-
जंबुल कुल, मिर्टेसी
-
जंबुल कुल, मिर्टेसी
-
जांभूळ, पेरु, जांब, लवंग इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल, याचा समावेश (मिर्टेलीझ) जंबुल गणात केला आहे. प्रमुख लक्षणे - साधी, समोरासमोर, तैलप्रपिंडयुक्त पानांचे वृक्ष व झुडपे, द्विलिंगी चार पाच भागी, नियमित, सच्छदक, परिकिंज, अपिकिंज फुले, संदले सुटी व सतत राहणारा, पाकळ्या सुट्या, केसरदले अनेक, बिंबाच्या कडेने चिकटलेली, दोन किंवा अधिक अधःस्थ किंजदलांच्या संयुक्त किंजपुटात एक ते अनेक बीजके, फळ विविध, बहुधा मृदुफळ, अनेक अपुष्क बिया
Site Search
Input language: