-
पु. १ प्राण ; जीवित . २ प्राण असणारा जिवंत प्राणी . सर्व जीवांस ईश्वर पोसतो . ३ लहान कीटक , प्राणी ( चिलट , घुंगरडें , पिसूं , किडा इ० ). या शेणांत जीव झाले आहेत . ४ तेज ; वीर्य ; जोम ; धमक ; पाणी ; शक्ति ; धैर्य ; कार्यक्षमता ; सत्त्व ; सार ( माणूस , घोडा , बैल इ० चें ); ५ यश ; नफा ; राम ; अर्थ ( कार्य , काम , उद्योग यांत ). या व्यवहारामध्यें जीव नाहीं , केला न केलेला सारखा . ६ बळकटी ; स्थैर्य ; मजबुती ; टिकाऊपणा ; भक्कमपणा ( पदार्थ , वस्त्र यांचा ). छत्रीचा जीव हलका म्हणून वार्यानें फाटली . ७ खरेपणा ; सत्यता ; विश्वसनीयता ; मिलाफ ; मेळ ( बातमी वगैरेचा ). या बामतीमध्यें , त्या ग्रंथांत जीव नाहीं . ८ सौंदर्य ; जोर ( लिहिण्याचा ). ९ मन ; प्रवृत्ति ; कल . एक जीव म्हणतो जावें एक म्हणतो न जावें . १० अंतरात्मा ; सचेतन आत्मा ; जीवात्मा ; पहा . त्याच्यासाठीं माझा जीव भारी तडफडतो . ११ देवगुरु बृहस्पति . त्याच्या आला परिसुनि यश निववायासि मन घरा जीव । [ सं . जीव ; प्रा . जीवो ; सिं . जीउ ; हिं . जी ] ( वाप्र . )
-
०अधांत्रीं संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें .
-
उडणें संकटांत पडणें ; भांबावून जाणें ; घाबरून जाणें .
-
०अर्धा मनुष्याला अतिशय त्रास देणें . सर्व शक्ति खर्च करणें ( श्रम , व्यर्थ शिकवण इ० ).
Site Search
Input language: