Dictionaries | References
z

Zingiberaceae

शुण्ठी कुल झिंजिवरेसी
आले (शुण्ठ)
हळद, सुवर्णपुष्प, सोनटक्का (पांढरा)
कोळिजन, वेलची इत्यादी वनस्पतींचे लहान कुल. याचा अंतर्भाव एंग्लर व प्रँटल आणि बेंथॅम व हूकर यांनी सिटॅमिनी गणात केला असून हचिन्सन यांनी झिंजीबरेलीझ या स्वतंत्र गणात केला आहे. प्रमुख लक्षणे - बहुवर्षायु औषधी, मूलक्षोड मांसल, पाने साधी, जिव्हिकावंत, कुंतसम, फुले द्विलिंगी, एकसमात्र, संदले व प्रदले प्रत्येकी तीन व खाली नलिकाकृती, जननक्षम केसरदल एक पण इतर वंध्य, अधःस्थ, त्रिकिंज किंजपुटात तीन कप्पे व अनेक बीजके, बोंडात अनेक बिया (बहुधा बीजोपांगासह) सपुष्क आणि सपरिपुष्क.
scitamineae.

Related Words

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP