-
पु. १ पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा . नोहेचि समुद्र प्रवाहो । नुटीचि ध्रुवा जावो । - ज्ञा १८ ४२१ . २ पृथ्वीच्या किंवा खगोलाच्या आसांच्या दोन टोकांपैकी प्रत्येक . उत्तर - दक्षिण ध्रुव . ३ ( ज्यो . ) सत्तावीस योगांपैकी बारावा योग . ४ सूर्य वंशांतील उत्तानपाद राजाचा पुत्र . धृव धृव खरास्तवा उचित होय विश्वास तो । - केका ६५ . ५ गाणे , पद इ० कांचे पालुपद ; ध्रुपद ; अकडकडवे . ६ ( ताल . ) एक मात्राप्रमाण . ध्रुवताल पहा . - वि . १ शाश्वत ; निरंतर . ध्रुव सुख नसेचि कैंचा जय कैंचे राज्य कीर्ति जोडावी । - मोशल्य १ . ५२ . श्रीगुरु म्हणे त्या अवसरी । सुवासिनी होय ध्रुव । - गुच ३२ . १३७ . २ स्थिर ; अढळ ; अचल . हृदय शुद्धीचिया आवारी । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी । - ज्ञा १३ . ३८५ . [ सं . ] सामाशब्द -
-
पु. नाकाचा शेंडा ; नासिकाग्र . ( सं .)
-
०ताल पु. ( संगीत ) कर्नाटक संगीत पद्धतीतील एक ताल . याचे मात्रा प्रकार पांच आहेत ते येणे प्रमाणे . ११ , १४ , १७ , २३ , २९ . [ ध्रुव + ताल ]
-
०पद न. १ धुवाला दिलेले अचल स्थान ; ध्रुव तार्याचे स्थान . रुसला ध्रुव कवतिके । बुझाविला देऊनि भातुके । ध्रुवपदाचे । - ज्ञा १० , १८ . २ ( ल ) शाश्वत टिकणारे , वैभवाचे उच्च स्थान , पद . ३ ( संगीत ) पद , गाणे इ० कांचे पालुपदाचे कडवे ; ( विरु . ) ध्रुपद . ४ ( संगीत ) चीजेचा एक प्रकार . ह्यांत देवतांची स्तुति , ऋतुवर्णने , सृष्टिसौंदर्य , वीर - शृंगारादि रस इ० विषय असतात . ही चीज बहुधा गंभीर प्रकृतीच्या रागांत व प्रौढ भाषेत रचिलेली असते व चौताल , सलताल , तीव्रा , ब्रह्मताल इ० कांत गाइली जाते . [ ध्रुव + सं . पद = स्थान ]
Site Search
Input language: