-
कर्कटी (काकडी) कुल, कुकर्बिटेसी
-
लाल भोपळा, काकडी,कलिंगड, टरबूज इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश बेंथॅम व हूकर यांनी कृष्णकमळ गोत्रात (पॅसिफ्लोरेलीझ)
-
एंग्लर व प्रँटल यांनी कर्कटी गणात (कुकर्बिटेलीझ)
-
बेसींनी लोझेलीझ गणात व हचिन्सननी कर्कटी गणात केलेला आढळतो. प्रमुख लक्षणे- बहुतेक सर्व प्रतानयुक्त औषधीय वेली, साधी, एकाआड एक, हस्ताकृती शिरा असलेली पाने, अरसमात्र, अपिकिंज बहुधा आकर्षक, पिवळी किंवा पांढरी, एकलिंगी, एकाच झाडावर असणारी फुले, बहुधा संवर्त व पुष्पमुकुट पंचभागी, जुळलेल, घंटाकृती, केसरदले
Site Search
Input language: