-
स्त्री.
- ( फज्यो .) मनुष्याच्या जन्म नक्षत्रावरुन कांहीं जाती कल्पिल्या आहेत त्यांपैकी एक . ( सं .)
- ( स्त्रिंयांचें ) जननेंद्रिय .
- जन्मस्थान ; झरा ; उगम ; त्या त्या पदार्थांचे जें उत्पत्तिकारण ती . मेघ हा धूमयोनि आहे .
- प्राण्याची जाति किंवा वर्ग ; कोटी उदा० मनुष्ययोनि , व्याघ्रयोनि इ० . या योनी ८४ लक्ष आहेत असें मानलें आहेत . त्यांत २० लक्ष वृक्ष , ९ लक्ष जलचर , ११ लक्ष किडे , १० लक्ष पक्षी , ३० लक्ष पशू , ४ लक्ष मानव . ४ जगाचें - निमित्त कारण जें ईश्वर , काल स्वभाव इ० त्यासहि म्हणतात . ईश्वर हा जगद्योनि होय .
- होमकुंडाच्या मेखलेस पश्चिमभागीं शाळुंकेसारखी आकृति करतात ती . [ सं . ]
-
०कंद पु. एक रोग . [ सं . ]
-
०चतुष्टय न. जीवांचे चार प्रकार , कोटि ( जन्माच्या प्रकारभेदानें जरायुज , अंडज , स्वेदज व उद्भिज ).
-
०दाह पु. स्त्रियांचे जननेंद्रियांतील असह्य उष्णता ; एक रोग . [ सं . ]
Site Search
Input language: