-
पु. १ बोध ; ज्ञान ; आकलन ; उमज ; अवगमन . ( क्रि० घेणें ; धरणें ). २ ग्रहणशक्ति ; आकलनशक्ति . ३ जाणिव ; खातरी ; समाधान ; बरोबर आकलन ; परिज्ञान . ४ ताकीद ; माहिती ५ शहाणपणा ; हुशारी ; अक्कल ; बुद्धि . वरहि वरायास पाहिजे समज । - मोउद्योग १ . ४१ . ६ ( ल . ) धाक ; दपटशा ; मारठोक . [ सं . सम् + मज्ज ; हिं समझ ]
-
पु. समुदाय ; सांठा ; संग्रह ; लोंढा . चित्त समजी बुडौनि ठेले । विस्मयाचां । - ज्ञा ११ . १८६ .
-
०उमज पु. पूर्ण जाणीव ; पूर्ण ज्ञान ; वास्तविक बोध . समजणें - सक्रि , १ जाणणें ; बोध ; आकलन होणें . २ माहित होणें ; ठाऊक होणें ; उघड होणें ; स्पष्ट दिसणें ३ - अक्रि . पटणें ; खात्री होणें ; समाधान होणें ; शंकानिरसन होणें . ४ सारख्या सारख्या दिसणार्या गोष्टीमधील सारखेपणा व फरक कोणता हे नक्की आणी पक्केपणानें सांगतां येणें . समजूं लागणें - सज्ञान होणें ; कळूं लागणें ; कळण्यासारख्या वयांत येणें . समजदार - वि . १ सुज्ञ ; विचारी , शाहणा ; हुशार . २ चलाख ; चांगली ग्रहणशक्ति असलेला . समजपत्र - न . वाद न करतां समजूत झाल्याचें वादी - प्रतिवादी यांचे संमतिपत्र . समजवली - वि . समजूतदार ; शाहाणी . तूं समजवाली सार्यांनी जुट बांधावी । - राला ७३ . समजविणें - उक्रि . स्पष्ट करून सांगणें ; समजविणें पहा . समंजस - वि . १ समजूतदार ; सुजाण ; विवेकी ; शाहणा ; जाणता . २ बुद्धिवान ; हुशार ; तीव्र बुद्धिचा . ३ सदगुणी ; सज्जन ; भला . ४ योग्य ; लायख ; बरोबर ; शोभेसा . समजस - वि . समंजसचा अपभ्रंश प्रथमार्थी . समजावण , समजावणी - स्त्रीन . १ समजूत ; स्पष्ट करून सांगणें . २ मन वळविणें ; समाधान करणें ; समजूत पाडणें ; खात्री करणें . ( क्रि० करणें ; होणें ). करउनि स्तन्यपान । स्वबाळांचे समजावण । - रास १ . ५७७ . समजावशी , समजाविशी , समजावीस , समजी - स्त्री . योग्य प्रकारें समजूत पाडणें ; वळणावर ; ताळ्यावर आणणें ; मनवळवणी ; समाधान , खात्री करणें ; शंका निरसन करणें ; एखाद्यासंबंधी मन ताळयावर आणणें . ( क्रि० करणें ; पाडणें ; काढणें ). समजाविशीस अर्धे मारवाड काबीज केलें होतें तें दरोबस्त त्यांजकडे दिलें . - भाब १८ . पडेल समजाविशी तशी करोत कां लाजशी । - केका १५ . बसल्या रुसून समजाविसी करिसी बरी . - होला ५८ . ह्यासाठीं माझी समजी व्हावी . - बाळ २ . ६८ . पदर पसरून उभी समजीला । - प्रला १०० . समजाविणें - उक्रि . १ समजूत घालणें ; स्पष्ट करणें ; फोड करून सांगणें ; पटविणें . २ खातरी , समाधान करणें ; मन वळविणें , ताळयावर आणणें . समजीक , समजीस - समंजस पहा . समजीपत्र - समजपत्र पहा . समजूत - स्त्री . १ ग्राहक शक्ति ; बुध्दि ; आकलनशक्ति . २ पूर्णज्ञान ; जाणीव ; बोध ; आकलन . लोकांत समजूत व उपयुक्त ज्ञान यांचा बराच प्रसार झाला . - नि ८ . ३ खातरी ; समाधान ; मनवळवणी . समजाविशी पहा . ४ हुकूम ; ताकीद ; आज्ञा . सरकारचे सल्ल्यानें काम करण्यास त्यांस समजूत दिली . - टिले १ . १ . १६० .
-
०पाडणें तडजोड , एकमत , संधि करणें ; समाधान करणें ; खातरी करणें , पटविणें .
Site Search
Input language: