-
वि. १ . कडवा ( गोडाचे उलट , कडुनिंबाच्या चवीप्रमाणें ). २ बेचव ; पित्तविकारामुळें बदलणारी ( जिभेची रुचि ). ३ न रुचणारें ; अप्रिय ; कठोर ( वाक्य , भाषण इ० ). ' आधीं कडु मग गोड .' ४ ज्यास कीड लागत नाही , जें कीड खात नाहीं असें ( विशिष्ट झाड , वनस्पति ). ५ जारज संतति ( गोडच्या उलट ). ६ गोड नसणारें ; अशुदेध ( विशिष्ट तेल ). ७ कठिण , गांठ्यांळ ( बाभळीच्या लांकडाचा आंतील भाग ; नार ; वरचा भाग ठिसूळ , नरम किंवा गोड असतो ). ८ निर्दय ; कडक ; ताठर ( माणुस , स्वभाव ). ९ नापीक ; लागवदीला प्रतिकूल ( जमीन ). १० झोंबणारी ; कडक तिखट ( विशिष्ट भाजी ). - न . १ ( ल .) अफू . २ कात ( रात्रीच्या वेळेस काताचें नांव घ्यावयाचें नाहीं म्हणुन त्याबद्दल म्हणतात ) ३ मृताशोंच . कडु विटाळ या शब्दाचा संक्षेप . - स्त्री . डोळ्यांचें दुखणें ( डोळ्यांत माती गेल्यानें , जाग्रण केल्यानें येणारें ). ( क्रि येणे , उ० डोळ्यांला कडु येणें ). - पु . १ दासीपासून झालेली संतति ; अनौरस जारस सतति ; लेकवळा ( याच्या उलट गोड .) ' त्याच्या राज्यांत मल्हारराव नामक त्याच्या एका कडु सापत्न भावानें जें बंड माजविलें होतें ...' - हिंक ८४ . २ पाटाची संतति ( सं . कटु ; प्रा . कडु ; गु . कुडवु ; हिं कडुवा ; सिं कडो )
-
०इंद्रायण न. कुंपणावारील एक वेल ; ह्याची फळें तांबडीं , विषारी व रुचीस कडू असतात ; कवंडळ ; इंद्रावण ; इंद्रवारुण ; कडूवृदांवन २ ( ल .) तुसडा . माणुघाण्या ; एकलकोंडा माणुस .
-
०करांदा - पु . एक कडवट तपकिरी रंगाचा कंद .
-
कडू कारलें
Site Search
Input language: