माघ शु. एकादशी

Magha shudha Ekadashi


* जया एकादशी

माघ शु. एकादशीलच 'जया एकादशी' म्हणतात. या एकादशीच्या पुण्यप्रभावाने पिशाचत्व नाहीसे होते,

 

* भौमी एकादशी

माघ शु. एकादशीला सामान्यपणे चंद्र मृगशीर्ष नक्षत्रात असतो. या दिवशी उपवास करावयाचा असतो आणि द्वादशीच्या दिवशी षट्‌तिली व्हावयाचे असते. षट्‌तिलेचे प्रकार असे - पाण्यात तीळ घालून स्नान करणे, तीळ वाटून अंगाला लावणे, तिळाच्या आहुती देणे, तिळमिश्रित पाणी पिणे, तिलदान करणे आणि तिळ खाणे.

फल - विष्णुलोकाची प्राप्ती.

 

* पंढरीवारी व्रत :

पंढरीची वारी हे एक कलियुगातील मोक्षदायक व्रत आहे. हे व्रत आषाढ शु. एकादशीपासून करतात. पण मुख्य वारीव्रत म्हणून आषाढ , कार्तिक, माघ व चैत्र या महिन्यांतील शु. एकादशीस करतात., आणि पंढरपूर हे वारकर्‍यांच्या भागवतधर्माचे अधिष्ठान व आद्य पीठ आहे. त्यामुळे आत्मोद्धार, लोकोद्धार, ज्ञान, भक्ती, प्रपंच आणि परमार्थ इ. गोष्टी या धर्मात एकत्र नांदतात. या भक्तिधर्मात जातिधर्माचा, स्पृश्यास्पृश्य भेद मानला जात नाही व पांडुरंगाचे दर्शन पादस्पर्शाने होते. म्हणून हा वैष्णव संप्रदायांपैकी एक प्रमुख संप्रदाय आहे. पंढरपूरचा विठोबा त्यांचे उपास्य दैवत आहे. पुंडलिकाचे भेटीसाठी पंढरीत परब्रह्म उभे आहे व चरणी भीमानदी पतितांची पापे नाश करण्यास, त्यांचा उद्धार करण्यास सदैव सिद्ध आहे.

पंढरीचे अनादित्व -

वारीची प्रथा - दर महिन्याच्या वारीस येणार्‍यांचे नित्यनेम कार्यक्रम :

दर महिन्याच्या शु. दशमीस चंद्रभागेचे स्नान, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन, फडावरील परंपरेप्रमाणे कीर्तन, दिंडी, भजन वगैरे . एकादशीस जागर, द्वादशीस पर्वकाळ कीर्तन, कीर्तनानंतर खिरापतीचा प्रसाद घेऊन वारकरी आपापल्या गावी परतात. मात्र आषाढी, कार्तिकीच्या वारीस गोपाळपुराला काल्याचे कीर्तन ऐकून' कालाप्रसाद ' घेऊन मग परततात. वारीच्या गर्दीत कित्येक वारकरी कळसाचे दर्शन घेतात. पांडुरंग मंदिराच्या कळसावर उभा राहून आपल्या भक्तांना दर्शन देतो, अशी त्यांची भावना असते.

निष्ठावंत वारकर्‍यांमध्ये पायी वारीचे फार महत्व मानले जाते. पायी जरी वारी करीत असले तरी बरोबर भागवतधर्माची जागृतीची खूण म्हणून खांद्यावर पताका, देवपूजेचे साहित्य, नित्यनेमाचा गाथा, विष्णुसहस्त्रनाम, भगवद्‌गीता, काहींच्याबरोबर तुळशीवृंदावन ही असतात.

'फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर । नामाचा गजर सोडू नये ।' असे वारकर्‍याचे ब्रीद आहे.

'रामकृष्ण हरि ' हा संप्रदाय-मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमविणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा, हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठलरुप परमात्मा होय. या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाति-वित्त-कुळ यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशीच्या मण्यांची माळ, कपाळी गोपीचंदनाच्या मुद्रा व बुक्का आणि खांद्यावर पताका ही वारकर्‍यांची बोधचिन्हे होत. वारी करणार्‍यांना गुरु करुन घेऊन त्याकडून माळ घ्यावी लागते. गुरू माळ देताना शिष्याकडून काही नियम पाळ्ण्याची शपथ घेववतात. ते नियम :-

(१) खरे बोलणे,

(२) परस्त्री मातेसमान मानणे,

(३) काही अपघात घडला असता भगवंताने क्षमा करावी, म्हणून त्याची कळकळीने प्रार्थना करणे,

(४) मद्यमांसाहार आदी सेवन न करता सात्विक आहार घेणे,

(५) दर पंधरवड्यांच्या एकादशीचे व्रत करणे,

(६) वर्षातून निदान एकदा तरी पंढरीची वारी करणे,

(७) नित्यनेम म्हणून दररोज 'रामकृष्णहरी' या मंत्राचा १०८ वेळा माळ ओढून जप करणे,

(८) नित्यनेमाने 'हरिपाठा'चे अंभंग म्हणणे व ज्ञानेश्‍वरीच्या काही ओव्या नियमित वाचणे आणि

(९) प्रपंचात वाट्यास आलेली नित्यकर्मे श्रीविठ्ठलस्मरणार्थ प्रामाणिकपणाने पार पाडणे.

कोणत्याही वेळी केव्हाही गळ्यातून तुळशीची माळ काढीत नाहीत. माळ तुटलीच तर दुसरी माळ घालीपर्यंत निष्ठावंत वारकरी थुंकीदेखील गिळत नाही. असे केले नाही, तर ब्रह्महत्येचे पातक समजतात.

N/A

N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP