-
वि. १ कांहीं तरी कला जाणारा ; कलाभिन्न ; कला पहा . परंतु विशेषत ; गाणारे नाचणारे वाजविणारे आणि त्यांतही कलावंतिणींचे साजिंदे , पखवाज व सारंगी वाजविणारे , यांना लावतात . ( सं . कलावत् ) २ ( प्रबंध ) धृवपद गाणारा . ३ ( गो .) नाचणारी स्त्री ; गाण्याचा धंदा करणारी एक जात ( नायकीण ). ' मौलाबक्षांचें चिरंजीव ... यांस कलावंत सुपरिंटेंडेंट असा हुद्दा देऊन ...' - कलावंत खातें ( बडोदें ) १
-
०खातें न. गुणीजनांचा ( गाणारे , नाचणारे वाजविणारे इ० चें ) परामर्ष घेणारें एक खातें ' कलावंत खातें स्थापन झाल्यापासून कोणते गुणीजन नोकरीत ... ठेविले .......' - कलावंत खातें ( बडोदें ) २ म्ह० ( गो .) १ कलावंत नाचतां देवळंत , म्होण गावडी नाचतां घरांत ( दुसर्याचें निरर्थक अनुकरण करणें याअर्थी ) २ कलावंताचें भाग्य आणि तिरड्याचें राज्य तीनच दिस = कलावंतिणीचें भाग्य तारूण्य असेपर्यंत व तेरड्याचें राज्य रंग विटेपर्यंत ( अल्पकाळ टिकणारें वैभव )- ची प्रीत -( गो .) खोटें , लटकें , वरकांती प्रेम , प्रीति ./
-
ना. कलाकार , कलानिपुण , कलाभिज्ञ ;
-
ना. गायक , चित्रकार , नर्तक , वादक , शिल्पकार .
Site Search
Input language: