरूपाला आमचे त्रिवार वंदन. ॥६५।६६।६७॥
क्षुधा, तृष्णा यांचे शमन झाल्यानंतर जीव प्राणी संतुष्ट होतो. संतोष हा राजस भाव आहे. समाधानी वृत्ती ही स्वत:प्रमाणेच इतरांनाही उपकारक आहे. आमच्या ठायी ही वृत्ती निर्माण करणार्‍या तुष्टिदेवी (संतोषी) तुला आमचे त्रिवार वंदन. ॥६८।६९।७०।
ज्या जननीमुळे या विश्वाचे दर्शन बालकाला घडते, जिचे अमृतमय दूध पोषण करते, इतकेच नव्हे तर, मातृवात्सल्याला प्रत्यक्ष भगवान्विष्णूहि वंचित झाले होते ते मातृस्वरूप तुझ्यामुळे त्यांना मिळाले. तुझ्या मातृरूपाला त्रिवार वंदन. ॥७१।७२।७३॥
या सृष्टीत एके ठिकाणी थांबून प्रगती होत नाही. अन्नासाठी दाही दिशांचा प्रवास भगवंतांनी आपल्यामागे लावून दिला. त्यामुळे ज्ञान, अनुभव, विद्या, आपत्तीशी टक्कर या गोष्टी समजतात. अनुभूती देणार्‍या हे भ्रांतिदेवी, आमचे तुला त्रिवार वंदन. ॥७४।७५।७६।
आमच्या गात्रांत चैतन्य, जीवसृष्टीतील, चराचरातील तुझी व्याप्ती आम्हाला सतत जाणवते. तू त्रिखंड व्यापून उरलेली असल्याने अणूरेणूत तुझे अस्तित्व आहे. सूक्ष्मांत सूक्ष्म, विशालांत विशाल व्यापून राहाणार्‍या व्याप्तिदेवी तुला आमचा नमस्कार. वंदन. ॥७७॥
आमच्या चित्तात प्रसन्नतेने, चैतन्याने तू व्यापून राहिलेली असल्याने जीवनाचा संघर्ष, तुलनात्मक न्याय, गुणाव-गुणांची चिकित्सा आम्ही करू शकतो. आमचे चित्त निर्मळ व न्यायी ठेवण्यास तुझी मदत होते. हे चितिदेवी तुला आमचे त्रिवार वंदन. ॥७८।७९।८०।
पूर्वी देवांनी आपले हेतू साध्य व्हावेत व भय नष्ट व्हावे म्हणून ज्या ईश्‍वरीदेवीची सेवा केली, ती महामंगलदायिनी देवी आमच्या आपत्ती नष्ट करून आमचे कल्याण करून ती आम्हास सुख-समृद्धी प्रदान करो. ॥८१॥
उन्मत्त दैत्यांच्या पीडांनी त्रासलेले देव आपल्या संकटमुक्‍तीसाठी ज्या भगवतीला शरण जाऊन नमस्कार करतात, ज्या परमेश्‍वरीचे फक्त मनात स्मरण केले तरी क्षणात आमच्या आपत्ती दूर होतील असा विश्वास आहे त्या कल्याणी देवीला आमचे कोटी कोटी नमस्कार असोत." ॥८२॥
ऋषी म्हणाले, "याप्रमाणे देवांनी प्रार्थना केल्याने संतुष्ट झालेली देवी पार्वती, हे राजा, महापवित्र गंगा स्नान करण्यासाठी तेथे अवतीर्ण झाली. ॥८३॥८४॥
अत्यंत कमनीय व लावण्याला शोभा देणार्‍या भुवया असलेल्या भगवतीने देवांना विचारले, "तुम्ही कोणाची स्तुती करता आहात आणि कशासाठी?" त्या वेळी देवगणांच्या शरीरांतून उत्पन्न झालेली शिवादेवी म्हणाली- ॥८५॥
या देवांना व त्यांच्या राजा देवेंद्राला निशुंभाने पराजित करून स्वर्गातून तिरस्कृत करून हाकून दिलेले आहे व संग्रामात पराजित झालेले हे देवगण माझी स्तुती करून त्यांच्यावरील संकट निवारण्यासाठी प्रार्थना करताहेत. ॥८६॥
पार्वतीच्या शरीरकोशातून अंबिका निर्माण झाली व तिला भक्तजनांनी कौशिकी म्हटल्याने सर्व जगात ती कौशिकी या नावाने प्रसिद्ध झाली. ॥८७॥
कौशिकी प्रकट झाल्यावर ती पार्वतीदेवी शरीराने काळ्या रंगाची झाली व हिमालयावर रहात असल्याने सर्वसामान्य भक्त तिला काली (कालिका) या नावाने ओळखू लागले. ॥८८॥
त्या भागात ज्या वेळी शुंभ-निशुंभांचे सैनिक आले त्या वेळी देवी अंबिकेने अत्यंत मनोरम व सुंदर स्वरूप धारण केले. ते पाहताच शुंभ-निशूंभांचे सेवक अत्यंतच आश्चर्यचकित झाले. ॥८९॥
शुंभ राक्षसाचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, महाराज हिमालय प्रांतात एक विलक्षण सुंदर, अत्यंत मनोहर चारुगात्री स्त्री आपल्या दिव्य लावण्यकान्तीने हिमालय-परिसर तेज:पुंज करीत आहे. तेथे वावर करीत आहे. ॥९०॥
असे सुस्वरूप दर्शन, अशी लावण्य कान्ति, उत्तम सौंदर्य आजपर्यंत कुणी पाहिले नसेल, कुणाला तिचे दर्शन घडले नसेल, म्हणून महाराजाधिराज आपण ही स्त्री कोण आहे याचा तपास करून तिला आपल्या संगती आणावे. ॥९१॥
त्रैलोक्यातील स्त्रियांमधे सौंदर्यशालिनी म्हणून ती एक उत्कृष्ट रत्‍न आहे. त्याचप्रमाणे आपल्या लावण्याने तिने दाही दिशांना एक अपूर्व शोभा आणलेली आहे. ती हिमालय परिसरातच असल्याने हे दैत्यराज तुम्ही स्वत: जाऊन पहावी. ॥९२॥
या त्रिखंडात जितकी अमोलिक रत्‍ने, नानाप्रकारचे अपूर्व मणी, सुंदर, हत्ती, घोडे, जे जे उत्तम असेल ते ते सर्व हे असुर राजा! तुम्ही जिंकून आपल्या संग्रही ठेवलेले आहे. ॥९३॥
समुद्रमंथनातून मिळालेला सर्वश्रेष्ठ गजराज ऎरावत हे गजरत्‍न तुम्ही इंद्राकडून जिंकले आहे. दिव्य पारिजातक वृक्ष, त्याचप्रमाणे इंद्राचा आवडता लाडका घोडाही, त्याला पराजित करून आपल्या घरी आणला आहे. ॥९४॥
हंसांनि चालविलेले पुष्पक विमान स्वारीसाठी सज्ज असलेले तुमच्या अंगणात आहे. हे अदभुत विमान पूर्वी ब्रह्मदेवांच्या जवळ होते. ते तुम्ही त्यांच्याकडूनआणलेले आहे. त्या रत्‍नांनी जडविलेल्या अद्वितीय विमानाचे आज तुम्ही धनी आहात. ॥९५॥
अगणित महापद्‌म सुवर्णराशींचा कोष तुम्ही कुबेराला पराजित करून आपल्याकडे ठेवला आहे. जिची कमलदले व कमलफुले कधीही सुकत नाहीत आणि जिचे पराग केशरांनी सुगंधित व ताजे आहेत, अशी समुद्राने दिलेली किंजिल्किनी माला तुमच्यापाशी आहे. ॥९६॥
सोन्याचा वर्षाव करणारे छत्र वरुणाने पराभूत होऊन तुम्हास दिले. त्याचप्रमाणे प्रजापतीचा श्रेष्ठ रथ आता तुमच्याच संग्रही आहे. ॥९७॥
मृत्यू आल्यानंतर पुन्हा जिवंत करणारी संजीवनीशक्ती तुम्ही अश्‍विनीकुमारांकडून घेतली. वरुणाचा पाश आणी सप्त सागरातील दुर्मिळ रत्‍नासाठा तुमच्या भावाच्या घरात आहे. ॥९८॥
असा अपूर्व रत्‍नसाठा निशुंभ महाराजांकडे तर आहेच, शिवाय अग्नीने स्वत: शुद्ध केलेली दोन अजीर्ण व कधीही न नष्टे होणारी वस्त्रे वन्हिराजाने (अग्नीने) तुम्हास दिली आहेत. ॥९९॥
अशी इंद्रादी देवदेवतांची सर्व रत्‍ने, अस्त्रे, शस्त्रे, वसने, अपूर्व वाहने तुमच्याकडे असताना व ती देवांकडून जिंकून घेतली असतांना ही रहस्यमय लावण्यवती देवी कल्याणी मात्र तुमच्या घरी असू नये हे कसे? तिला जिंकून तुम्ही आपल्या घरी का आणली नाहीत?" ॥१००॥
ऋषी म्हणाले, "आपले सेनापती चण्ड आणि मुण्ड या सेनानींचे वरील बोलणे ऎकून असुरांचा राजा निशूंभाने आपला सुग्रीव नावाचा दूत देवीकडे पाठविला. ॥१०१।१०२॥
आणि त्याला आपला संदेश देवीकडे द्यायला सांगून काहीतरी युक्तीने मधुर वचनांनी देवीला भुरळ घालून देवी असेल तिथून तिला आपल्या गृही त्वरित आणण्याची आज्ञा केली. ॥१०३॥
दैत्यराजाच्या आज्ञेप्रमाणे सुग्रीव हिमालय-परिसरातील अत्यंत रमणीय व मनोहारी प्रदेशात जेथे देवी रहात होती त्या ठिकाणी जाऊन अत्यंत नम्रतेने व मधुर वाणीने देवीला म्हणाला. ॥१०४॥
दूत म्हणाला, "हे देवी ! मी त्रिखंडात महापराक्रमी आणि प्रतिपरमेश्‍वर असलेल्या महाराज शुंभराजाचा दूत असून त्यांनी मला तुझ्यासाठी एक संदेश देऊन पाठविले आहे. ॥१०६॥
माझ्या धन्याची आज्ञा इंद्रादी देवगण पाळतात. आम्ही असुरांनी आमचे वैरी देव व त्यांचे संपुर्ण राज्यवैभव जिंकून आमच्या अंकित केले आहे. आमच्या महाराजांनी माझ्याबरोबर पाठविलेला निरोप तू आता शांत मनाने ऎक. ॥१०७॥
हे सारे विश्‍व, स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे तिन्ही लोक आपल्या पराक्रमाने जिंकून आम्ही देव-देवतांना दास केलेले आहे. त्यांचे राज्य, त्यांचे अधिकार त्यांचे यज्ञभोग ते त्यांना वाटेल त्यावेळी ते भोगतात असे ते म्हणतात. ॥१०८॥
त्यांनी सांगितले, "या त्रैलोक्यात अत्यंत श्रेष्ठ सुदर्शन व अमूल्य रत्‍नसाठा माझेजवळ आहे. त्याचप्रमाणे देवेंद्राचा पराभव करून त्याचा गजश्रेष्ठ ऎरावत हत्तीही मी जिंकून माझ्या गजशाळेत बांधला आहे." ॥१०९॥
क्षीरसागराच्या मंथनातून जी दिव्य रत्‍ने देवांना लाभली ती सर्व मी जिंकलेली आहेत. अश्‍वरत्‍नांतील अपूर्व असा उच्चै:श्रवा नावाचा घोडा इंद्राने मला शरण येऊन माझ्या तबेल्यात आणून बांधला व भेट म्हणून दिला. ॥११०॥
या शिवाय जी जी रत्‍नमाणके, हिरे, मोती, जड जवाहीर देवलोकांकडे होते, गंधर्वलोकात होते ती सर्व रत्‍ने, हे देवी, हे सौंदर्यशालिनी चारुगात्री ! सारीच्या सारी माझ्या संग्रहात आहेत. ती मी जिंकून आणलेली आहेत. ॥१११॥
पण तुझ्याकडे अपूर्व अद्‌भुत स्त्री-सौंदर्याचे अनुपम भांडार असलेली स्त्री मात्र माझ्याकडे नाही. तेव्हा तू आमच्याकडे ये. आम्ही देवलोक, मृत्युलोक आणि असुरलोकांचे स्वामी असल्याने रत्‍नोपभोगाच्या हक्काचे उत्तराधिकारी आहोत. ॥११२॥
तर हे देवी, हा असुरराज शूंभ तुला विनवणी करतो आहे की, हे चंचलनयने, चारुगात्री, त्रिखंडातील या सर्व रत्‍नांची स्वामिनी होण्यासाठी माझी (शुंभाची) अथवा निशुंभाची स्वामिनी होऊन सेवारत हो. ॥११३॥
आम्हा दोघा बांधवांच्या कृपेने तुला परम ऎश्वर्य, त्रैलोक्याची सत्ता, महाप्रतापी देव, त्यांचा राजा इंद्र यांच्यावर शासन करता येईल. ते तुझे दास होतील. तर या सर्व गोष्टींचा विचार करून तू आमच्या आश्रयाला ये. आमच्या पक्षात सामील हो. ॥११४॥
ऋषी म्हणाले, सुग्रीव दूताचे हे बोलणे ऎकून देवी गंभीर झाली. कल्याणी भगवती जी सदैव आपल्या भक्तांच्या दु:ख परिहाराच्या विचारात मग्न असते तिला हा निरोप विपरीत वाटला. गंभीर मुद्रेने आपल्या मुखावर किंचित्स्मित पसरवून ती म्हणाली, ॥११५।११६॥
देवी म्हणाली, हे दूता तू म्हणतोस ते खरे आहे. त्यात काडीइतकेही खोटे मानण्याचे कारण नाही. तुझा स्वामी शूंभुराज हा त्रैलोक्याचा अधिपती आहे हेहि खरे. त्याचा बंधू निशूंभ त्याच्यासारखाच महाप्रतापी आहे हेही खरे आहे. ॥११७।११८॥
पण मी माझ्या अल्पबुद्धीने एक प्रतिज्ञा केलेली आहे. ती पार पाडल्याशिवाय तुझ्या राजाच्या निरोपाप्रमाणे कशी येऊ? माझी प्रतिज्ञा ऎक आणि तुझ्या धन्याला त्वरित जाऊन सांग की ॥११९॥
जो कोणी संग्रामात माझा पराभव करून माझा गर्व हरण करील, जो माझ्यापेक्षा श्रेष्ठ बलवान असेल त्याने या त्रिखंडात कुठेही, मला जिंकून, माझा हात धरून घेऊन जावे, त्यालाच मी माझा भर्ता मानीन. ॥१२०॥
मग तो शुंभ असो वा निशुंभ राक्षसराज असो वा सामान्य वीर. त्याने मला युद्धात जिंकावे व माझा हात हाती घेऊन न्यावे. याला उशीर करायचे काय कारण? ॥१२१॥
दूत म्हणाला, हे देवी, गर्व आणि अहंकाराने मदोन्मत्त होऊन तू माझ्याशी बोलत आहेस. या त्रैलोक्यात शुंभ आणि निशुंभ या असुर राजांना युद्धाचे आव्हान आजवर कुणी दिले नाही. शौर्यात त्यांच्या बरोबरीने कोणी टिकू शकला नाही. ॥१२२।१२३॥
आमच्या धन्यांची तर गोष्टच सोड. आमचे दैत्य वीर एवढे शक्तिशाली आहेत की देवही त्यांच्यापुढे नि:ष्प्रभ ठरले व त्यांनी देवांना दास केले. तू एक स्त्री अबला, तू आमच्या धन्यांना, त्यांच्या पराक्रमाला आव्हान द्याचे हे नवलच. ॥१२४॥
इंद्रादि सर्व देवदेवता ज्यांच्या पायी शरण येऊन लोटांगण घालतात व ज्यांची आज्ञा तत्परतेने पाळतात त्या आमच्या शुंभराजांना एका अबलेने, एका य:कश्‍चितस्त्रीने आव्हान द्यावे ह्याला मूर्खपणाशिवाय दुसरे काय म्हणायचे? ।१२५॥
म्हणून हे देवी ! मी सांगितलेल्या शुंभ-निशुंभाच्या आज्ञेप्रमाणे माझ्याबरोबर (मागोमाग) चल. तू माझ्यामागे मुकाट्याने आली नाहीस तर तुझे केस धरून तुला ओढीत नेण्याचे दुर्भाग्य व असा गौरव तुझ्या वाट्याला येईल याचा विचार कर." ॥१२६॥
देवी म्हणाली, "हे दूता शूंभराज, महाप्रतापी, निशुंभ महाबलाढ्य, अजिंक्य आहेत हे तू सांगितलेले बरोबर आहे, त्यात चूक नाही पण माझी मी केलेली प्रतिज्ञाही तितकीच प्रखर आहे आणि ती प्रतिज्ञा पुरी झालेली मला पहायची आहे म्हणून ती पूर्ण करण्याचाच माझा निश्चय आहे. ॥१२७॥१२८॥
तेव्हा तू परत जाऊन मी जे जे सांगितले आणि येथे जे तू पाहिलेस ते सर्व तुझ्या धन्याला सांग व माझा प्रतिनिरोप दे. त्यानंतर असुरांचा इंद्र त्याला योग्य वाटेल असा निर्णय घ्यायला तो मोकळा असेल. त्याने त्याबाबत मुळीच विलंब करू नये. ॥१२९॥
असा हा श्री मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतराच्या काळी घडलेला देवीमाहात्म्यातील देवीदूत संवाद नावाचा पाचव्या अध्यायांचा कथाभागआहे. ॥१३०॥

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP