TransLiteral Foundation

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

चक्र

  • न. १ रथ , गाडी , इ० चें चाक ; कुंभाराचें चाक . मग भवंडीचें दंडें । भ्रमे चक्र । - ज्ञा १८ . ३१० . २ चाकासारखें एक आयुध ; विशेषत : विष्णूचें सुदर्शन चक्र . कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे । - ज्ञा ११ . ६०४ . ३ एक खेळणें ; चक्री ; चकीर ; चक्कर . ४ बोटावरच्या वर्तुलाकार रेषा ; या शुभ गणतात ( याच्या उलट शंखाकृति रेषा अशुभ समजतात ). ५ सैन्य ; सेनासमूह ; जथा ; जमाव . स्वचक्र , परचक्र . पालाणिजे त्वरित चक्र अशा रवा हो ! - वामन , विराट ५ . ११ . ६ राष्ट्र ; देश ; भूप्रदेश ; प्रांत ; जिल्हा . ७ ( संकेत ) वडे ( खाद्य पदार्थ ). ८ ( विणकाम ) मागाच्या कपाळकाठीच्या शेवटाला अडकविलेलीं दोन चाकें ; अथवा कपाळकाठी किंवा ढेकणी यांच्या ऐवजीं ज्या चाकाचा उपयोग करतात तें . नकशीच्या कामाच्या दोर्‍या - काठांचा चाळा आहे असें लांकडी चाक ; ज्यावर सूत गुंडाळतात तें चाक ( रीळ ). ९ चक्राकार सैन्यरचना ; व्यूह . चक्रव्यूह . १० पाण्याचा भोंवरा ; आवर्त . ११ भविष्यकथनासाठीं किंवा जातक वर्तविण्याकरितां काढलेली आकृति ; कुंडली . १२ ( शारीरशास्त्रांत ) शरीराचे विभाग ; प्राणस्थानें प्रत्येकी एकंदर सहा आहेत ; आधार - लिंग - नाभि - हृत - कंठ - भू - चक्र . षटचक्रभेद पहा . येक सांगती अष्टांग योग । नाना चक्रें । - दा ५ . ४ . २४ . १३ संवत्सराचें मंडल , राहाटी , आवृत्ति . १४ ( ज्यो . ) मंडल ; वर्तुल , राशिचक्र ; ज्योतिषचक्र . १५ ( कुण . ) संकट ; गोंधळ ; घोंटाळा ; कोडें ; फास . ( क्रि० चक्रांत घालणें - येणें = फसणें . ) १६ ( सामा . ) मंडलाकार भ्रमण करणारा , खालचा वर - वरचा खालीं होणारा रहाटगाडग्याप्रमाणें फिरणारा पदार्थ , वस्तु , स्थिति . वायुचक्र . संसारचक्र . १७ राज्यक्रांति . १८ ( शाप . ) पेशी ; पिंड , ( इं . ) सेल . १९ योगमार्गात कल्पिलेलें एक चक्र . हीं चक्रें सहा आहेत . मूलाधार ; स्वाधिष्ठान ; मणिपूर ; अनाहत , विशुध्द ; सहस्त्रार . ऊर्ध्व तळौतें खाचें । तया खेवामाजि चक्रांचे । पदर उरती । - ज्ञा ६ . २३७ . २० चक्रवाक पक्षी . चक्रापरीच सजलों असतां फिराया । - र १७ . [ सं . ] सामाशब्द - 
  • न. ( विनोदानें लक्षणेनें ) भाकर . ' दोन चक्री खाऊन आलों .' 
  • न. ( ल .) भाकर . 
  • ०गति स्त्री. वर्तुळाकार ( आपल्या भोंवतालीं व पातळींत ) गति ; चक्रावर्त व गरगर फिरणें . नित्य जे उदयास्त होतात ते चक्रगतीनें आणि प्रहांस राश्यंतर होतें हें स्वगतीनें . [ सं . ] 
More meanings
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,923
  • Total Pages: 47,534
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,706
  • Marathi Pages: 28,512
  • Tags: 2,710
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.